तरुणांना राजकारणात वापरुन घेतले गेले.! आता उभे राहण्यासाठी शिक्षण घ्या, लग्न जमण्यासाठी नव्हे -रोहित पवार
अकोले (प्रतिनिधी) :-
जेव्हा आम्ही राजकीय व्यासपिठावर असतो तेव्हा राजकारण करतो, एरव्ही मला ते करु वाटत नाही. पण, कोणतेही धोरण राबवायचे असेल तर त्यासाठी चांगला अभ्यास करावा लागतो. शरद पवार साहेब म्हणाले होते. की आपण जेव्हा सत्तेत होतो त्याचे मुल्यांकन करण्यासाठी विरोधी बाकावर बसावे लागते. जेव्हा आपण ग्रामीण विकासाचा प्रश्न पुढे करतो. तेव्हा त्याच्या आव्हानाचा विचार केला पाहिजे. मी आता नगरचा आमदार आहे. खरंतर नगरचे नाव जितके सरळ आहे. तितके येथील राजकारण सोपे नाही. हे मी अनुभविले. वास्तविक म्हणजे नगरमध्ये पाणीसाठी चांगला आहे. मात्र, त्याचे नियोजन योग्य असायला हवे.
ग्रामीण भागात शिक्षण हा महत्वाचा प्रश्न आहे. येथील काही शाळा पाहिल्या तर त्या चांगल्या आहेत. पण अकोल्यात फार मागासलेपण दिसून आले. येथे मुलांना पुढे काय व्हायचे.! हे देखील सांगता आले नाही. ही येणारी पिढी आहे. त्यावर योग्य उपाय निघाला पाहिजे. मी राजकारण करताना मतदार म्हणून कधी दृष्टीकोण ठेवला नाही. पण, दुरदृष्टी नक्की ठेवली. आज माझ्याच वयाच्या मुलांना नोकरी नाही. जर आजची लहान मुले पुढे चांगले शिकले नाही. तर त्यांचे देखील हेच हाल होणार आहे. आज एफवायला गेलेल्या विद्यार्थ्याला पुढे काय व्हायचे हे माहित नाही. मित्र, बहिन, भाऊ किंवा आई वडिलांनी सांगितले म्हणून मी पुढील शिक्षण घेत आहे. खरंतर आज युवकांचा राजकारणासाठी वापर केला जात आहे. राजकारण सुरु झाले की युवकांना जवळ करायचे आणि राजकारण संपले, की तरुणांना दुर लोटायचे. हेच वास्तव आहे.अकोले पर्यटन बनले पाहिजे. अकोल्याची ख्याती अशीच बनली पाहिजे. मी कर्जत जामखेडची ओळख राज्याला करुन दिली आहे. मी कर्जत जामखेडमध्ये एक थेंब देखील दारु वाटली नाही. अगदी मतदान सुरु होण्याच्या आधीपासून लोक म्हणत होते, दारु वाटा, खर्च करा. पण, मी कोणताही गैरमार्ग वापरला नाही. शेवटी दुपारीच निकाल बाहेर पडला आणि जे दारु वाटा म्हणत होते. त्यांनीच मला उचलून मिरविले. आपण, एक युवक म्हणून तरुणांना नोकरीची संधी दिली पाहिजे. ती आपण निर्माण करुन देऊ. यासाठी येथील पत्रकार नक्कीच मदत करतील. युवकांनी लग्न जमविण्यासाठी डिग्री घेऊ नका. उभे राहण्यासाठी शिक्षण घ्या. नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे देखील झाले पाहिजे. नोकरी करायची असेल. तर घाबरु नका, खचू नका, आत्मविश्वास ठेवा, लढा, स्वत:तील पोटॅन्शिअल ओळखा. तुमचे स्वप्न साकार करताना ते तुमच्या आई वडिलांचे देखील स्वप्न आहे. हे विसरु नका.
ग्रामीण भागात शिकले नाही. तरी हुशार लोकांनी स्वत:चे स्किल डेव्हलप केल्याचे दिसते आहे. राहिबाई पोपेरे हे त्याचे उत्तम उदा. आहे. विशेषत: स्त्रीयांना पवार साहेबांनी ५० टक्के आरक्षण दिले आहे. त्यामुळे त्याचा फायदा घ्या. आजकाल स्री ग्रामपंचायतीत गेली तर तिच्या पतीला एसपी म्हणून खुर्ची टाकलेली असते. हे कोठतरी थांबले पाहिजे. ग्रामीण भागात महिला आरोग्याचे प्रश्न फार मोठे आहे. त्यासाठी शासनाच्या योजना तळागाळापर्यंत नेता आल्या पाहिजे. त्यासाठी प्रबोधन करणे आवश्यक आहे. त्यासाठी माध्यमे फार महत्वाची भुमिका बजावू शकतात. आपण ग्रामीण असो व शहरी आपण पहिले भारतीय आहोत हेच महत्वाचे आहे. त्यामुळे, प्रयत्न हाच महत्वाचा पर्याय आहे.
रोहित पवार आणि अकोल्याचे राजकारण, नक्की वाचा उद्याचा लेख, रोखठोक सार्वभौम