कलम ३२५ वर्सेस खोटा ३०७; पोलिसांचे दोन्ही बाजूने वाभाडे.!
अकोले (प्रतिनिधी) :-
गेल्या १५ दिवसांपुर्वी "रुंभोडी" परिसरात "शेतीच्या" कारणाहुन दोन "देशमुख" भावंडांत "किरकोळ" वाद झाले होते. वास्तवत: हा मुद्दा "समजदारीने" चार चौघात सोडवायचा होता. पण, "विनाश काले, विपरित बुद्धी" कोण जाणे कशी "भाऊबंदकी" उफाळून आली आणि दोन्ही गटांमध्ये "फनभर" तुकड्यासाठी भाऊ भावाला भिडले. यात माणिकराव देशमुख (वय ७०) या निवृत्त शिक्षकाच्या अशी कानावर मारली. की, त्यांच्या कानाचा पडदा फाटला आणि ते कायमचे अधू झाले. हे सर्व मेडिकल रिपोर्ट व व्हिडिओ त्यांनी पोलीस ठाण्यात दाखल केले आणि त्यानुसार कलम ३२५ नुसार अकोले पोलिसांनी विरोधी देशमुख बंधू यांच्यावर गुन्हा दाखल केला. आता दुसरी बाजू अशी. की, यांच्या विरोधी पार्टीने कोण जाणे कोण्या महाशयांचा सल्ला घेतला आणि ३०७ गुन्हा दाखल करण्याची घाई केली. आता येऊन जाऊन दोन्ही बाजुंनी अकोले पोलिसांवर टिकेची झोड उठली. न्यायालयात अकोले पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि कलमांच्या अभ्यासावर देखील प्रश्नचिन्ह उभे केले गेले. पण, पहिला सलाम वकील महाशयांना ज्यांनी अगदी खडाजंगी युक्तीवाद मांडला अशा अॅड. अतुल आंधळे साहेबांना.! दुसरा सलाम न्यायदेवतेला. ज्यांनी सर्व बाबी लक्षात घेऊन या प्रकरणातील संदिग्ध बाबींना अधोरेखित करत चक्क सेशन कोर्टात (३०७) खुनाचा प्रयत्न करणे यात माणिकराव देशमुख व त्यांच्या पत्नी अशा दोघांना जामीन दिला आहे. आता ३०७ सारख्या गुन्ह्यात जामीन दिला. तरी ३२५ सारख्या गुन्ह्याचा तपास सोडा आरोपी देखील अटक करायला पोलीस धजत नाहीत. त्यामुळे, न्यायाला सैरभैर व्हावे लागत आहे आणि अन्यायाला खुलेआम जगण्याची मुभा मिळू लागली आहे. उद्धवा.! वा रे.! अजब तुझे सरकार... त्यामुळे, माणिकराव देशमुख यांनी मुख्यमंत्री, पोलीस अधिक्षक यांच्यासह सात ठिकाणी अर्ज दाखल केले आहेत. की, माझ्यावर दाखल झालेला गुन्हा खरा असेल. तर, मला तत्काळ शिक्षा द्या आणि खोटा असेल. तर दाखल करणाऱ्यांच्या गळ्याला दोर बांधा. त्यामुळे, या वयोवृद्ध दाम्पत्याचे प्रशासन ऐकेल की निर्ढावल्यापणाने खोटारडी कागदपत्रे रंगवत बसवतील. देव जाणे.!!
एका घटनेची आठवण आज प्रकर्षाने होते आहे. एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी होते. त्यांच्या हाद्दीत बलात्कार करुन खून असा (३७६ With ३०२) प्रकार घडला होता. अर्थात घटनेत नवऱ्याला बायकोची चावटाळ बाजू माहित होती. त्यामुळे, मागचा पुढचा विचार न करता त्याने लव्हरचे नाव पुढे करुन फिर्याद दिली. आता "कर नाही, त्याला डर कशाला".? त्यामुळे, तो स्तब्ध उभा राहिला. अर्थात खऱ्याची दुनिया असते होय.? मग काय ! त्याला अटक झाली आणि तपास सुरु झाला. आता खाकीच्या तडाख्यात कोणी सापडले. तर, ते म्हणाले ना.! बैल गाभन तेरावा महिना. तर, आपल्याला होच म्हणावं लागते. म्हशीला बोकड म्हण.! तरी म्हणावं लागतं. त्यामुळे, मर-मर मार खाल्ला आणि तो अखेर हो म्हणाला. पण, एका निवांत क्षणी त्याने साहेबांना प्रश्न केला. साहेब.! जे केलं नाही, त्याची शिक्षा आपण कधी भोगलीय का हो.! साप समजून भुई बडविली तर खरोखरचा साप उद्या पुन्हा कोणालातरी दंश करेल. तेव्हा साहेबांनी त्याचे म्हणणे परसले. त्यांनी तपासाला प्रचंड गती दिली आणि खरे आरोपी शोधून काढले. तेव्हा याच पोलिस अधिकाऱ्याने न्यायालयात आवाज उठविला. साहेब.! ही व्यक्ती निर्दोष आहे. मला खरे गुन्हेगार माहित आहे. मी लवकरच त्यांना शोधून आपल्यासमोर हजर करेल. पण, या निरापराध्याला शिक्षा नको.! वा रे पोलीस. याला म्हणतात जीगर. वास्तवाच्या नरडीत हात घालून सत्याला न्याय देणारा इमानी वर्दीवाला. तेव्हा या अधिकाऱ्याने शोध लावला होता. की, या बाईसाहेब सायंकाळी धुणं धुण्यासाठी नदिकाठी चालल्या होत्या. तेथेच काही अंतरावर रस्त्याचे डांबरीकरण सुरु होेते. बाहेर राज्यातील लोकांनी ओसाड जागेत कोप्या करुन बस्तान बांधले होते. या नराधमांची वासना जागी झाली आणि त्यांनी दुष्कृत्या करुन तिचा खून केला. त्या जागेपासून तर झोपडीपर्यंत एक एक रक्ताचा थेंब त्यांनी जमा केला आणि परराज्यात जाऊन त्यांनी आरोपींना बेड्या ठोकल्या. याला म्हणतात पोलिसिंग.
आता हे सर्व सांगायची बाब अशी की, जेव्हा माणिकराव यांना मारहाण झाली. तेव्हा त्यांनी ३२५ नुसार गुन्हा दाखल केला. तो गुन्हा मागे घेण्यात यावा. यासाठी स्थानिक पातळी, नातेवाईक आणि प्रतिष्ठीत व्यक्तींनी मध्यस्ती केली. पण, गुरुजींनी कोणाचेही एकले नाही. जे झाले ते सत्य आहे. मारले त्याचे व्रण आयुष्यभर न बुजणारे आहे. ज्यांनी उभी हयात विद्यार्थी घडविले. त्यांच्यावर भाऊबंदकीने नको ते आरोप करावेत.! त्यामुळे, त्यांनी न्यायाची वाट धरली. पण, या दरम्यान असे काही सुत्र हलले की, त्यांच्या बंधुंनी माणिकराव यांच्यावर चक्क खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवला. अर्थात हा ३२५ कलमान्वे गुन्हा दाखल होण्यापुर्वीच या बंधू महाशयांनी अॅडमिट होत अकोले बस स्थानक परिसरातील डॉक्टरांशी लगट केली आणि झोपून राहिले. असे देशमुख यांनी अर्जात म्हटले आहे. मात्र, वातावरण शांत झाले आणि त्यांनी घरची वाट पकडली. दुर्दैव इतके. की, याच दरम्यान त्यांच्या पुतन्याने माणिकरावांना गाडीचा धक्का देत कानाखाली मारली. यात त्यांचा कान फुटला आणि नियमानुसार पुरावे पाहत ३२५ दाखल झाला. हे प्रकरण मागे येईना. म्हणून गुरुजींच्या विरोधात ३०६, ३०९ व ३०७ चे कटकारस्थान करणारी फिर्याद कशी बसवायची यासाठी पोलीस व वकील यांच्यात चर्चा सुरु झाली. नंतर ३२५ ला प्रतिउत्तर म्हणून अखेर काळ्या कोटातून ३०७ चा आकडा बाहेर आला आणि माणिकराव व त्यांच्या पत्नीने बळजबरीने बंधूस विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केला. अशी कागदे रंगविण्यात आली.आता दुर्दैव असे की, ३०७ साठी "भांडकोडी" हा पॅटर्न अकोल्यात नव्याने रुजू होऊ लागला आहे. फिर्यादिनुसार पोलिसांनी ७० ते ७५ वयवर्षे असणाऱ्या दाम्पत्यास म्हातारपणी कोर्टाचे गरके मारण्याचे महतभाग्य लाभू दिले. पण, भगवान के पास देर है.! लेकीन अंधेर नाही. या दोघांनाही जामीन मिळाला आहे. आता मेलो तरी बेहत्तर.! पण, माघार घ्यायची नाही. असे म्हणत ३२५ च्या जोरावर त्यांनी ३०७ ला आव्हान दिले आहे. काल, ही दोघे दाम्पत्य न्यायालयात हजर झाले होते. यांच्याकडे पाहुन न्यायदेवतेचा देखील चेहरा गलबलून गेला असावा. हात जोडत दोघे बाहेर पडले. आता त्यांना एकच अपेक्षा आहे. कधीतरी आम्हाला न्याय मिळेल. याच गुरुजींच्या हातून अनेक दानधर्म झालेले आहेत. कित्तेक मुलांचे संसार ऊभे राहिले आहेत. नोकरी होती तेव्हा ज्यांनी फुकटच्या जमिनी कसल्या. ज्यांच्या चोचित दाणा पाणी भरविला. त्यांनीच आता माझ्या ताटातल्या अन्नात माती कालवली आहे. उभे आयुष्य आदर्शाचे धडे देण्यात गेले आणि अखेरच्या क्षणी नको तसा कलंक रक्ताच्या नात्याने लावला. हे सर्वात मोठे दु:ख आहे. अशी खंत गुरुजींनी व्यक्त केली आहे.
एक आत्मियता म्हणून अॅड. अतुल आंधळे यांनी जी बाजू मांडली. त्याला कोणतीही उपमा देता येणार नाही. कारण, एरव्ही ३२६ सारख्या गुन्ह्यांना सेशन कोर्ट हायकोर्टात पाठवितात. मग, हा तर ३०७ होता. काय खरं काय खोटं. हे न्यायालयाला माहित नसतं. त्याची प्रखरता व वास्तवता पटवून देणे हे वकीलाच्या कार्याचा मुळ गाभा असतो. तोच मर्म आंधळे साहेबांनी शोधला आणि बेल पास झाला. दुर्दैव असे की, कदाचित पोलिसांनाही माहित असेल. हा गुन्हा खोटा आहे. पण, करणार काय ? आलं ते दाखल करा. वरिष्ठांचे आदेश असतात. पण, एक बाकी नक्की.! तपासाअंती खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणता आलं पाहिजे. अन्यथा ओढून ताढून दोषारोपपत्र आणि मग पुराव्याआभावी निर्दोष मुक्तता. त्यापेक्षा "बी पायनल" केला. तर पोलिसांचे कोण धनी आहे.? चला पाहु ३२५ वर्सेस ३०७ ही टफ फाईट.!!