..अखरे पिचडांच्या नाकावर टिच्चून होणार डॉ. किरण लहामटे राज्यमंत्री.!


मुंबई (प्रतिनिधी) :- 
                        राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य मधुकर पिचड यांनी शरद पवार यांची साथ सोडल्याचे शल्य गेली कित्तेक दिवस पवार कुटुंबाला अस्वस्थ करीत होते. त्यामुळे, काही झाले. तरी, वैभव पिचड यांचा पराभव करायचा. हा ठाम निर्धार पवारांनी केला आणि तालुक्याची पहिली मेख ओळखली. मतांचे विभाजन होऊन पिचड निवडून येतात हे लक्षात येताच त्यांनी सगळ्या विरोधकांना पुण्यात बोलविले. या सर्वांमध्ये अशोक भांगरे, सतिष भांगरे आणि मधुकर तळपाडे यांची भुमिका अत्यंत महत्वाची होती. त्यांच्यावर प्रेमाची चादर चढवून एकास एक उमेदवार करण्यात पवारांना यश आले. अखेर, अकोल्यात श्रीगोंदा पॅटर्न राबवून पिचडांना पराभवाची चव चाखायला दिली. खरे पाहता, गेली ४० वर्षे पवार कुटुंबाने पिचड साहेबांना अगदी काहीच कमी पडू दिले नाही. एक मागसवर्गिय व्यक्ती असताना देखील कधी विरोधी बाकावर बसू दिले नाही आणि पाच वर्षे सत्ता मिळाली नाही. तर, लगेच त्यांनी भाजपची वाट धरली. हेच दु:ख बारामतीला न विसरण्यासारखे होते. त्यामुळे, पर्यायी म्हणून त्यांनी डॉ. किरण लहामटे यांना ताकद दिली आणि त्यांना निवडून देखील आणले.  आता सत्ता आली. तर, ज्या मंत्रीपदासाठी पिचड भाजपत गेले होते. त्याच तालुक्यात मंत्रीपद देऊन पिचडांच्या नाकावर टिचून राजुरात लाल दिवा मिरवायचा. हेच धोरण शरद पवार यांनी आखले आहे.  म्हणून डॉ. लहामटे यांना राज्यमंत्री करुन त्यांच्याकडे आदिवासी विकास खाते देण्याच्या तयारीत असल्याची खात्रीशिर माहिती सुत्रांनी दिली आहे.
       
  माजी मंत्री मधुकर पिचड व पुत्र वैभव पिचड यांना पवार साहेबांनी पक्ष सोडू नये. असा सल्ला दिला होता. मात्र, भाजपचा चलता काळ लक्षात घेऊन म्हणा. की अन्य धमकी मार्गाने म्हणा पिचड भाजपत दाखल झाले. तत्पुर्वी विभानभवनाच्या बाहेर अजित पवार व वैभव पिचड यांची भेट झाली. तेव्हा देखील दादांनी विनंती केली होती. पण, सत्तेचा मोह म्हणा किंवा हतबलता ही फार वाईट असते. त्यामुळे, कोणाचे एक न जुमानता विखेंच्या मदतीने पिचड भाजपात दाखल झाले. अर्थात हा त्यांनी घेतलेला वैयक्तीक निर्णय होता. यास अगदी कोणाचेही फारसे समर्थन नव्हते. त्यामुळे, नाराजित प्रचार संपला आणि पराभव देखील झाला. जेव्हा पिचड साहेबांची पडती बाजू सुरु झाली. त्यानंतर त्यांना त्यांच्या जवळचे मित्र सोडून गेले. आता जे काही त्यांच्या सोबत आहेत. ते देखील थोड्याच दिवसात चालते होतील. तेव्हा खऱ्या अर्थाने साहेब एकटे पडतील. हेच एकटेपणाचे दु:ख काय असते. याची जाणिव करुण देण्यासाठी डॉ. लहामटे यांना बळ देऊन सगळे कार्यकर्ते स्वगृही आणायचे काम राष्ट्रवादी करु पहात आहे. पवार साहेबांना देखील एकटेपणात किती दु:ख झाले असतील. याची प्रचिती त्यांना जणू पिचड साहेबांना द्यायची आहे. म्हणूनच त्यांनी तालुक्यात मंत्रीपद दिले आहे. अर्थात या निर्णयामुळे अकोल्याच्या विकासाला गती मिळणार आहे. म्हणून दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ. अशी म्हण आहे. ती खरी ठरणारुन मंत्रीपदाने जनतेचा नक्कीच लाभ होणार आहे.
       
 नगर जिल्ह्यात बाळासाहेब थोरात यांना तर मिळालेच असून, डॉ. किरण लहामटे, रोहित पवार, शंकरराव गडाख व संग्राम जगताप यांना मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे. तर आ. जितेंद्र आव्हाड व अमोल मिटकरी यांना विधानपरिषदेवर घेऊन त्यांना मंत्रीपदाची संधी द्यावी. अशी मागणी होताना दिसत आहे.

  - सागर शिंदे
=============
                 "सार्वभाैम संपादक"
                 
               सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
                  -------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" १२५ दिवसात २४५ लेखांचे १४ लाख ८५ हजार वाचक)