प्राजक्त तनपुरेंच्या मंत्रीपदामुळे, डॉ. लहामटेंच्या मंत्रीपदावर गंडांतर ?


मुंबई :-
           राज्याच्या राजकारणात अमोलाग्र बदल होऊन गेले आहे. त्यातून सामान्य जनतेला खूप काही शिकायला मिळाले आहे. पण, एक बाकी नकी.! की, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून राहावा. इतकी आणिबाणीची परस्थिती निर्माण होते आणि भलतेच काहीतरी अनपेक्षित काहीतरी होऊन जाते. जसे की, कोणाला स्वप्नातही वाटले नव्हते. की, काँग्रेस शिवसेनेशी हात मिळवून सत्ता स्थापन करु शकते. कोणाला जराही कल्पना नव्हाती. की, अजित दादा रात्रीतून गणिते बदलून पहाटे शपथ घेतील आणि आता कोणाला विचार देखील आला नसेल. की, प्राजक्त तनपुरे मंत्री पदाची शपथ घेतील. कारण, राष्ट्रवादीेने रोहित पवार, संग्राम जगताप व डॉ. किरण लहामटे यांच्या दुनियाभर गौगवा केला आणि काल अचानक तनपुरे नाव पुढे आले. यात सर्वात मोठा फटका डॉ. लहामटे यांना बसू शकतो. कारण, ते प्रथम आमदार आहेत. राजकीय कौटुंबिक पार्श्वभुमी नाही, पुर्वापार राष्ट्रवादीचे नाहीत. उल्लेखनिय काम नाही. आहे ते फक्त कट्टर पिचड साहेब विरोधी आमदार. तरी देखील शरद पवार हे त्यांना राज्यमंत्री करायला तयार आहेत. पण, आ. प्राजक्त तनपुरे हे कॅबिनेट मंत्री तथा शरद पवार व अजित पवार यांचे अगदी जवळचे विश्वस्त जयंत पाटील यांचे भाचे आहेत. हे नाते इथेच थांबत नाही. तर, कोपरगावचे नवनिर्वाचित आ. अशितोष काळे यांची पत्नी आ. तनपुरे यांची मावस बहीण आहे. तर या पलिकडे त्या माजी आमदार नरेंद्र घुले यांची मुलगी आहे. आता उषाताई तनपुरे आणि नरेंद्र घुले पाटील यांची पत्नी ह्या संख्या बहिणी असून या दोघीजणी जयंत पाटील यांच्या बहिणी आहेत. त्यामुळे इतका मोठा दांडगा वशीला असताना. आ. तनपुरे यांचे पारडे आणखी किती जड हवे आहे.? यात आ. रोहित पवार यांचे नातेसंबंध नव्याने सांगायला नको. पण, नात्यागोत्यात आ. संग्राम जगताप हे देखील कोठे कमी नाही. पण, त्यांचा उपयोग किती होतो. हे पाहणे महत्वाचे आहे.

मंत्री व्हावं, ही जनतेची इच्छा.!

         वास्तव पाहता रोहित पवार यांचे नाव अद्याप चर्चेत नाही. ही एका अर्थाने चुकीची आणि अन्यायकारक बाब आहे. कारण, त्या व्यक्तीने अगदी अल्पवेळेत आणि वयात इतकी मोठी उभारी घेतली आहे. ती नक्कीच उल्लेखनिय आहे. त्यांनी स्वत: दिवस रात्र एक करून जनतेच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. अन्यथा माजी मुख्यमंत्र्यांचे विश्वस्त, मंत्री आणि स्थानिक उमेदवार राम शिंदे यांना पराभूत करणे, वाटते तितके सोपे आहे का ? खरंतर, पवार शब्दाचा पावर पडलाच. हे नाकारुन चालणार  नाही. पण, त्यांनी स्वत:चे अस्तित्व निर्माण केले. याकडे देखील दुर्लक्ष करता येणार नाही. ज्या पवार कुटुंबाने आमदार करण्यासाठी वलय निर्माण केले किंवा आश्रा दिला. त्याच पवार कुटुंबामुळे जर रोहित पवार यांचे मंत्रीपद नाकारले जाणार असेल. तर, तो निशंक अन्याय ठरेल.! त्यामुळे, रोहित पवार यांना मंत्रीपद मिळावे. ही नगरचीच नाही. तर, राज्यातीत तमाम युवा राष्ट्रवादी तरुणांची विनंती आहे.
       
आता राज्याचा समतोल राखताना तोडक्या जागांमध्ये राष्ट्रवादी व काँग्रेसला मोडका संसार उभा करायचा आहे. असे असताना अनेकजण मंत्री होण्यासाठी गुढग्याला बाशिंग बांधून बसले आहेत. त्यातल्या त्यात नगर जिल्ह्यातच मोठी ओढाताण होताना दिसत आहे. मंत्री होण्यासाठी रोहित पवार, संग्राम जगताप, प्राजक्त तनपुरे, शंकरराव गडाख, बाळासाहेब थोरात आणि डॉ. किरण लहामटे असे सहा नावे तरी सर्वाधिक चर्चेत आहेत. यात तनपुरे व थोरात ही दोन नावे निश्चित झाली आहेत. जर जिल्ह्यातच चार ते पाच मंत्री होत असतील. तर, राज्याचे नियोजन करणार कसे.? त्यासाठी वारंवार मंत्रीमंडळ विस्तार करुन खांदेपालट करीत प्रत्येकाला संधी द्यावी लागणार आहे.
           आता राज्याचा मंत्रीमंडळ विस्तार आणि जिल्हा परिषद अध्यक्ष निवड हे एकदी समोरासमोर आले आहे. गेली अनेक दिवस बोलले जात होते. की, तनपुरे यांच्याकडे अध्यक्षपद जाण्याची शक्यता आहे. पण, आता त्या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे. प्राजक्त तनपुरे यांचे नाव मंत्रीपदासाठी गेल्याने अनेक राजकीय गणिते बदलू शकतात. काल अचानक झालेल्या या निर्णयामुळे डॉ. किरण लहामटे यांच्या शपथविधीवर संदेह निर्माण होऊ लागला आहे. कारण, ते आमदार झाले. तर, पिचड साहेबांच्या राजकीय वाटचालीला खिळ बसू शकते. त्यामुळे, त्यांनी झेडपीत नकळत महाविकास आघाडी चालवून जवळचे मित्र तनपुरे यांना मंत्री करण्यासाठी प्रयत्न केल्याचे समजते आहे. त्यामुळे, झेडपीत आता भाजपची सत्ता येण्याचे चित्र धुसर होऊ लागले आहे.

फुलला नाही.! फुलविला.!

        जेव्हा प्राजक्त तनपुरे यांचे नाव समोर आले. तेव्हा महसुलमंत्री बाळासाहेब थोरात  यांनी देखील याच नावास पसंती दर्शविल्याचे समजते आहे. अर्थात हे नाव जयंत पाटील व अजित पवार यांनी प्रकर्षाने लावून धरले होते. तर, शरद पवार डॉ. लहामटें उदार होते. राज्याचा समतोल राखताना जर नगर जिल्ह्याला झुकते माप दिले. तर, डॉक्टर नक्कीच मंत्री होतील. अन्यथा त्यांना वेटींग पिरेड काढावा लागू शकतो. पण, त्या दरम्यानच्या काळात तालुक्यातील बहुतांशी राजकीय गणिते बदललेली असतील. म्हणून, ऐनवेळी त्यांच्या उत्सुकतेवर पाणी न फिरता आज त्यांना मंत्रीपद मिळो.! हिच प्रर्थना.!

  - सागर शिंदे
=============
                 "सार्वभाैम संपादक"
                 
               सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
                  -------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" १२५ दिवसात २४५ लेखांचे १४ लाख ८५ हजार वाचक)