"कैलास वाकचौरे पुन्हा राष्ट्रवादीत की, पिचडांच्या गृहप्रवेशाचे संकेत.?

आज नाही.! पर, कल साथ-साथ होंगे.!

 अकोले (प्रतिनिधी) :-                    अजुनही अकोल्याची माती पिचड कुटुंबाचे नाव विसरायला तयार नाही. इतकेच काय.! भंडारदरा धरण, निळवंडेसह तालुक्यातील २३ छोट्यामोठ्या धरणांचा लढा पिचडांनी उभा केला. पाटपाणी आणि खेड्यापाड्यातील रस्ता न रस्ता त्याची साक्ष देतो. पण, त्यांचा एक निर्णय चुकला आणि धरणांना गळती लागली, रस्त्यांना खळगी पडली इतकेच काय त्यांच्या सोबत ४० वर्षे सारथी असणारे निष्ठावंत देखील परतीच्या प्रवासाला लागले. परवा मिनानाथ पांडे, काल ईश्वर वाकचौरे आणि आज कौलास वाकचौरे यांनी आजवर मिळविलेले वैभव सोडले आणि राष्ट्रवादीत चालते झाले.  कोण आहेत हे बंडखोर.! याची ओळख तुम्हाला नक्कीच करुन दिली पाहिजे. काल झेडपीची बैठक झाली. त्यात गटनेते म्हणून कैलास वाकचौरे यांनी हकालपट्टी होणार. तोच त्यांनी शब्द फेकला. राष्ट्रवादी.! आयाम वीथ यू (मी तुमच्यासोबतच आहे) त्यामुळे, पिचड साहेबांना हा चौथा धक्का बसला आहे. वाकचौरे हे आता झेडपीत राष्ट्रवादीचे आणि अकोल्यात भाजपचे असणार आहेत.! अशी टिका त्यांच्यावर होऊ लागली आहे. पण, जिकडे सत्ता आणि भत्ता तोच आपला नेता.! हे समिकरण आता राजकारणात दृढ होत चालले आहे. वाकचौरे यांच्या पक्षबदलाने पिचड साहेबांना घरवापसीचे वेध लागले आहेत. सद्या अकोल्याच्या उतावीळ राष्ट्रवादीने कितीही बोळे लावून जुन्या लोकांना प्रवेश निषिद्ध केला. तरी, बारामतीतून पक्षाची दारे उघडी आहेत. याहुन महत्वाचे म्हणजे. स्थानिक नेत्यांनी राष्ट्रवादीची बैलगाडी आम्ही ओढतो आहोत. अशी धारणा मनी बाळगली असेल. तर तो त्यांचा गोड गैरसमज अाहे. तो त्यांनी बाजूला सारला पाहिजे. कारण, जे काही होते. ते थेट बारामतीहुन होते. आता बारामतीला यांनी विचारुन अकोल्याचा निर्णय घ्यावा. असे वाटत असेल. तर....आपण बाकी नि:शब्द आहोत.!
               
 तो काळ १९९५ चा होता. माजी मंत्री मधुकर पिचड यांना विरोध म्हणून तालुक्यातील सर्वच विरोधक एकवटले होते. यात सिताराम पाटील गायकर यांच्यापासून तर अगदी भाऊसाहेब हांडे यांच्यापर्यंत विरोधकांची भली मोठी माळ तयार झाली होती. आता जे काही करणार होते. ते फक्त जनता करणार होती आणि त्या पलिकडे साहेबांसोबत असणारी हो तोडकी मंडळी. तुम्हाला कल्पना नसेल. की, त्यावेळी कैलास वाकचौरे हे व्यक्तीमत्व कॉलेजच्या कट्ट्यावर बसून पुढारक्या करीत असे. गोर गरिब आणि गरजुंना त्यांनी आपलेसे केले होते. युवा तरुण त्यांच्या शब्दावर उदार होता. त्यांच्या पाठीशी विद्यार्थी संघटनेची मोठी फौज होती. जेव्हा पिचडांवर स्वाकियांनी आक्रमण केले. तेव्हा कैलाशपती त्यांच्या दिमतीला धावून आले. कोणीच नाही.! असे म्हणताना मराठ्यांची मोठी फौज त्यांच्यामागे ऊभी ठाकली. एकीकडे प्रस्तापित बंडखोर नेते आणि दुसरीकडे युवकांची तुकडी. तेव्हा, जनतेच्या मनात फार मोठा संभ्रम निर्माण झाला होता. नेते संभाळावीत की पिचड साहेबांवरील निष्ठा, परिवर्तन घडवावे की युवकांचा आवाज. या जनतेच्या द्वंद्वावर कैलास वाकचौरे यांनी सर्वात मोठी भुमिका बजावली. तुम्हाला विश्वास बसणार नाही. त्यावेळी जनतेच्या सुप्त लाटेने आणि चिरतरुणांनी जनादेश उभा केला आणि पिचड साहेब ३४ हजार मतांनी निवडून आले. याच विजयाच्या जल्लोषात कैलास वाकचौरे यांचा राजकीय जन्म झाला. तेव्हापासून तर आजवर हर एक प्रसंगात त्यांनी बडे साहेब व छोटे सरकार यांच्या पावलावर पाऊल ठेवले ते आजवर.!!

बिछडी यारी...!

           पण, पडत्या काळात तर मानसांची किंमत कळते. असे अध्यात्म सांगते. मागिल वर्षी वैभव पिचड निवडून आले आणि दुर्दैवाने राष्ट्रवादीची सत्ता गेली. पुढे पाच वर्षात त्यांच्या डोक्यात विकासाचे खुळ भरले आणि सत्तेच्या मोहापोटी त्यांनी पक्षबदल केला. अशात दुष्काळात १३ वा महिना पडला. भाजपला बहुमत मिळाले पण, शिवसेना फितूर झाली. इतकेच काय! पराभवाला देखील सामोरे जावे लागले. त्यानंतर, खऱ्या अर्थाने त्यांच्या राजकीय वाटचालीला उतरती कळा लागली. आता खरी कसोटी होती. की, पडत्या काळात कोण-कोण सोबत राहते.! पण, ज्या पांडे साहेबांना आदिवासी मित्र पुरस्कार देताना प्रचंड विरोध झाला. तेच मित्र मधुकर पिचड साहेबांना सोडून गेले. साहेब.! जर कधी राज्यात भाजपची सत्ता आली असती. तर यातला नेता सोडा. कार्यकर्ता देखील तुम्हाला सोडून गेला नसता. नेता, सत्ता आणि भत्ता यात बरेच काही दडलेले असते. निष्ठावंत असतो. तो फक्त कार्यकर्ता. त्यामुळे, ही तर आता एक सुरुवात आहे. वेळेनुरुप वातावरण बदलत राहिल. जे १९९५ ला तुमच्या विरोधात होते. ते आज तुमच्या विरोधात आहेत आणि जे विरोधात होते. ते सद्याप तरी समर्थनात आहे. त्यामुळे, यातून काय बोध घ्यायचा. हे सामान्य जनतेने तरी काय सांगावं.!
       

घ्यावं की नाही परत.!

 एका गोष्टीकडे नकळत मन डोकावते आहे. वास्तव पाहता विखे पाटील असो वा मधुकर पिचड यांना भाजपची विचारसारणी अगदी कधीच पटली नाही. पण, हतबलता आणि सत्ता याला या लालसेला कोणी अपिल करु शकत नाही. त्यामुळे, राष्ट्रवादी प्रणित पांडे साहेब स्वगृही परतले, त्या पाठोपाठ कैलास वाकचौरे देखील. आता गायकर साहेब राष्ट्रवादीत गेले. तर, चुकूनही आश्चर्य वाटू देऊ नका. याहुन महत्वाचे थेट सांगायचे झाले. तर, हे सर्व दुवा साधक बारामतीचे विश्वस्त आहेत. त्यांनी पुन्हा पिचड कुटुंब राष्ट्रवादीत आणले. तर, कोणाला संदेह नसावा. त्यामुळे, हे राजकारण आहे. येथे कोणता फासा कोठे बसेल काहीच सांगता येत नाही.!