"प्रातं" साहेब..! तुम्हाला आम्ही "जुमानत" नाही जा.! तहसिल, तलाठी लिपीकाची मुजोरी.! तिघांवर गुन्हा नोंदणार ?
चौघांवर गुन्हा होणार ? |
गुंजाळवाडी परिसरातील "वर्ग २ च्या अधिन" असणारी "सरकारी जमीन" शासनाने तुकाराम कांबळे यांना "कसण्यासाठी" दिली होती. त्यांच्या पश्चात कोणीही "वारस" नसल्याने ती पुन्हा "शासन दरबारी" जमा होणे आवश्यक होते. मात्र, महसूल अधिकारी व राजकीय संगनमताने कागदपत्रात फेरबदल करून ती बळकाविण्याचा प्रयत्न केला. असा आरोप सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ यांनी केला आहे. यात महसुल अधिकारी तहसिलदार अमोल निकम, लिपिक वसंत वाघ, तलाठी पोमल तोरणे, मंडल अधिकारी बाबासाहेब दातखिळे यांचे निलंबन करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. यासाठी त्यांनी मा. राज्यपाल, विभागीय आयुक्त नाशिक, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, संगमनेर यांच्याकडे १३ नोव्हेंबरला सर्व पुरावे सादर केले आहेत.
येथे वर्ग २च्या जमिनी वर्ग १ करुन दिल्या जातात.! |
महत्वाचे मुद्दे
मला काही माहित नाही.!
जे केले ते तहसिलदारांनी.!
मंडलअधिकारी बाबासाहेब दातखिळे यांनी दि.५ डिसेंबर २०१९ रोजीच्या लेखी खुलासा दिला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे. की, तहसिलदार यांचा आदेश असल्याने शहानिशा करणे आवश्यक वाटले नाही. म्हणून, नोंद मंजूर केली असा खुलासा सादर करून सर्व जबाबदारी तहसिलदार निकम यांच्यावर ढकलली आहे. आता हे असे असले. तरी, यांची या प्रकरणातून सुटका होईल असे वाटत नाही. कारण, जर मंडलला एखादा निर्णय गैर वाटत होता. तर, त्यांनी विरोध करुन प्रांत, कलेक्टर किंवा वि. आयुक्त यांना कळविळे आवश्यक होते. मात्र, प्रकरण घडून गेल्यानंतर हात वर करुन माफीचा साक्षिदार होण्यासारखे हे उत्तर वाटू लागले आहे.
काय आहेत आरोप.?
तहसिलदार
वर्ग २ ची जमीन कोणतीही शहनिशा न करता, बनावट वारस असताना, उताऱ्यावरील नावात बदल केला. यात कायदेशीर मार्गाचा अवलंब न करता. अधिकाराचा गैरवापर करुन अनाधिकाराने गुन्हेगारी वृत्तीला सहयोग केला.
मंडल अधिकारी.!
तहसीलदारांकडून जो कागद आला. त्याची कोणतीही शाहनिशा न करता. तो मंजूर केला. त्याची अंमलबजावणी केली. आवक जावक नसताना त्यावर पुढील निर्णय घेतला.
तलाठी
ज्या पत्राच्या आधारे अहवाल दिला. वेगळी जात, वेगळा वारस व कागदपत्रातील माहितीत असणारी विसंगती याकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष केेले व संगनमताने या प्रक्रियेत सहभाग नोंदविला आहे.
लिपीक
लिपीकने तहसीलला पत्र देत सांगितले. की, अर्जदाराचे म्हणणे मान्य करून तुकाराम कचरु कांबळे ऐवजी तुकाराम बबन कांबळे असे करावे. असे पत्र दिले. ज्यात आवक-जावक क्रमांक नाही. शासकीय पत्र नाही.गुन्हा दाखल करील
तेव्हाच शांत बसेल.!
मी आपल्याकडे विनंती करतो. की, माझ्या तक्रारीसह विभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाचे देखील पालन होत नाही. इतकी मोठी "मुजोरी" या अधिकारी व कर्मचाऱ्यांची वाढली आहे. त्यावर अंकुश बसविण्यासाठी पदाचा गैरवापर केलेल्या तहसिलदार, तलाठी, लिपिक, यांच्यावर म.ना.से (शिस्त व अपील) १९७९ नियमानुसार कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करावा.
- अमोल खताळ
(सामाजिक. कार्यकर्ते)
- सुशांत पावसे
(संगमनेर प्रतिनिधी)
=============
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" १०० दिवसात २०७ लेखांचे १४ लाख ५० हजार वाचक)