"राष्ट्रवादीच्याच नगरसेवकांकडून आ. लहामटेंची अवहेलना की हटीवाद..! हे वागणं बरं नव्हं.!!"
हाटीवादाबद्दल आभार.!! |
अकोले नगरपंचायतीत सद्या "सासु-सुनेसारखा" खेळ "राष्ट्रवादीच्या घरात" आता पहायला मिळू लागला आहे. घर तर एकच, पण "सासू आत आली, की सून बाहेर जाते, आणि सून आत आली; की सासू बाहेर जाते". अगदी तसेच चित्र दिसू लागले आहे. कारण, वैभव पिचड यांचा पराभव करून अकोल्यात सद्या राष्ट्रवादी काँग्रेसचा "आमदार" आहे. तर १५ "नगरसेवक" देखील "राष्ट्रवादीचेच" आहेत. मात्र, आमदार नगरपंचायतीत आले. की, १५ नगरसेवक बाहेर पडतात आणि आमदार बाहेर गेले; की १५ जण हजर होतात. त्यामुळे, या नाट्याने सासू-सुनासारखे "खळखट्याक" वैर अकोलेकरांना पहायला मिळत आहे. शनिवारी आ. डॉ. किरण लहामटे यांनी एक आढावा बैठक बोलविली होती. त्यासाठी सर्व नगरसेवकांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, विरोधी पक्ष भाजप व सद्याची सोबती शिवसेना यांच्यासह फक्त चौघांनी बैठकीला हजेरी लावली. बाकी राष्ट्रवादीच्या १५ नगरसेवकांनी गैरहजेरीला कारणे देत दांडी मारली. आता ही वरिष्ठ लोकप्रतिनिधींची "अवहेलना" म्हणायची की ! की "बेजबाबदारपणा" !! "दुर्लक्ष" म्हणायचे.! की, "नाराजी" ! "राजकीय आकस" म्हणायचा की "अनियोजित बैठकीचा परिणाम" हे जनतेला ज्ञात होणार नाही. असे म्हटले. तर तो निव्वळ मुर्खपणा ठरेल.! त्यामुळे, हे सत्तानाट्या आता दिवसेंदिवस रंगनार आहे. हे बाकी निच्छित.!!!!
आम्ही.! राष्ट्ररवादी भाजपचे.! |
अकोले नगरपंचायतीत एकूण १९ नगरसेवक आहेत. त्यापैकी १३ राष्ट्रवादी, २ अपक्ष, १ शिवसेना, १ भाजप व २ राष्ट्रवादीचे स्विकृत असे संख्याबळ आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीला एकहाती सत्ता असताना ४ विरोधातील नगरसेवकांत बैठक होणे. ही दुर्दैवी गोष्ट आहे. कदाचित हे वैभव पिचड यांच्या प्रवेशामुळे भाजपचे नगरसेवक झाले. असे आपण म्हणू.! पण, अजित दादा पवार हे पक्षादेश सोडून भाजपाशी हातमिळवणी केली. तरी त्यांच्यासोबत बंड पुकारणाऱ्या आमदारांनी शरद पवार साहेबांना एव्हाना राष्ट्रवादीला सोडले नाही. पक्षप्रेम म्हणा की व्यक्तीप्रेम त्यांनी अविश्वास दाखविला नाही. हाच विश्वास नगरसेवकांवर दाखविण्यात डॉक्टरसाहेब कमी पडले की काय ? असा सकारात्मक प्रश्न समोर येतो. किंबहुना एक प्रेमाचा किंवा निष्ठेचा आवाज दिला. तर, लोकं धावत येतात. हे कित्तेक ठिकाणी आपण पाहिले आहे. ही मोट बांधण्यात राष्ट्रवादीतील बहुजन नेते व लोकप्रतिनिधी कमी पडल्याचे दिसत आहे. आपल्याला एखाद्या समुहाने न स्विकारणे हेच मुळात आत्मपरिक्षणात्मक व क्लेशदायी आहे. त्यामुळे, नगरसेवकांची अनुपस्थिती हा तालुक्यासाठी चर्चेचा मुद्दा ठरला आहे.एक महत्वाची गोष्ठ म्हणणे, प्रशासनात एक नियोजन नावाचा प्रकार असतो. त्यात एखादी बैठक लावण्यासाठी अजेंठा काढावा लागतो. त्यात काय नियोजन आहे, काय विषय आहेत, कोणते ठराव आहेत हे निर्धारित करुन अधिकारी स्वाक्षरीने सर्व नगरसेवकांना पाठविणे बंधनकारक असते. पण, असे काही झाले नाही. शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास शिपाई फोन करतात. आमदार साहेब आढावा बैठक घेणार आहेत. त्यामुळे सर्वांनी हजर रहावे. अशा सुचना देण्यात आल्या. जमले तर या नाहीतर हरकत नाही. असे वरिष्ठांचे आदेश आल्याचे बोलले जाते. त्यामुळे, ४ नगरसेवक आले. मात्र, कोणी घरभरणीला गेले होते, कोणी पेशन्ट घेऊन रुग्णालयात गेले होते. कोणाला बातम्या पाहणे आवश्यक वाटत होते. तर कोणी आपापले गोरख धंद करण्यात व्यस्त होते. त्यामुळे, कोणी या बैठकीला महत्व दिल्याचे दिसत नाही.
असमर्थन हेच आपले समर्थन.! |
एकीकडे माजी आमदार वैभव पिचड यांना पराभव पत्करावा लागला. तर, दुसरीकडे आ. किरण लहामटे निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच नगरपंचायतीत डोकावले होते. त्यात त्यांचे अशा पद्धतीने स्वागत झाले. पण, जेव्हा वैभव पिचड यांनी आमदारकी सोडून भाजपात प्रवेश केला. तेव्हा ३ कोटी रुपयांचा निधी त्यांनी मंजूर करुन आणला होता. मात्र, दुर्दैव असे. की, भाजपची सत्ता गेली आणि या निधीला उद्धव ठाकरे सरकारने खिळ दिली. त्यामुळे, विकासाची सर्व गणिते बदलली आहेत. आता आमदारांना प्रश्न विचारणे हा मज्जाव आहे. कारण, ठराविक व्यक्तींचे ठरलेली उत्तरे पाठ आहेत. की, आत्ता तर कोठे ते आमदार झालेत. माजी आमदाराने ४० वर्षे काय केले ? या आणि फालतू प्रश्नांना समोरे जाण्यापेक्षा झाकली मुठ सव्वा लाखाली. पाच वर्षे वेट अॅण्ड वॅच.!================
अकोले तालुक्याचे कार्यक्षम तत्कालिन पोलीस निरीक्षक आदरणीय अविनाश शिळीमकर साहेब यांना आई तुळजा भवानी उदंड आयुष्य देवो. वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा.
- सागर शिंदे
=============
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" १०० दिवसात २०७ लेखांचे १४ लाख २ हजार वाचक)