आ."बाळासाहेब".!! हे "वागणं" बरं नव्हं.! राज्यात "युती" शहरात "घुट्टा".! अन् निव्वळ प्रलोभने.!

संयमी राजकारणी..!

             
संगमनेर (प्रतिनिधी) :-
                     राज्यात "शिवसेना, राष्ट्रवादीकाँग्रेसची" सरकार स्थापनेकडे वाटचाल सुरू आहे. त्यातच संगमनेरात "स्थानिक पातळीवर" सगळ्या पक्षांचे "वावडे" असणारे काँग्रेसचे "प्रदेशअध्यक्ष" बाळासाहेब थोरात यांनी "राष्ट्रीय पत्रकार" दिनानिमित्त "पत्रकारांशी संवाद" साधला. या दरम्यान ते म्हणाले. की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील शिवसेनेसह तीनही पक्ष एकत्र येऊ शकतात. अशा "अविर्भावात" त्यांनी "सुतोवाच" देत सगळ्यांना सोबत घेण्याची "वाल्गना" केली. राज्यात "भाजपला रोखण्यासाठी" ही "व्युहरचना" आखली असावी असे राजकीय विश्लेषकांना वाटते. मात्र, भावी मंत्री महोदय यांनी संगमनेरात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस एकत्र येतील असे भाकीत केले आहे. त्यामुळे, संगमनेरात सत्तेचे समीकरण कसे असेल या कडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

इथे येऊन माझ मुख्यमंत्रीपद गेले, तुम्हाला नगरसेवक काय मिळेल.!

     संगमनेरचा इतिहास पाहता आजवर शिवसेनेने नेहमीच आ. थोरतांच्या विरुद्ध उमेदवार दिला आहे. परंतु, महाशिवआघाडीमुळे आता प्रथमच "कट्टर वैरी सखे सोबती" होण्याची वेळ आली आहे. आता जिल्ह्यात काही काळातच झेडपी, नगरपरिषद, पंचायत समिती यांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आ. थोरात यांच्या अशा वक्तव्याने विरोधकांच्या "मनमे लड्डू फुटा" असेच काहीसे वातावरण निर्माण होऊ  लागले आहे. कारण, वर्षानुवर्षे मित्र पक्षांना संगमनेर मध्ये सत्तेचा वाटा साहेबांनी कधी मिळू दिला नाही. राज्यात कधी भाजप राज तर कधी सेना राज असतो. पण, दुनिया इकडची तिकडे झाली. तरी संगमनेरात थोरात राज असतो. मग राज्यात सत्तेसाठी आघाडीत असणारी राष्ट्रवादी देखील साहेबांना परकी वाटू लागते. त्यामुळे, त्याहुन दुर्दैव असे की, राज्याचे रिलेशन मेंन्टेन ठेवण्यासाठी ना पावसात भिजणारे पवार साहेब पक्षासाठी झिजणाऱ्या संगमनेरच्या कार्यकर्त्यांना बळ देतात. ना सडेतोड बोलणारे अजित दादा थोरातांना जाब विचारतात. कार्यकर्ता बिचारा सत्तेचा हकदार असूनही विरोधी बाकावर बसतो. यालाच तर म्हणतात संधीसाधू राजकारण.

अविनाश थोरात"वादी"

                 हे "अपशब्द" नाहीत, "इतिहास साक्षी" आहे. यापुर्वी नेहमीप्रमाणे राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी युती झाली होती. परंतु, स्थानिक स्वराज्य संस्थेत सत्ता बाळासाहेबांनी नेहमी संघर्षच घडवून आणला आहे. कारण, एकेकाळी संगमनेरात मित्रपक्षच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शत्रु झाल्याचे दाखले आपल्याकडे कमी नाहीत. थोडक्यात सांगायचे ठरले. तर, काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादी ही काँग्रेसला प्रमुख विरोधक म्हणुन एकाकी खिंड लढवत होती. संगमनेर नगरपालिकेत सन २००६ ते २०११ मध्ये राष्ट्रवादी, शिवसेना व  भाजप या तिघांनी एकत्र येऊन शहरविकास आघाडी स्थापन केली होती. त्यामध्ये, राष्ट्रवादीला सहा जागा मिळत राष्ट्रवादीचे अविनाश थोरात विरोधी पक्षनेतेपदी विराजमान झाले होते. राज्यात अलबेले आणि शहरात हल्लेगुल्ले करत साहेबांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची नेहमीच सत्तेची अवहेलना केली आहे. यावर, तोडगा काढण्याचे काम देखील वरिष्ठ पातळीहुन झाल्याचे दिसले नाही. त्यामुळे, राष्ट्रवादीचा सत्तासंघर्ष हा अविरत सुरूच राहिलेला दिसून येतो. याची खंत साहेबांना कधी वाटत नाही. कारण, स्थानिक नेते सत्तेत नको. पण, आमदारकीला त्यांनी बारामतीचा आदेश पाळावा. इतकी मापक अपेक्षा त्यांची असते. त्यामुळे, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना साहेब आमदार झालेले चालतात. परंतु, साहेबांना नगरपालिकेत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते वाटाघाटीतून नगरसेवक, सभापती किंवा नगराध्यक्ष झालेले चालत नाहीत. हाच तर "एकला चलो रे" चा गुण काहींना न पटण्यासारखा वाटतो आहे.

साहेब..! संगमनेर दुर्लक्षित करा ह.!

       सगळं मिळावं ते आपल्यालाच ही भुमिका केवळ नगरपालिकेतच नाही. तर, जिल्हा परिषद व पंचायत समितीला देखील राष्ट्रवादीने आजवर प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावली आहे. मागे पाहिले तर, पंचायत समितीत देखील सरुनाथ उंबरकर हे विरोधी पक्षनेते झाले. संगमनेरमध्ये काँग्रेसने राष्ट्रवादीला कधीही सत्तेत सहभागी करून घेतले नाही. सत्तेपासून नेहमी वंचित ठेवले आहे. याकडे पवार कुटुंब लक्ष घालायला तयार नाहीत व कोणाला घालु देत नसल्याचे अनेकदा बोलले गेले. त्याला दाखला देताना लक्षात येते. की, अ.नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पक्षनिरीक्षक तथा पालकमंत्री आ. दिलीप वळसे पाटील यांनाही हा तिढा सुटता सुटला नाही. इतकेच काय.! मधुकर पिचड यांनी देखील पठार भागावरील मतदान शाबुत रहावे म्हणून थोरातांना कधीही बोट लावले नाही. तरीदेखील राष्ट्रवादीचे हे मावळे स्वबळावर थोरातशाहीला शह देत राहिले. दोन वर्षे मागे गेले. तर लक्षात येते. की, हा संघर्ष २०१७ मध्ये नगराध्यक्ष पदासाठी प्रकर्षाने पहायला मिळाला. तेव्हा, राष्ट्रवादीचे उमेदवार शौकतभाई जहागीरदार यांनी ७ हजार मते घेतली होती.

                 सरुनाथ उंबरकर 

              (होय..! मी साक्षिदार)

वास्तविक पाहता, संगमनेरात राष्ट्रवादी व काँग्रेसचे मुंगसा-सापासारखे वैर राहिले आहे. राष्ट्रवादीने आ.थोरतांनवर वारंवार आरोप केला आहेत. की, साहेब जवळ घेतात व घात करतात. असा अविश्वासू व आत्मघाती आरोप असताना बाळासाहेब थोरात यांनी महाशिवआघाडी सत्ता स्थापन करेल असे सांगितले आहे. व भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कुठलीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत भाजपला येऊ द्यायचे नाही. असे संकेत जरी दिले असले तरी. ते राज्यात मर्यादीत राहतील. व संगमनेर करायचे की नाही. हे मात्र गुलदस्त्यात राहणार आहे. त्याची उकल वेळ आल्यानंतर लक्षात येईलच. मात्र, बोले तैस चाले. त्याची वंदावी पाऊले असे वागतील. असे कोणालाही वाटत नाही. त्यामुळे, आज राज्यात काँग्रेसला आच्छे दिन आणण्यासाठी अशी प्रलोभने देत असल्याची टिका त्यांच्यावर होऊ लागली आहे. आता साहेब आपल्या मनाचा मोठपणा दाखवून शिवसेनेला नगराध्यक्ष किंवा राष्ट्ररवादीचा सभापती करणार का ? कि येरे माझ्या मागल्या हेच संगमनेरात पहायला मिळणार. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

                - सुशांत पावसे

               (संगमनेर प्रतिनिधी)

==================

              "सार्वभाैम संपादक"
                 
               सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
                  -------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" १०० दिवसात २०० लेखांचे १२ लाख ५२ हजार वाचक)