आ. बाळासाहेब थोरातांनी "सत्तेसाठी" "मुस्लिमांचा "घात" केला !! "संगमनेरच्या" संघटनेचे थेट"सोनिया गांधींना" पत्र..!!

ताईंना पडली चिंता भाऊंना हवी सत्ता

संगमनेर (प्रतिनिधी) :- 
                  काँग्रेसची "व्होटबँक" समजल्या जाणाऱ्या "मुस्लिम समाजाने" चक्क प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनाच आव्हान दिल्याचे पत्र खुद्द सोनिया गांधी यांच्या "दिल्ली दरबारी" दाखल झाले आहे. आम्ही "पुरोगामी" आणि वैचारिक पक्ष म्हणून राज्यात ४४ आणि संगमनेरात थोरात यांना  निवडून दिले आहे. तुम्ही निवडून आल्यानंतर आता जातीयवादी शिवसेनेशी संगनमत करुन "सत्ता स्थापनेचा दावा" करू पहात आहे. त्यामुळे, आम्ही दाखविलेल्या "विश्वासाला" तुम्ही "मुठमाती" देऊन मुस्लिम समाजाचा "विश्वासघात" करु पहात आहात. त्यामुळे, आज तुम्हाला सत्तेत सहभागी होताना गोड वाटेल. परंतु, उद्याच्या काळात मुस्लिम समाज तुमच्यापासून दुर जाईल. हे काँग्रेसने विसरु नये. अशी "धमकीवजा सुचना" करणारे पत्र, दिल्लीत दाखल झाले आहे. आता, काँग्रेस पक्षाच्या या धोरणामुळे जबाबदार आ. बाळासाहेब थोरात यांनाच उघड-उघड विरोध होऊ लागला असून. मुस्लिमांची मते घेऊन "जातीयवादी" शिवसेनेसोबत जाण्याचा "चंग" थोरातांनी बांधला आहे. त्यामुळे, सरळ-सरळ ही "मुस्लिम" समाज्याची "फसवणूक" असल्याचे "पत्रकात" म्हटले आहे. 

या आल्लाह इनको सद्-बुद्धी दे..!

        पत्रकातील सविस्तर माहिती अशी की, राज्यात सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस पक्षाने शिवसेनेसोबत कोणत्याही परिस्थितीत आघाडी करु नये. अशी मागणी मुस्लिम समाजातील युवक कार्यकर्त्यांनी केली आहे. याला अनुसरुन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र  पाठविण्यात आले आहे. ते रोखठोक सार्वभौमच्या हाती आले असून त्यावर ९७ जणांच्या सह्या आहेत.  त्यात म्हटले आहे की, आपण शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षाबरोबर आघाडी करण्याचा घाट घातला आहे. तशा हलचाली सुरु असून आपल्या पदाधिकाऱ्यांची भाषा म्हणजे एक प्रकारे मुस्लिम समाजाची फसवणूकच काँग्रेसकडून झाली आहे. काही पदाधिकाऱ्यांच्या स्वार्थी हेतूपोटी शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षाबरोबर जावून पक्षाचे नुकसान करुन घेवू नये. अशी कळकळीची विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे. 
               माजी पंतप्रधान भारतरत्न श्रीमती इंदिराजी गांधी यांच्या १०२ व्या जयंती दिनाचे औचित्य साधून मुस्लिम समाजातील युवक कार्यकर्त्यांनी शहरातील इंदीरा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन हे पत्र सोनिया गांधी यांना पाठविले आहे. त्यात पुढे म्हटले आहे की, देशाच्या किंवा राज्याच्या राजकीय वाटचालीत काँग्रेस पक्षाच्या धर्मनिरपेक्ष विचाराला साथ व पाठबळ देवून मुस्लिम समाजाने पक्षाच्या धोरणाला नेहमीच पाठबळ दिले आहे. देशातील राजकीय वातावरण वेगळ्या दिशेने जाणारे असले, तरी लोकसभा, विधानसभा तसेच संगमनेर तालुक्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत मुस्लिम समाजाने नेहमीच काँग्रेस उमेदवारांना पाठींबा दिली आहे. इतकेच काय ! तर  त्यांना विजयी करण्यात देखील या समाज्याचा सिंहाचा वाटा आहे. असे असताना शिवसेना व भाजपसारख्या जातीयवादी पक्षांचा व विचारांचा पराभव आपण केला आहे.

ताई..! पत्रास कारण की...!

           
राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणाचा विचार केला, तर संगमनेर तालुक्याने मोठ्या मताधिक्क्याने निवडून दिलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.बाळासाहेब थोरात व पक्षाचे इतर पदाधिकारी सत्तेसाठी थेट शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षाबरोबर आघाडी करण्याची भाषा करु लागले आहेत. मात्र, हा प्रकार काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने अतिशय गंभीर असून पदाधिकाऱ्यांच्या या भूमिकेकडे मुस्लिम समाज पक्षापासून दूर जाईल. असा इशाराही देण्यात आला आहे. इतकेच काय !! या भूमिकेमुळे मुस्लिम समाजात आजच मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाल्याचे पत्रकात म्हटले आहे. पक्ष पदाधिकाऱ्यांकडून शिवसेनेसोबत आघाडी करण्याची कृती म्हणजे मुस्लिम समाजाची एक प्रकारे फसवणूकच असल्याची भावना सोनिया गांधी यांच्यासमोर मांडण्यात आली आहे. त्यामुळे, विरोधीपक्षात बसले तरी बेहत्तर. पण, जातीयवादी पक्षांसोबत जाऊन स्वार्थी धोरण स्विकारु नये. अशी विनंती मुस्लिम समाज्याने केली आहे.

 भाग २ नक्की वाचा
संगमनेरचे मुस्लिम मतदार आणि बाळासाहेब थोरात यांचे राजकारण..!! हा विश्लेषनात्मक लेख 

 - सुशांत पावसे

 (संगमनेर प्रतिनिधी)

==================

              "सार्वभाैम संपादक"
                 
               सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
                  -------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" १०० दिवसात २०० लेखांचे १२ लाख ५२ हजार वाचक)