डॉ. लहामटेंना "मंत्रीपद अशक्य"..! पण, "संधी" नक्की..! आ. "थोरात" असणार "जोरात"..!!


अकोले (प्रतिनिधी) :-
                    राज्यात "शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस" यांच्यात "महाशिवआघाडी"  होऊ घातली आहे. यावर जवळजवळ "मोहर" लागली असून. केवळ "वाटाघाटी"  वरुन बोलणी सुरु आहे. यात अनेक "आमदार" मंत्रीपदासाठी हपापले असून त्यांच्या "अपेक्षा उंचावल्या" आहेत. राज्याचे सोडा. पण, जिल्ह्यात चार मंत्रीपदे मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यात बाळासाहेब थोरात, रोहित पवार, शंकरराव गडाख संग्राम जगताप यांची वर्णी लागणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. राज्यात राष्ट्रवादीला समतोल राखण्यासाठी १४ जागा असणार असून पक्षात नवनिर्वाचित आमदार जास्त असले. तरी, अजित पवार, रोहित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, दिलीप वळसेपाटील, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक बडे नेते राष्ट्रवादीच्या अजेंड्यावर असणार आहे. आता जिल्ह्याचा विचार करता. संग्राम जगताप यांची अनपेक्षीत जागा त्यांनी स्वबळावर कशी आणली ते त्यांचे त्यांनाच ठाऊक. त्यामुळे जेष्ठ म्हणून त्यांना मंत्रीपद द्यावेच लागणार आहे. तर, ज्या राम शिंदेंना पवार घराण्याने चितपट केले. त्यांना मंत्रीपद मिळाले नाही. तर, कदाचित जनता रस्त्यावर उतरु शकते. त्यामुळे, दक्षीणेत दोन. तर, अपक्ष आमदार शंकरराव गडाख यांनी शिवसेनेला पुर्वीच पाठींबा दिला आहे. त्यामुळे, त्यांना सेनेकडून शब्द दिला गेल्याचे बोलले जाते. तर, संगमनेरात बाळासाहेब थोरात मागणारे नाही. तर देणारे आहेत. त्यामुळे, विधानसभा अध्यक्ष घ्यायचे. की, मंत्री, उपमुख्यमंत्री हे त्यांनीच ठरवायचे आहे. आता जिल्ह्यात चार मंत्रीपदे आली. तर, पाचवे मिळेल ही पहिली धुसरता आहे. थोरातांच्या शेजारी मंत्रीपद हे त्यांना तरी तसे रुचेल. दुसरी गोष्ट म्हणजे, जिल्ह्यात तीन ते चार मंत्रीपदे वाटली गेली. तर, मुंबई, पुणे, विदर्भ, मराठवाडा, खांदेश, नाशिक हा समतोल कसा राखायचा ? त्यामुळे, डॉ. किरण लहामटे यांना मंत्रीपद मिळेल. असे कोणतेही चित्र किंवा विचार बारामतीच्या यादीत नाही. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
            "रात्र" झाली कमी आणि "सोंग" झाले "फार" ही फार जूनी म्हण आहे. तसेच काहीसे या "महाशिवआघाडीचे" झाले आहे. कोणालाही सत्ता स्थापनेसाठी बहुमत सिद्ध करता आले नाही. त्यामुळे, राज्यात "राष्ट्रपती राजवट" लागू झाली. आता, १४५ चा "जादुई" आकडा पार करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस प्रयत्नशिल आहे. शिवसेनेला पाच वर्षे "मुख्यमंत्रीपद" तर दोन "उपमुख्यमंत्री" करून निवडून आलेल्या प्रत्येकाला कोठेतरी नटविण्याचे काम केले जाणार आहे. पण, काही झाले तरी, राष्ट्रवादीकडे गृहखात्यासह महत्वाचे खाते असणार आहे. तर, काँग्रेसला उपमुख्यमंत्री पदासह १३ मंत्रीपदे मिळू शकतात. असे अभ्यसकांना वाटते आहे. आता काही झाले. तरी, "त्रिसरकार" स्थापन करताना प्रत्येक पक्षाला राज्याचे "विभागिय संतुलन" राखावे लागणार आहे. त्यामुळे, हा "मेळ" कसा राखायचा हे तिन्ही पक्षांना "आव्हानात्मक" असणार आहे. आता काँग्रेसचा विचार केला. तर, नगर जिल्ह्यात श्रीरामपुरचे लहु कानडे व संगमनेरचे बाळासाहेब थोरात निवडून आले आहेत. त्यामुळे, थोरात यांनी उत्तरेत बळ वाढविण्यासाठी कानडे यांच्या डोक्यावर हात ठेवला. तर, विखेंची कोंडी करण्यासाठी तेथे लालदिवा मिळू शकतो. पण, त्याची शक्यता धुसर आहे. मात्र, ते स्वत: सत्तेतून बाहेर राहिले तर ते थोरात कसले. महसुल खाते घेऊन ते सरकारी यंत्रणेत जातील व काही दिवसांनी प्रदेशाध्यक्ष पदाचे बाशिंग सोडून ते दुसरे कोणाच्यातरी कपाळी बांधतील.
         राष्ट्रवादीचा विचार केला. तर, जामखेड ते अकोले आणि पारनेर ते नेवासा  सगळीकडे घड्याळाच्या काट्यांनी हैदोस घातला. यात, केंद्रबिंदू म्हणून नगर शहरात संग्राम जगताप यांचे शिट धोक्याचे वाटत होते. तरी, त्यांनी "कॅबिनेट मंत्रीपदाच्या" शर्यतीत असणाऱ्या राठोड यांना चितपट केले. त्यामुळे, लोकसभेत अडिच लाख मतांनी पराभव स्विकारणारे जगताप पुन्हा शहरातून आमदार होतात. ही अश्चर्याची गोष्ट आहे. त्यामुळे, त्यांचे मंत्रीपद व अरुणकाका जगताप यांना विधानपरिषदेची आमदारकी निच्छित मानली जात आहे. आता कोंडी झाली ती फक्त अभिषेक कळमकर यांची. पुढे पारनेर विधानसभेचा विचार करता. निलेश लंके यांची उमेदवारी जेव्हा निच्छित झाली. तेव्हाच त्यांच्या विजयावर देखील मोहर लागली होती. त्यामुळे, त्यांना मंत्रीपद मिळो ना मिळो. पण, कोठेतरी संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. थोडे पुढे सरकले असता श्रीगोंद्यात सत्ता होती तर बबनराव परभूत झाले आणि सत्ता आली तर विरोधात बसले. त्यामुळे, दैव फिरले की डोक्याला हात लावण्यापलिकडो काहीच शिल्लक रहात नाही. थोडे खाली सरकले तर, कर्जत जामखेड ही जिल्ह्यात नव्हे राज्यात गाजलेली फाईट होती. कारण, कित्तेक मंत्रीपदे डोक्यावर घेऊन फिरणारे शिंदे यांच्या विरोधात जनता एकवटली होती. तर, राेहित पवार यांनी जनतेच्या मनात घर केले होते. त्यामुळे, शिंदेंसह जनतेने भाजपला चांगलाच "राम-राम" ठोकला.     
                                         
आता, पार्थ अपयशी ठरले तरी रोहितच्या रुपाने पवार घराण्याचा वारसा पुढे रुढ होऊ पाहणार आहे. त्यामुळे,  त्यांना मंत्रीपद देऊन बळ दिले जाईल. असे अभ्यासकांचे मत आहे. नेवाशात गडाख कंपनीने वादळाचा अंदाज घेत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे, स्वबळावर लढलेल्या गडाखांना मंत्रीपद मिळेल असे निच्छितपणे बोलले जात आहे. शिवाजीराव कर्डीले यांना पराभूत केलेल्या प्राजक्त तनपुरे  व अशुतोष काळे हे यंग ब्रिगेड आहेत. आता कोठे आमदार झालेत. त्यांना संग्राम जगताप यांच्यासारखे  विधानसभेच्या कामकाजाचा अनुभव घ्यावा लागेल आणि मग यांना संधी दिली जाऊ शकते. अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
                   आता राहिला प्रश्न डॉ. किरण लहामटे यांचा. अर्थात राष्ट्रवादीचे मिरीट म्हणून ते निवडून आले आहेत. त्यासाठी खुद्द शरद पवार, अजित पवार, धनंजय मुंडे अशा मातब्बरांनी तालुक्यात हजेरी लावली आहे. अर्थात रोहित पवारांची जागा पवार कुटुंबाच्या अस्मितेची होती. तर, अकोल्याची लढाई केवळ प्रतिष्ठा व निष्ठेची होती. त्यामुळे, पाचपुतेंप्रमाणे पिचडांना धडा शिकविणे. हा एकमात्र हेतू पवारांचा होता. त्यामुळे, येथे मंत्रीपद मिळेल याची धुसर आशा असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आता, उथळ पाण्याला खळखळाट जास्त असतो. त्यामुळे, हे कोणाला पटो न पटो. पण, संगमनेरला मंत्रीपद आणि अकोल्यात देखील मंत्रीपद असे सद्या तरी शक्य नाही. तसेच, पठार भागावर सद्या डॉक्टरांची चलती आहे. त्यामुळे, मंत्रीपद मिळाले तर त्यांचे बळ वाढत जाऊन थोरातांचे मुल्य कमी होणार. यात शंकाच नाही. त्यामुळे, ४० वर्षे राजकारणात राहुन थाेरात साहेब पायावर धोंडा पाडून घेणार असतील. तर ते राजकारणी कसले ? त्यामुळे, ज्यांना बाेटाला धरुन खांद्यावर घेतले. त्यांच्याकडून आता कान ओले होणार नाही. याची खबरदारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी राज्यभर नक्की घेईल. यात शंकाच नाही. त्यामुळे, बोल्ड आमदारांना मंत्रीपदे मिळतील. बाकी डॉक्टरांसह अन्य व्यक्तींना कोठेतरी संधी मिळू शकते. असे सुत्रांचे म्हणणे आहे.

जनतेला वाटते ती यादी..!

सुचना :-

         हे पोर्टल कोणाची मक्तेदारी करीत नाही. जोवर डॉक्टर साहेब निवडून आले. तोवर त्यांची बाजू प्रकर्षाने मांडणारे हे एकमेव पोर्टल होते. तेव्हा त्यांचा चहा सुद्धा आपण नाकारला. आता ते निवडून आले. म्हणून त्यांची चाटूगिरी करीत बसायची आणि संधीसाधूपणा करायचा. हे पत्रकार म्हणून आमच्या तत्वात बसत नाही. त्यामुळे, कोणाला गोड वाटो वा कडू. जे जनतेला वाटते आणि शक्यता काय होऊ शकते. ते आम्ही मांडण्याचा प्रयत्न आजवर केला आहे. आणि तुम्हा नमुद करुन सांगतो. की, जे अंदाज आम्ही वर्तविले होते. ते सर्वस्वी नाही. पण, ७० ते ८० टक्के बरोबर ठरलेले आहे. त्यामुळे, आमच्या वाचकांना लवून मुजरा आणि द्वेषकांना कोलतो. बस इतकेच..!!
 - सागर शिंदे

==================

              "सार्वभाैम संपादक"
                 
               सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
                  -------------


(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" १०० दिवसात २०० लेखांचे १२ लाख ५२ हजार वाचक)