"बाप" गेला "पोरका" झाला तरी, मित्रा "जिगर" सोडू नको..!! "वाचा" आणि "शेअर" करा..!
आई बाबा परत या..!! |
अकोले -
आजवर तुम्ही आई-वडिलांचे "गोडवे" गाणारे खूप लिखान वाचले असेल. पण, "त्यांच्या पश्चात" त्यांच्या "कुटुंबावर" किती "बेवारसपणा" येतो. याचे चित्रण, "जेव्हा जावे त्याच्या वंशा. तेव्हाच कळे".!! हेच "वास्तव" आहे. होय..! मी "लेखक" त्याचाच "पीडित" आहे आणि "शेकडो निराधार" बेहाल झालेल्या कुटुंबांचा साक्षिदार..! त्यामुळे, तुमच्या कुटुंबाला पडत्या काळात कोण उभे करू शकते. तर ते तुम्ही स्वत: आहे. "बाप" गेला कुटुंबाचा "कणा" नक्कीच मोडतो. पण, जग संपत नाही. "आई" गेली. तर, घर "पोरकं" जरूर होतं. पण, त्याचे "अस्तित्व" संपत नाही. त्यामुळे, कधी "डॉ. आंबेडकर" होऊन तर कधी "झाशीची राणी" होऊन तुम्हाला "समाज्यात पाय रवून" उभे रहायचे आहे. स्वत:चे "अस्तित्व" निर्माण करायचे आहे. जेव्हा तुम्ही मोठे व्हाल, तेव्हा आपोआप तुमच्या यशाचे "प्रतिबिंब" आई-वडिलांच्या "ताठ मानेच्या" रुपाने "परावर्तीत" होईल. असे झाले. तर, भिंतीवरील "निर्जिव" फोटो देखील तुमच्या डोळ्यात डोळे घालून "अभिमान" व्यतीत करतील आणि नकळत "शब्दोच्चर" करतील. "लढ बाळा लढ"..!!
मोडून पडला "संसार" तरी मोडला नाही "कणा" पाठीवरती हात ठेवूनी "फक्त लढ़ म्हणा". ही "कुसुमाग्रजांची" कविता आजही "काळजाला भिडते" आणि "पाय" नसलेला माणूस "बुद्धीने" दौडू लागतो. खरंतर प्रत्येकात एक "सुप्तगून" म्हणून "सुर्यासारखा प्रज्वलित" गोळा असतो. फक्त त्याची ताकद बाहेर येण्यासाठी "योग्य वेळेची गरज" आवश्यक असते. म्हणून तर बाप गेल्यानतर "लाखो युवा प्रगतशिल" शेतकऱ्यांनी "काळ्या मातीत" जन्म घेतलेला पहायला मिळाले. तर "छत्र हरपलं" म्हणून कोणी "आयएएस, आयपीएस किंवा अधिकारी" झाले. "अनुकूल" परिस्थितीत कोणी यश मिळविले. तर, त्याचे फारसे कोणाला कौतुक वाटत नाही. पण, "प्रतिकुल परिस्थतीत" जर कोणी "छोटेखानी" यश मिळविले. तरी ते "आभाळाएवढे" असते. त्याचे कौतुकच नाही. तर, इतिहास नोंद घेतो. अशी लाखो उदाहरणे आपल्यासमोर आहेत. त्यामुळे, "येणारा दिवस येत जाईल, जाणारा दिवस जात राहिल" आपण लढत रहायचं. पण, यात "एक दिवस आपला" असतो हे नक्की म्हणून "माघार" घ्यायची नाही.
फक्त या सगळ्या "प्रेरणा" घेताना एक गोष्ट "अवर्जुन" लक्षात ठेवायची. "पडत्या काळात" कोणीतरी येतो आणि पाठीवर हात ठेऊन म्हणतो. "काळजी" करू नको. "मी आहे"...!! खरं "आयुष्य" तेथेच "संपून" जातं. दोन मिनिट आधार मिळतो आणि आयुष्यभर "तो आहे". असे समजून आपण जगत असतो. पण, जेव्हा "खरी मदतीची गरज" येते ना..! तेव्हा "तो" तुमच्या आसपास "कोठेही नसतो" आणि मग कळतं "आपलं कोण आणि परकं कोण".? म्हणून "एकटे" लढा. तर "स्वत:ची वाट स्वत: निर्वाल". कारण, तेव्हा मनात ठामपणे "दृढ" झालेले असेल. की, "समस्येवर उपाय काढणारा फक्त मी आणि मीच आहे"..! म्हणून "येईल दिवस तुझाही मानसा, जिगर सोडू नको"..! "वादळ वाऱ्यात, भयान वाटेत आधार सोडू नको"..! वेळ आली तर "एकटा लढ़" ही दुनिया "समोर रडेल" आणि "पाठमोहरी हसून" सांगेल. तो मुर्ख आहे..!! हीच रित आहे, या दुनियेची...!! म्हणून अत: दिप व्हा..!
मला चांगलं आठवतय, मी अनेक ठिकाणी "दुख:द प्रसंगांना" हजेरी लावली आहे. कोणतरी व्यक्ती मरतो, त्याचा सगळा "गोतावमळा" जमा होतो. घर "पोरकं" झालं. "कुटुंबाचा आधार" गेला. दोन-पाच मिनीट "भावनांचा कल्लोळ" माजतो. विधीवत अखेरचे नमन होते आणि कोणीतरी येतो अन म्हणतो. या कुटुंबाचा आधार आम्ही होऊ, कोणीतरी उठतो आणि म्हणतो, याच्या मुलींच्या लग्नाला हातभार लावू, कोणी म्हणतो "यथाशक्ती" मदत करू तर कोणी चार-दोन रुपये त्यांच्या हातात देतो. अर्थात वास्तव असे आहे. की, या "समाज व्यवस्थेला राजकीय बुरशी" लागली आहे. जेथे जावे तेथे "अश्वासने" द्यायची "घेणेरडी प्रथा" रुढ झाली आहे. जेव्हा विधीचा कार्यक्रम संपतो. त्यानंतर या "खचलेल्या" कुटुंबाकडे अक्षरश: कोणी "डोकून" देखील पहात नाही. जेव्हा "दुसरा कोणी मरतो", तेव्हा हे "बगळे" जमा होतात, "सामाजिक रिलेशन मेंन्टेन" करण्यासाठी. त्यामुळे, घर आपले आहे, त्याला सावरण्याची जबाबदारी लोकांवर ढकलू नको. बाबासाहेब म्हणतात, कोणीतरी येईल आणि तुमचा उद्धार करील. असे तुम्हाला वाटत असेल. तर, तो "निव्वळ मुर्खपणा" ठरेल. म्हणून, उठा..! "शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा". यातच तुमची उन्नती आहे.
===================
"प्रिय मृत्यु"
घेऊन चल मला
---------------------कधी नव्हे ! इतकी आज तुझी "प्रकर्षाने आठवण" आली..!
तू येवो ना येवो. पण, "मी स्वत:" धावत येऊन, तुला "कवटाळून" घेण्याची "इच्छा" झाली..!
----------------------
आजवर तुझ्या येण्यानं "मन" अगदी "कासाविस" होऊन, "काळीजही" गलबलून जायचं..!
नको नको त्या अंताचा "आभास". म्हणून, "भेदरलेलं" मनही काळजात "दडून" बसायचं..!
------------------------
पण, का कुणास ठाऊक, तुझ्या येण्याची "उत्कंठा" आज फार प्रकर्षाने "दाटून" आली आहे..!!
शब्दांनाही "निश:ब्द" करून मला तुझ्यात "एकरूप" व्हावसं वाटतं आहे.!
---------------------
कालवर "याचना" करून "दान" मागत असे मी तुझ्याकडे, माझ्या "जगण्याची".!
पण, काहीच कळेना आज "किंमत शुन्य" कशी झाली माझ्या "आयुष्याची".!
---------------------
म्हणून, तू "ये", आता मी "यत्किंचितही" मागे "सरणार" नाही..!
आठवण नको, नातं नको, अगदी "निखाऱ्यात" सुद्धा मी "उरणार" नाही.!!
-----------------------
फार "इच्छा" होती रे, "सार्थकी जन्मात" काहीतरी "ओळख ठेऊन जाण्याची"..!!
म्हणून तर, "लढलो, पडलो, उठलो, जिंकलो", तरी "हिंमत" नव्हती हारली कधी "जगण्याची"..!!
----------------------
तसेतर मी "जगही जिंकलेच" होते रे..! फक्त "आपल्यांनीच" माझा "घात" केला.
आता "धैर्य" संपले, "युद्धही" संपले. चल "ये" तू घेऊन जा मला. कारण, "खरोखर" आता "माझ्यातला सागर" खचून "पोखरून" मेला.
-----------------------
म्हणून, "प्रिय मृत्यु" आता म्हणू नकोस, "आज ना उद्या "वेळ" नाही मला.!
"काहीही" कर, "कसही" कर, पण, या "दुनियेतून" घेऊन चल मला..!
घेऊन चल मला..!!
---------------------
- सागर शिंदे
विनंती आहे. की, आपण वाचल्यानंतर ही लिंक शेअर करा. कोण जाणे, या लेखाने कोणीतरी लढायला सुरुवात करेल.! त्याच्या दुवा तुम्हाला मिळेल..!
- सागर शिंदे
==================
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ९२ दिवसात १७७ लेखांचे १२ लाख १२ हजार वाचक)