...तर "महिनाभरात" पुन्हा "वैभव पिचड" किंवा "भांगरे" कुटुंबाला "आमदारकीची" संधी..!
- सागर शिंदे
अकोले (प्रतिनिधी) :-
"राजकारणात" काही "योगायोगाच्या" गोष्टी असतात. हे कधीही "नाकारुन" चालत नाही. जसे "सहा" वेळा "वेगवेगळ्या पक्षातून" पिचड साहेबांच्या विरोधात "नशिब आजमाविणारे" अशोकराव भांगरे नियमित "पराभूत" झाले. तर, राष्ट्रवादीच्या लाटेत "कोणाला माहित" नसणारे डॉ. लहामटे अगदी "सहज आमदार" झाले. त्यामुळे, कोणावर कधी कशी वेळ येईल. हे सांगता येत नाही. कोण जाणे..! वैभव पिचड यांना येत्या काही महिन्यात "पुन्हा आमदार" होण्याची "संधी" मिळू शकते. तर, डॉ. लहामटेंना "पुन्हा संघर्ष" करावा लागू शकतो. अर्थात, ही विधाने तुम्हाला "फालतू" वैगरे वाटत असेल. पण, ते "इतिहासाचा आधार" घेतला. तर, त्यांना "वास्तवाची" देखील "बाजू" आहे हे नाकारता येणार नाही. कारण, "इतिहासाची पुनरावृत्ती" होत नाही. असे जर कोणाला वाटत असे. तर, तो "निव्वळ मुर्खपणा" ठरेल. स्पष्टच सांगायचे ठरले. तर, १९७८ ते १९८० ची "राजकीय पुस्तके" उचकली. तर, लक्षात येते. की, मागील ३० वर्षापुर्वी शरद पवार यांचे "पुलोद" सरकार केंद्र शासनाने "बरखास्त" करून महाराष्ट्रात "राष्ट्रपती राजवट" लागू केली होती, त्यावेळी १९७८ ला "यशवंतराव भांगरे" यांनी "पराभूत" केलेल्या "मधुकर पिचड" यांना १९८० ला पुन्हा झालेल्या "मध्यावधी निवडणुकांमध्ये" यश मिळाले आणि ते "आमदार" झाले होते. आज देखील "तशीच काहीशी परिस्थिती" राज्यात निर्माण झाली आहे. त्यामुळे, "पराभूत" झालेले "वैभव पिचड" यांना पुन्हा आमदार होण्याची संधी मिळू शकते. असेच "इतिहास" सांगतो.
साहेब हैव हि जायचे अन दैवही जायचे ह..! |
आज "शिवसेना-भाजपला" जनतेने कौल दिला आहे. मात्र, "मुख्यमंत्री पदाहुन" त्यांचे "घोडे" पाणी "पेईनासे" झाले आहे. त्यामुळे, "सत्ता स्थापनेचा कालावधी" संपत आला असून, जर कोणी "बहुमत" सिद्ध करू शकले नाही. तर, राज्यात पुन्हा "राष्ट्रपती राजवट" लागू होईल. परिणामी पुन्हा "मध्यावधी निवडणुका" होतील. असे झाले. तर, "पराभूत उमेदवारांचे गंगेत घोडे न्हाले". असेच समजावे लागेल. या शक्यतेला दाखला देताना सांगता येते की. ७ मार्च १९७८ ते १८ जुलै १९७८ असे १३४ दिवस "महाराष्ट्रात" वसंतदादा पाटील "मुख्यमंत्री" होते. मात्र, "रेड्डी काँग्रेस व इंदिरा काँग्रेस" यांचे ४० आमदर "फोडून" शरद पवार "बाहेर पडले" व "जनतादलाशी" संगनमत करून "पुरोगामी लोकशाही दल" स्थापन करून नवे सरकार गठित केले. त्याचे मुख्यमंत्री खुद्द शरद पवार होते. दरम्यान १९७८ ला ज्या निवडणुका झाल्या होत्या. त्यात मधुकर पिचड यांनी पहिल्यांदाच नशिब आजमाविले होते. परंतु, त्यांचा दारुन पराभव झाला व खरी लढत यशवंतराव भांगरे व जनता दलाचे एकनाथराव देशमुख यांच्यात झाली होती.
भाजप शिवसेनेचा टाइम ऑफ |
असे झाले तर सोन्याहून पिवळे..! |
किंवा १९८० नंतर ३ जानेवारी १९८२ ला यशवंतरावांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात राजाराम भांगरे यांनी एस काँग्रेसकडून पिचड साहेबांना शह देण्याचा प्रयत्न केला. पण, तो अयशस्वी ठरला. अखेर १९८९ साली अशोकराव भांगरे यांनी जनता दलाकडून उमेदवारी मिळवत भांगरे कुटुंबाची परंपरा पुढे कायम ठेवली. तरी, अपयश आले. पण, जर आता मध्यावधी निवडणुका लागल्या. तर, बारामतीहुन भांगरे कुटुंबात तिकीट मिळाले. तरी एक अधूरी कहानी पुर्ण होऊ शकते. अशी शक्यता देखील वर्तविण्यात येेते. त्यामुळे, आजची रात्र, काहींसाठी निराशेचा "किरण" ठरु शकते. तर, अनेकांसाठी आशेचा देखील "किरण" ठरु शकते. आता काही तास फक्त वेट एण्ड वॉच..!!
सागर शिंदे
==================
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ९२ दिवसात १७७ लेखांचे १२ लाख १० हजार वाचक)