"सत्ता संघर्षातून" ठाकरेंनी तर "ईडिच्या रुपानं" पवारांनी "दिल्लीचे तख्त" झुकविले..! म्हणून "गर्जा महाराष्ट्र" माझा..!!

साहेब..! बास की अजून परखड बोलू.!!

 - सागर शिंदे

अकोले (प्रतिनिधी) :-
                     "तुझं माझं जमेना अन् तुझ्यावाचून करमेना"..! हेच वाक्य आजवर आपण "शिवसेना-भाजप" बाबत एकत आलो आहोत आणि तिच "परंपरा" या दोघांनी पुढे "कायम" ठेवल्याचे "महाराष्ट्रातील जनतेला" दिसत आहे. या सगळ्यात जनतेचा विचार होताना कोठेच दिसत नाही. एकीकडे "अवकाळी" पावसाने शेतकरी खचला आहे आणि दुसरीकडे जनतेने ज्यांना कौल दिला. ते मुख्यमंत्री पदासाठी खुर्च्यांची ओढाताण कारणाना दिसत आहे. त्यामुळे, आता जनतेला खरोखर  वाटू लागले आहे. की, "झक मारली आणि मुंबई पाहिली", हेच तर "लोकशाहीचे दुर्दैव" आहे. "शिवसेनेची बाजू मांडताना" संजय राऊत "फुल जोमात" आहेत. तर, या "ताठर भुमिकेमुळे" भाजप "फूल कोमात" गेली आहे. या "तु तू-मै मै" मध्ये राज्यात पुन्हा "राष्ट्रपती राजवट" लागू होण्याची वेळ आली आहे. असे झाले. तर, "महाराष्ट्रात" पुन्हा "मध्यावधी निवडणुका" होतील. असे "राजकीय विश्लेषकांचे मत" आहे. त्यामुळे, जर कोण्या एकाही पक्षाला "बहुमत" सिद्ध करता आले नाही. तर, १७ फेब्रुवारी  १९८० प्रमाणे "फेर निवडणुकांचा" घाट जनतेला पहायला मिळेल. तेव्हा मात्र परिस्थिती फार म्हणजे फार वेगळी असेल. पण, हे दिवस येण्यापुर्वी "शरद पवार" हे "व्यक्तीमत्व" अशा प्रकारे उद्भवणारी "राजकीय आणिबाणी" हताळण्यात अगदी माहिर आहेत. त्यामुळे, उद्या राज्याच्या राजकारणात "वेगळेच काहीतरी रुप" पहायला मिळाले. तर, वाईट वाटू देऊ नका.

तोंड दाबून बुक्यांचा मारा 

           "ताटात आहे पण खाता येईना"..! अशीच काहीशी गत सद्या "भाजप-शिवसेना"ची झाली आहे. जनतेने "कौल" दिला. मात्र, त्याचा मेळ बांधताना दोन्ही पक्षांच्या नाकीनव आले आहे. खरतर "चूक कोणाची"..!! याचा अभ्यास केला. तर, "भाजपने शिवसेनाला" २०१४ व २०१९ च्या "लोकसभा निवडणुकीत" फार "अवहेलनात्मक वागणूक" दिली आहे. राज्यात "मुंबईवर अधिराज्य" गाजविणारी "शिवसेना" "केंद्रीय सत्ता वाटपात" रामदास आठवले यांच्या पंगतीला बसविले गेले. तेव्हापासूनच ही "खदखद" उन्मळू पहात होती. २०१४ पासून ५०-५० टक्के फॉर्म्युला भाजपने ढाब्यावर बसविला होता. म्हणून तर "शिवसेनेचे मंत्री" खिशात "राजीनामे" घेऊन फिरत होते. शिवसेना सत्तेत होती. मात्र, भाजपने तिला नेहमी "सावत्र" वागणूक दिल्याचे बोलले जाते. पण, "संयम बहोत बडा बलवान होता हैं"! तेच पहायला मिळाले. "कालचे सावत्र" आज "किंग मेकरच्या" भूमिकेत आले आहे. त्यामुळे, नेहमी "गुरगुर" करणारे वाघ आता कुठे "डरकाळी" फोडताना दिसू लागले आहे.

हात जोडले बुवा या महायुतीला ..!

        एक गोष्ट प्रामुख्याने नमुद करावीशी वाटते. की, "भाजपने-शिवसेनेशी" सलोखा ठेवला. पण, त्यांना "संवाद" ठेवता आला नाही. मी पुन्हा येईल..! मी पुन्हा येईल..! यापेक्षा आम्ही "महायुती" घेऊन पुन्हा येऊ..! असे म्हटले असते. तर, कोठे "अहंमभाव" दुखावला नसता. पण, भाजपने "अजगरासारखे" खाने आणि "फुगिरपणा" शेवटपर्यंत सोडला नाही. अखेर फुटून बाहेर पडायची वेळ आली. त्यांच्या अशा वागण्याने आज "राजकीय अस्थिरता" निर्माण झाली आहे.
         २०१४ साली जनतेने भाजपला "कौल" दिला होता. त्या तुलनेत  आज १७ जागा कमी आहेत. पण, तरी देखील "महायुती" म्हणून जनतेने दोन्ही पक्षांना "स्विकारले" आणि "संधी" दिली. पण, त्याचा "गैरफायदा" होत हा प्रयोग जनतेवरच उलटला आहे. कारण, एकीकडे "सरकार स्थिर" नाही.  तर, दुसरीकडे अवकाळी पावसाने "शेतकरी अस्थिर" झाला आहे. ही "व्यथा" मांडायची कुणापुढे..! त्यासाठी अपक्ष आमदार बच्चु कडू सारखे "लोकनेते" राज्यापालाच्या दरबाराची वाट धरु लागले आहे. अशी "बेवारस परिस्थिता" महाराष्ट्राने कधी अनुभविली नव्हती.

तुमची नौटंकी झाली की मला सांगा..!

        एकीकडे शरद पवारांसारखा माणूस शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन "बळीराजाचे डोळे पुसत आहे". आम्ही विरोधीपक्ष म्हणून बसायला तयार आहोत. असेही स्पष्ट करून मोकळे झाले आहेत. तर, दुसरीकडे आख्या महाराष्ट्राने "शिवसेनेचे वजीर" राऊत यांना डोक्यावर घेतल्याचे दिसते आहे. खरंतर, शिवसेनचे ठरले होते. जर, "मुख्यमंत्री" पदासाठी "अनुकूल परिस्थिती" निर्माण झाली. तर, राऊत सोडून कोणीही भाष्य करणार नाही. झालेही तसेच. "मातोश्रीचा" आदेश येतो आणि "सामना संपादक" आपली "जबाबदारी" पार पाडतात. यात नवं काय आहे. हे स्वत: राऊत साहेब स्पष्ट करतात. त्यांचा "सत्तासंघर्ष" त्यात नुकसान "राज्याचे" आणि "शेतकऱ्यांचे" हे अंधजनतेला दिसेनाच. ते राऊतांचे कौतुक करण्यात "व्यस्त" आहेत. पण, यांच्या "पदांसाठी" शेतकरी "मरु" लागलाय. हे कोणालाच कसे दिसेना..! त्यामुळे "लोकशाही अंधळी" झाली की काय.? असा प्रश्न अभ्यसकांना पडू लागला आहे.
         खरंतर "तरुण भारतचे" संपादक "गजानन निमदेव" भाजपची बाजू मांडताना म्हणतात. की, ५०-५० टक्के "सत्तावाटप" ठरली होती.  तर, तुम्ही भर "सभेतून" का प्रतित केली नाही. त्याची "वाच्चता" कधीच का केली नाही. आता, सत्ता स्थापनेला "गरज" भासू लागली. तेव्हा ५०-५० टक्क्याचा "फॉर्म्युला" बाहेर येऊ लागला आहे. खरेतर, "ज्याचे जास्त आमदार" त्याचाच "मुख्यमंत्री" हेच सरळ-सरळ गणित ठरले होते. पण, आता शिवसेना "आडून" पाहत आहे. खरे पाहता, जनतेने जो महायुतीला "कौल" दिला आहे. त्या "जनतेचा अपमान" शिवसेना करीत आहे. यात "सत्यजित तांबे" यांनी "तेल" ओतून "अदित्य ठाकरे" यांना संधीचे सोने करा. लहान आहे. म्हणून संधी सोडू नका. असे "आवाहन" केले आहे. राेहित पवार ठाकरेंच्या संपर्कात आहे. "काँग्रेस" शिवसेनेला "पाठींबा" द्यायला तयार आहे. "राष्ट्रवादी" तर "उपमुख्यमंत्रीच" काय !! "मुख्यमंत्री" पदावर "टक ढाळून" बसली आहे. त्यामुळे, पावसाळी नुकसान, पिक विमा, हंगामी अनुदान यांपासून शेतकरी "बेवारस" राहतो की काय ? असा प्रश्न "बळीराजालाच" पडला आहे.

        या "सत्ता संघर्षातून" भाजपने एक बाकी नक्की "धडा" घेतला आहे. "हरियाना, कर्नाटकसह" सगळीकडे त्यांची "नाटकं" चालली. मात्र, "ईडीच्या" मुद्द्यानं शरद पवारांनी तर "सत्तेच्या रुपानं" शिवसेनेने "दिल्ली झुकविली". हे "त्रिवार सत्य" आहे.

सागर शिंदे 

==================

              "सार्वभाैम संपादक"
                 
               सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
                  -------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ९२ दिवसात १७७ लेखांचे १२ लाख २ हजार वाचक)