"मध्यरात्री" शरद पवार व उद्धव ठाकरे यांची "एक तास" बैठक.! पहिला "मुख्यमंत्री" शिवसेनेचाच.!
उद्धवा..! अजब तुमचे सरकार.! |
अकोले (प्रतिनिधी) :-
कालपर्यंत जी शिवसेना "महाराष्ट्राची सत्ता" स्थापन करण्यासाठी कधीकाळी "भाजपला मातोश्रीवर" बोलवत होती. तीच "शिवसेना" आता सत्ता स्थापन करण्यासाठी रात्री अपरात्री "मातोश्री" सोडून "सिव्हर ओक" (शरद पवारांचे निवासस्थान) वर जाऊन "गुप्तगू" करू लागली आहे. असे असले. तरी, "बाळासाहेबांचे स्वप्न" साकार करण्यासाठी हीच "नामी संधी" असल्याने "दोन पाऊले मागे" सरकण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. म्हणूनच शरद पवार यांनी देखील काही मागण्या "शिथील" करुन "प्रथम मुख्यमंत्री शिवसेनेचाच" करु अशी भुमिका घेतली आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे, महाशिवआघाडीला "पुर्णविराम" देऊन "महाविकासआघाडी" स्थापन करण्यात आली असून शिवसेनेला १६, राष्ट्रवादीला १४ व काँग्रेसला १३ जागांचे वाटप होण्याची शक्यता आहे. यात, उद्धव ठाकरे, सुभाष देसाई किंवा एकनाथ शिंदे यांची नावे "मुख्यमंत्री" पदासाठी चर्चेत आहेत. तर, राष्ट्रवादीकडून "उपमुख्यमंत्री" पदासाठी अजित पवार यांचे नाव आघाडीवर आहे. तसेच काँग्रेसमध्ये बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण व अशोक चव्हाण या तिघांची नावे "उपमुख्यमंत्री" व "विधनसभा अध्यक्षासाठी" चर्चेत आहे. हे सर्व गणित आज सायंकाळपर्यंत सुटून "मंगळवारी" राज्यपालांकडे "सत्ता स्थापनेचा दावा" व २०२० च्या शुभमुहुर्तावर "शपथविधी" घेण्यात येणार असल्याची माहिती "विश्वसनिय" सुत्रांनी दिली आहे.
आता रडून काही फायदा नाही, वेळ गेली. |
"महाराष्ट्राचे सरकार स्थापन" करण्यासाठी अगदी "बोटावर मोजता येईल" इतक्या तोडक्या दिवसांचा "कालावधी" बाकी आहे. त्यामुळे, "शेकडो बैठका" आणि "हजारो भेटीगाठी" झाल्यानंतर गुरुवारी (दि.२१) रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास उद्धव ठाकरे, अदित्य ठाकरे, संजय राऊत व शरद पवार यांच्यात एक तास १० मिनिटे चर्चा झाली. यावेळी, मुख्यमंत्री प्रथमत: शिवसेनेचा असावा अशी महत्वपुर्ण मागणी करण्यात आल्याचे सागितले जाते. याची दोन महत्वाची कारणे म्हणजे. ज्या भाजपनं शिवसेनेचा अंत पाहिला आणि इतकी घुसमट करण्याची वेळ आणली. त्यांच्या नाकावर टिचून विधानभवनावर भगवा फडकविण्यासाठी शिवसेना उत्सुक आहे. अन्यथा इतकी ताणाताण केल्याचा फायदा काय ? हे खुलेआम सांगण्यासारखे एक कारण. तर, दुसरे गुपित म्हणजे. ज्या शरद पवारांना धुरंधर म्हणतात, त्यांनी जर पहिल्यांदा मुख्यमंत्रीपद दिले. तर, अडिच वर्षानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री होईलच. ते ही पवार साहेब केद्रस्थानी असताना. हे जर कोणी ज्योतीषी सांगू शकेल. तर तो नक्कीच फक्त भाजपचा भविष्यकार असू शकतो. यात तिळमात्र शंका नाही.
चला निघा घरी, वाजविले की बारा..!! |
त्यामुळे, पहिला मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा म्हणताच ठाकरे साहेबांच्या चेहऱ्यावर घड्याळाने १२ बाजविले होते. मात्र, पवारांनी शिवसेनेलाच रात्री १२ वाजता गोड न्युज दिल्याचे बोलले जाते. आता हे १२ म्हणजे १२ मती, जन्मदीन १२ तारिख आणि १२ वा महिना त्यात १२ व्या महिन्यात शपतविधी घेणार त्यामुळे साहेबांनी पहिल्यांदा ठाकरे यांच्या चेहऱ्यावर १२ वाजून दिले आणि १२ लाच त्यानी तुमचा पहिला मुख्यमंत्री असे सांगितले. त्यामुळे, या सरकारचे १२ वाजणार नाही. अशी आशा आपण बाळगली पाहिजे.
काळजी करू नको.! तुला चांगलं पद आहे. |
- सागर शिंदे
==================
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" १०० दिवसात २०७ लेखांचे १२ लाख ९५ हजार वाचक)