"मुख्यमंत्री" उद्धव "ठाकरे" व उपमुख्यमंत्री थोरातच का ?

मुख्यमंत्री....उपमुख्यमंत्री..!

संगमनेर (प्रतिनिधी) :-
                  "शिवसेनेचा मुख्यमंत्री" होण्यासाठी जी महिनाभर खटाटोप सुरु होती. ती आता "फळाला लागली" आहे. काही झाले. तरी, "शिवसेनेचाच मुख्यमंत्री" होणार !! असे "ठणकाऊन" सांगणाऱ्या राऊतांचे "स्वप्न" सत्यात उतरले असून फक्त "समोरासमोर बोलणी" करणे बाकी आहे. या सर्व घडामोडीत शिवसेनेला सहजासहजी काही मिळाले नाही. तर, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने त्यांचा जवळजवळ अंतच पाहिला आहे. असे म्हटले तर महिनाभराची फरपट पाहता, कोणाला या विधानावर "आक्षेप" घेऊ वाटणार नाही. त्यामुळे, एकट्या राऊतांचे "तोंडबळ" आणि उद्धव ठाकरे यांचा "कोंडमारा" लक्षात घेता. आघाडीतील सर्वच धुरंदर "सुखासुखी" भगवा फडकू देणार नाहीत. त्यामुळे, अदित्य ठाकरे तर अद्याप खूप लहान आहेत. मात्र, एकनाथ शिंदे यांना देखील हे "सत्तापिपासू" बोटावर खेळवतील. त्यामुळे, उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री पदाच्या पात्रतेचे आहेत. हे संजय राऊत पुर्णत: जाणून बसले आहेत. म्हणून, दुसरे कोणी नको. उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असावेत. अशी "रि" संजय राऊत यांनी ओढली आहे. आता जास्त काही बोलण्यापेक्षा त्यांचे नाव "संजय" आहे आणि हे नाव महाभारतात "सॅटेलाईट" ची भुमिका बजावून येणाऱ्या "वादळाची पुर्वकल्पना" देत होते. त्यामुळे, "धुरंधरांचा लगाम" फक्त "उद्धवाचेच सरकार" आकळवू शकते. अन्यथा भविष्यात "इडीच्या नोटीसा" शिवसेनेला देखील असतील. हे नाकारुन चालणार नाही.

सोशल मीडियावरील संग्रहीत.!

                  सन १९९९ चा भाजप-शिवसेनेचा "सत्ता स्थापनेचा" वाद "चव्हाट्यावर" आला आणि यात काँग्रेस, राष्ट्रवादी व अपक्षांनी "हात धुवून" घेत "सरकार स्थापन" केले. याचा "तोटा महायुतीला" १५ वर्षे "विरोधात" बसून सहन करावा लागला. या दरम्यानच्या काळात आघाडीतील नेत्यांनी आपल्या स्थावर "मालमत्ता" अगदी "गडगंज" करुन ठेवल्या. सामाजिक संस्था, शिक्षण व सहकार क्षेत्रात यांचे पाय इतके "घट्ट" करुन ठेवले की, सहकारावर यांच्या निवडणुका उभ्या राहिल्या. हे सर्व चालवत असताना कर्ज घ्यायचं आणि व्यावहार दाखवायचा. म्हणून तर राज्यावर २०० कोटीपेक्षा जास्त कर्ज आघाडीच्या काळात झाले. या बेहीशोबी मालमत्तेत छगनराव भुजबळ आत गेले. तर,  आदर्श, सिंचन, कारखाने आणि बँक घोटाळ्यांत बड्याबड्या नेत्यांना इडीच्या नोटीसा निघाल्या. अर्थात हे कोणत्या कारभाराचे फलित आहे. हे नव्याने सांगायला नको. त्यामुळे, हे सर्व मातब्बर राजकारणी असून आघाडीतील नेत्यांनी चांगलेच दळून मळून खाल्ल्याने त्यांच्या चौकशा सुरु आहेत. या अनुभवी खेळाडुंमध्ये शिवसेनेला "कर्णधारपद" संभाळायचे आहे. काल गौतम गंभीर म्हणाला ११ वर्षापुर्वी धोनीमुळे माझे शतक हुकले. त्यामुळे, जबाबदार व्यक्तीच्या विरोधात कोणाचे आरोप कधी उफाळून येतील. याचा काही नियम नाही. म्हणून, कॅप्टन सक्षम हवा आहे. असे संजय राऊत यांना वाटते आहे.

मी होऊ का मुख्यमंत्री..!

             वास्तव पाहता शिवसेनेचा चेहरा बाळासाहेबांच्या नंतर उद्धव ठाकरे आणि सामना पेपर. त्यानंतर संजय राऊत आणि अदित्य ठाकरे. या चौकटीत एकनाथ शिंदे यांची भुमिका हिंदुत्ववादी असली तरी ती गरजेनुसार धर्मनिर्पेक्ष म्हणून चांगली राहिली आहे. पण, डिसिजन मेकर किंवा राऊत यांच्यासारखी तत्परता ही महाराष्ट्राने कधी पाहिली नाही. जर, मुख्यमंत्री म्हणून शिंदेंचे नाव पुढे आले. तरी त्यांना एखादा निर्णय घ्यायचा असेल. तर, ठाकरे यांनाच विचारणा करावी लागणार आहे. या पलिकडे शिवसेनेचा इतिहास पाहिला. तर, त्यांनी शहरे टारगेट केली. त्या तुलनेत ग्रामीण भागात त्यांना जम बसविता आला नाही.
           स्थानिक प्रस्तापितांना पर्याय म्हणून तरुणांनी शिवसेना स्विकारली. मात्र, ते कट्टर शिवसैनिक नाही. तर, फ्लेक्झीबल भगवे झाले. त्यामुळे, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. तर, तळागाळात शिवसेना रुजविण्यात आणि संघटन बांधण्यात यश येईल. याहुन महत्वाची गोष्ट म्हणजे. काँग्रेस राष्ट्रवादीने जसे राज्यात सहकाराचे जाळे उभे केले. तसे संस्थात्मक जाळे उभे करण्यात शिवसेनेला आजवर अपयश आले आहे. सहकार काय करु शकतो. हे संपलेल्या राष्ट्रवादीने आणि डिसिजन मेकर पवारांनी उभ्या देशाला दाखवून दिले आहे. त्यामुळे, असा सहकार सत्तेच्या माध्यमातून शिवसेनेला ऊभा करता आला. तर, येणारी १५ वर्षे तरी शिवसेनेला स्वत: जनता मुख्यमंत्रीपद बहाल करेल. त्यासाठीच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री हाेणे गरजेचे वाटते आहे.

यांना कसं नमवायचं..!!

              याऊलट एक इतिहास साक्ष देतो की, १९७४ साली रेड्डी गटाकडून वसंतदादा मुख्यमंत्री व गांधी गटाकडून नाशिकराव तिरपुडे हे उपमुख्यमंत्री होते. या दोघांमध्ये कधीही पटले नाही. नेहमी वाद, अविश्वास, विरोध आणि घुसमट. याचाच फायदा घेत शरद पवार यांनी ४० आमदार फोडून पुलोद सरकार स्थापन केले.
              जर तेव्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यात एकवाक्यता असती. एकमेकांना समजून घेण्याची क्षमता असती. तर, अशी वेळ आली नसती. त्यालाच अनुसरून आ. बाळासाहेब थोरात हे वादग्रस्त व्यक्तीमत्व नाही. त्यांचा स्वभाव चिडचिडा नाही. एकनिष्ठ व चर्चात्मक पद्धतीने प्रश्न सोडविणे आणि मार्ग काढणे हेच त्यांचा इतिहास सांगतो. जसे पंतप्रधान हा दुवा म्हणून काम करतो. तसे आक्रमक शिवसेना आणि गणिमी राष्ट्रवादी यांच्यात दुवा साधनारे थोरात हे अगदी फरफेक्ट व्यक्तीमत्व आहे. जर राज्यात मध्यावधी निवडणुका नको असतील आणि पाच वर्षाचे "विकास करणारे" स्थिर सरकार हवे असेल. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री बाळासाहेब हेच योग्य राहतील. असे राजकीय विश्लेषकांना वाटते आहे.
शिवसेना -१६
राष्ट्रवादी - १४
काँग्रेस  - १३

   - सागर शिंदे

==================

              "सार्वभाैम संपादक"
                 
               सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
                  -------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" १०० दिवसात २०७ लेखांचे १२ लाख ८५ हजार वाचक)