"सोनिया गांधींना लिहीेलेले पत्र फालतूच !! हा तर भाजपचा डाव..! काँग्रेसचा आरोप..!!
संगमनेर (प्रतिनिधी) :-
राज्यात "महाविकास आघाडी" होऊ घातली असताना आ. बाळासाहेब थोरात यांनी महत्वाची भुमिका बजावली आहे. त्यामुळे, काँग्रेसचा "साफ सुथरा चेहरा" म्हणून त्यांची "प्रतिमा डागळण्याचा" प्रयत्न खुद्द संगमनेरमधूनच होऊ घातला आहे की काय ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आ. बाळासाहेब थोरात यांच्यासोबत असणारे एकेकाळचे "अतृप्त आत्मे" काही मुस्लिम बांधवांना पुढे करुन "पुरोगामी" आणि "धर्मनिर्पेक्षतेच्या" वावड्या उठविण्याचा प्रयत्न करू पहात आहे. हा डाव कोण्या "डाव्या चळवळींचा" नसून "जातीयवादी भाजपचाच" आहे. ही एक प्रकारची "स्टंटबाजी" असल्याचा असा आरोप थोरात यांनी केला आहे. त्यामुळे, संगमनेरात "काँग्रेसचे समर्थन" करणाऱ्या "मुस्लिम" समाज्याने सोनिया गांधी यांना लिहीलेल्या पत्राचे खंडन केले असून वरिष्ठांना तसा "अहवाल" पाठविल्याची माहिती थोरात समर्थकांनी दिली आहे. त्यामुळे, "जातीच्या" खांद्यावर "बंदूक" ठेऊन भाजपाने करु पाहिलेली शिकार "फोल" ठरली असून ती त्यांच्यावरच उलटल्याचे पहायला मिळत आहे.
दुवा हैं! काँग्रेस का अमन कायम रहें ! |
वास्तव पाहता आ. थोरात यांनी देशात "खचत" चाललेल्या काँग्रेसला महाराष्ट्रात "बळ" देण्याचे काम केले आहे. एकेकाळी केंद्रात एकहाती सत्ता घेणारा काँग्रेस पक्ष राज्यातून एकच खासदार देतो. यापेक्षा पडतीची बाजू मांडून विश्लेषण करण्यात अर्थ नाही. अशा पडत्या काळात थाेरातांनी गुजरात आणि आता महाराष्ट्रात काँग्रेसला पुन्हा ऊभे केले आहे. हे अभ्यासू माणूस कधीच नाकारणार नाही. इतकेच काय !! जेव्हा काँग्रेसच्या ४४ जागा निवडून आल्या तेव्हा जी रणनिती होती. ती कोणालाही कळू शकली नाही. परंतु, तरी देखील विपक्ष म्हणून बसण्याची वेळ आली. तरी, त्यांनी जनतेचे आभार मानले.
बाळासाहेब ते बाळासाहेब.! |
दरम्यान, जेव्हा भाजप शिवसेना सत्ता स्थापनेस असमर्थ ठरली. तरी देखील वैचारिक अजेंडा लक्षात घेता थोरातांनी शिवसेनेच्या भगव्याकडे डोकून देखील पाहिले नाही. जेव्हा महायुतीत तणाव वाढला तेव्हा महाशिवआघाडीची चर्चा जोरदार रंगू लागली होती. अशावेळी बाळासाहेब थोरात यांची भुमिका जर कोणी बारकाईने पाहिली असेल. तर, लक्षात येते. की, त्यांनी राष्ट्रवादीसारखा कोणताही "उताविळपणा" अंगिकारला नाही. कारण, काँग्रेस बरोबर पुरोगामी महाराष्ट्राला खतपाणी घालण्याचे काम कोणी आमदाराने केले असेल. तर, त्यात थोरातांचे नाव अग्रस्थानी येते. अन्यथा सत्तेसाठी विचार गहान ठेवलेला अकोले आणि राहाता तालुका सबंध जनतेने पाहिला आहे. त्याचे फळ त्यांना नकळत मिळाले देखील आहेत. हे आपण पाहतोच आहे. त्यामुळे, निष्ठावंत थाेरातांवर स्वभाव, चारित्र्य व पुरोगामीत्व असे आरोप करताना हजारदा विचार करावा लागतो. हेच वास्तव आहे.
आम्ही मुस्लिम विरोधी नव्हतो, नाही.!! |
खरे पाहता, शिवसेनेला राज्यपालांनी सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले. त्यावेळी काँग्रेसचे पत्र आले नाही. इतकेच काय !! राष्ट्रवादीला निमंत्रण आले. मात्र, काँग्रेसला बुलावा आला नाही. अर्थात राज्यपालांना देखील माहित असावे. काँग्रेस भाजप व शिवसेनेसोबत जाऊ शकत नाही. कारण, ही एक वैचारिक लढाई आहे. त्यामुळे, ही युती अनैसर्गीक वाटत असली. तरी, ती राज्याच्या हितासाठी साधक असल्याचे संदेश देशात जाणार आहे. एकीकडे मुस्लिम समाज या आघाडीला बिरोध करीत असताना बाळासाहेब थोरात यांनी अगदी कोठेही हिटलरशाही वापरलेली दिसत नाही. त्यांनी हा निर्णय थेट सोनिया गांधी यांच्या कोर्टात नेला. त्यानंतर तब्बल ११ ते १२ दिवस थोरात माध्यमांमध्ये झळकले नाही. दिसले ते उद्धव ठाकरे, शरद पवार आणि थेट सोनिया गांधी. त्यामुळे, स्थानिक मुस्लिम बांधनांनी त्यांच्यावर रोष धरणे हे कितपत याेग्य आहे. हा देखील विचार केला पाहिजे.यात अणखी एक गोष्ट प्रकर्षाने नमुद करावीशी वाटते. की, मुस्लिम समाज्याला भाजपचं सरकार नको आहे. जितका कट्टर "हिंदुत्ववाद" भाजपचा आहे. त्यापेक्षा सॉफ्ट शिवसेनेचा आहे. त्यामुळे, ज्या भाजपने काँग्रेस व राष्ट्रवादी गिळली. त्यांना सत्तेतून पायऊतार करण्यासाठी कोणता ना कोणता पर्याय वापरणे हेच महत्वाचे आहे. जर, भाजपं इडी आणि सत्तेची लालसा दाखवून काँग्रेस सापविण्याचा प्रयत्न करू शकते. तर, काँग्रेसने त्यांचा मित्रपक्ष जवळ करून सत्तापिपासूंना धडा शिकविला. तर बिघडलं कोठे.? यावर देखील मुस्लिम बांधवांनी विचार करणे गरजेचे आहे. आज राज्यात थोरात यांना मुस्लिम समाज साथ देताना दिसतो आहे. सर्वांना विचारुन विश्वासात घेऊन सोनिया गांधी यांनी निर्णय घेतला आहे. काही अपवाद असेलही. परंतु, महाराष्ट्रात काँग्रेस सत्तेत आली. हा संदेश देशात पुन्हा परिवर्तन घेऊन येऊ शकतो. त्यामुळे, भाजप जाऊन बळीराज्याचे राज्य येणासाठी काहीतरी तडजोडी करणे हेच धोरण काँग्रेसने अवलंबविले आहे.
कुछ पाने के लिऐं, कुछ खोना पडता हैं!
एकीकडे राज्यात ९९ टक्के मुस्लिम भाजपच्या विरोधात एकवटले असताना संगमनेरात काही ठराविक बांधवांनी बंडखोरी केली आहे. कट्टर धर्मवाद आणि काँग्रेस निष्ठावंत असल्याचा अविर्भाव गाजवत सोनिया गांधींशी सपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर होऊ लागला आहे. गांधी यांना पाठविलेली नावे एकाची सह्या एकाच्या आणि नंबर एकचे असे निदर्शनास येऊ लागले आहे. त्यामुळे, कट्टर काँग्रेसी मुस्लिम बांधव थोरातांच्या पाठीशी एकवटला असून त्यांनी संबंधीत पत्रावर पाणि सोडले आहे. आता कोण खरं कोण खोटं याचा अंदाज आणि वाल्गना करत बासण्यापेक्षा हा समाज नेमकी कोणाच्या बाजूने आहे. याचे मुल्यांकन आणि उत्तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निकालातुनच सिद्ध होणार आहे.- सागर शिंदे
- सुशांत पावसे
===============
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" १०० दिवसात २०७ लेखांचे १२ लाख ९५ हजार वाचक)