खा. लोखंडेंवर "शेतकरी बरसले"..!, "अवकाळीचं सोडा", पिक विम्याचं काय केलं ? साहेब झाले निरुत्तर

राहुरी (प्रतिनिधी) :-
                  खा. सदाशिव लोखंडे यांना "जिकडे जावे तिकडे" टिकेला सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे. ते राहुरी तालुक्यात गेले असता. त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अगदी धारेवर धरले. केवळ दौरे करायचे आणि शेतकऱ्यांना अश्वासने द्यायची. हे करु-ते करु आणि पदरी निराशा द्यायची. या व्यतिरिक्त तुम्हाला येते काय? २०१६ सालात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्याचे पीक विमे काढले. आत्ता भरपाई देऊ मग देऊ असे म्हणून तीन वर्षाचा काळ लोटला. तरी, "पीकविम्यांची रक्कम" खात्यात जमा झाली नाही. इतकेच काय ! ज्या कंपनीने "सर्वेक्षण" करुन "पंचनामे" केले होते. त्या कंपनीचे पुढे काय झाले ? "पंचनाम्यांचे" काय झाले, "नुकसान भरपाईचे" काय झाले ? सरकार मागचेच काही देऊ शकले नाही. तर, आत्ताच्या "अवकाळी" पावसाचे "नुकसान" काय देणार आहे. अशा  "कडव्या शब्दात" शेतकऱ्यांनी खा. सदाशिव लोखंडे यांना "धारेवर धरल्याची" माहिती शेतकऱ्यांनी दिली.

आपण या सबंध जनतेचे सेवक आहोत..!

                एकीकडे पुणे ग्रामीण सारख्या ठिकाणी "कट्टर शिवसैनिक" कोरेगावातील "विमा कंपनीचे कार्यालय" फोडून सरकारला जाब विचारतात. की, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी देणार ?  तर, दुसरीकडे संगमनेरमध्ये खा. सदाशिव लोखंडे यांना नागरिकांनी जाब विचारला म्हणून त्यांचे "व्यक्तीप्रेमी" माध्यमांना व सामान्य नागरिकांनी धमक्या देतात. त्यामुळे, "स्वार्थापोटी" भगवे गळ्यात घालणाऱ्यांना "शिवसैनिक" म्हणायचे..!! की, शेतकऱ्यांसाठी "मावळ्यांप्रमाणे" लढणाऱ्यांना "शिवसैनिक" म्हणायचे. याचे उत्तर देण्याची आतातरी गरज वाटत नाही. 
       
एकीकडे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करण्यासाठी खासदार साहेब बाहेर निघाले. पण, गेली पाच वर्षे शेतकऱ्यांच्या हिताचे किती कामे केली.? असा सवाल आता जनताच विचारु लागली आहे. त्यामुळे, काही "खासदार प्रेमींनी" हाताची घडी तोंडावर बोट ठेवले आहे. त्यांना माहित आहे. जर, जनतेचे "अशोकचक्र" फिरले. तर, होत्याचे नव्हते करून टाकायला वेळ लागत नाही. याचे ताजे उदाहरण म्हणजे, राम शिंदे, पंकजा मुंडे, वैभव पिचड असे अनेक दाखल आहेत. आणि यात माध्यमांची भूमिका नेहमी अग्रभागी राहिली आहे.  त्यामुळे, "देर है ! तो दुरुस्त आऐं ! अन्यथा आता "स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका" फार दूर नाहीत. एकंदर विचार करता. खा. लोखंडे साहेबांनी त्यांच्या कामाचा आवाका वाढविला पाहिजे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या तोंडाला लगाम घातला पाहिजे. असे जाणकारांचे मत आहे. अन्यथा, त्याचे परिणाम राहुरीत दिसून आले आहे. आता जनता जाब विचारते आहे. उद्या विरोधात रस्त्यावर उतरायला नको..!! हे वास्तव साहेबांनी स्विकारावं असे अकोल्यातील शिवसैनिकांना वाटते आहे.
                 खा. लोखंडे यांची फेसबुकच्या माध्यमातून बदनामी करणार मचकूर प्रसिद्ध झाला आहे. तसेच, अश्लिल भाषेचा वापर करून शिवीगाळ केल्याचा उल्लेख सोशल मीडियावर मिळून आला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तिघांचा कसून शोध सुरू केला आहे. सविस्तर माहितीसाठी वाचा सायंकाळी "रोखठोक सार्वभौम"

सागर शिंदे 

==================

              "सार्वभाैम संपादक"
                 
               सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
                  -------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ९२ दिवसात १७७ लेखांचे ११ लाख ९० हजार वाचक)