आयोध्येचा "निकाल" तोंडावर..!! संगमेनर पोलीस "सतर्क" "कायदा" हातात घ्याल तर "जेलात" जाल- अभय परमार
पीआय अभय परमार |
अयोध्यातील "रामजन्मभूमी" व "बाबरी मश्चिद" प्रकरणी १७ ऑक्टोबर २०१९ रोजी सर्वेन्यायालयाचे मुख्य न्यायाधीश "रंजन गोगोई" यांच्या अध्यक्षतेखाली सहा न्यायाधीशांसमोर युक्तीवाद पुर्ण झाला आहे. त्यावर येत्या आठवडाभरात कधीही अंतिम सुनावणी होऊ शकते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १५ नोव्हेंबर २०१९ रोजी मुख्य न्यायाधीश "गोगोई" हे "सेवानिवृत्त" होणार आहेत. त्यामुळे, त्यांच्या उपस्थितीत हा खटला चालवला गेला असुन त्यांच्या "निवृत्तीपुर्वीच" म्हणजेच १० नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर या काळात ह्या खटल्यावर अंतिम सुनावणी होण्याची दाट शक्यता असल्याचे बोले जात आहे. त्यामुळे राज्यात कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
देशात धार्मिक आस्मितेचा विषय ठरलेलल्या रामजन्मभूमी व बाबरी मज्जिद या संवेदनशील विषयावर मा.सर्वोच्च न्यायालय यांचेकडून न्यायनिवाडा होणार आहे. या खटल्याची सुनावणी पुर्ण झाली असून. हा निकाल अंतीम टप्प्यात आहे. येणाऱ्या काळात या निकालामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी संगमनेर शहरात पोलिसांनी शक्तीप्रदर्शन केले. यावेळी तहसिलदार अमोल निकम, डिवायएसपी नकुल पंडीत, पोलीस निरीक्षक अभय परमार, वाहतुक सहायक पोलीस निरीक्षक पप्पू कादरी, ग्रामीण पीआय सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात संचलन करण्यात आले.
यावेळी, संगमनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार म्हणाले की, निर्णय देणारी यंत्रणा ही देशाची सर्वोच्च न्यायव्यवस्था असून तीचेवर सर्व भारतीय जनतेचा "विश्वास" आहे. तरी "सर्वोच्च न्यायालयाने" दिलेला "निकाल" हा सर्व भारतीय "नागरिकाने पाळणे" बंधनकारक आहे. सदर चा निकाल काहीही असो या निकालानंतर चांगल्या अथवा वाईट प्रतिक्रिया "व्हाट्सअप, फेसबुक" अथवा इतर सोशल मीडिया, "पत्रकबाजी" टीका टिपणी देणे हा "न्यायालयाचा अवमान" ठरेल अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देणे म्हणजे हा न्यायालयाचा अवमान करणाऱ्या व्यक्तींविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
संगमनेरात पोलीस "अलर्ट".!! |
@ निर्णयानंतर चौकाचौकात जमाव करून थांबू नये.
-----------------------
@ सोशल मीडियावर सदर निकालाचे अनुषंगाने कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील अशा प्रकारचे संदेश प्रसारित करू नयेत.
------------------------
@ निकालानंतर आनंद साजरा करताना गुलाल किंवा कोणत्याही वस्तू उधळू नये.
------------------------
@ चौकात किंवा फटाके वाजवू गोंधळ करू नये.
---------------------------
@ सायलेन्सर काढून गाड्या पळवू नयेत. तसेच कोणत्याही प्रकारची रॅली काढू नये.
---------------------------
@ महाआरती अथवा समूह पठण याचे आयोजन करू नये.
--------------------------
@ निकाला निमित्त पेढे, साखर अथवा मिठाई वाटू नयेत.
------------------------
@ घोषणाबाजी जल्लोष करू नये.
------------------------
@ मिरवणुका रॅली काढू नये.
--------------------------
@ प्रक्षोभीत भाषणबाजी करून जनतेला भडकावू नये.
------------------------
@ कोणतेही वाद्य वाजवू नये. धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू पुरस्सर उद्देशाने शब्द उच्चारू नये.
-----------------------
@ कोणत्याही प्रकारचे जातीय दंगलीच्या अनुषंगाने जुने व्हिडिओ, फोटो पुन्हा प्रसारित करून अफवा पसरवू नये..
----------------------
@ सदरचा निकाल हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला केवळ जागेसंदर्भातील निकाल असणार आहे. असे पीआय परमार यांनी सांगितले. तरी वरील सूचनांचे उल्लंघन केल्यास, जातीय तणाव निर्माण केल्यास, धार्मिक भावना भडकवल्यास त्याचेवर भारतीय दंड सहिता कलम 295 कोणत्याही वर्गाच्या धर्माचा अपमान करण्याच्या उद्देशाने उपासना स्थानाचे नुकसान करणे अगर ते अपवित्र करणे.------------------------
# कलम 295 (अ) कोणत्याही वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धांचा करून धार्मिक भावनांवर अत्याचार करण्याच्या उद्देशाने बुद्धिपुरस्सर व दुष्ट उद्देशाने कृती करणे.-----------------------
# कलम 298 धार्मिक भावना दुखावण्याचा च्या हेतूपुरस्सर उद्देशाने शब्द उच्चारणे याशिवाय इतर प्रचलित कायद्यान्वये दखलपात्र स्वरूपाचे गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करून मा. न्यायालयात समक्ष हजर करण्यात येईल.
सायबर सेलची करडी नजर.!
"महत्वाचे"
आजकाल सोशल मीडियावर अपप्रचार होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अफवांना उत येऊन नको तो अनुचित प्रकार होतो. घटना वेगळी असते आणि वास्तव वेगळे असते. त्यामुळे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे, आपल्या एका मेसेजने समाजाचे नुकसान होईल किंवा सामाजिक स्वास्थ बिघडेल. असे संदेश तयार करू नका. किंवा पुढे सेंड करू नका. कारण, आपल्या प्रत्येक हालचालीवर पोलिसांचे व सायबर सेलचे लक्ष राहणार आहे.- अमोल खताळ
(सामाजिक कार्यकर्ते)रस्त्यावर उतराल
महागात पडेल..!
निकाल कोणाच्याही बाजूने लागला. तरी, रॅली काढणे, रस्त्यांवर गर्दी करणे, वाहतुकीस अडथळा निर्माण होईल असे कृत्य करणे, वाहनांना अडविणे, मोर्चे, आंदोलन अथवा वाहतुक नियमन करणाऱ्यांना धमकाविणे, एव्हाणा सरकारी काम करू न देणे. असे जाणीवपुर्वक प्रयत्न केला. तर, कायदेशील ३५३ नुसार कारवाई करण्यात येईल. त्यामुळे, सजग नागरिक म्हणून सुप्रिम कोर्टाच्या निकाला विरुद्ध जाणार नाही. अशी अपेक्षा आहे.
- एपीआय पप्पू कादरी
(वाहतूक शाखा, संगमनेर)- सागर शिंदे
- सुशांत पावसे
==================
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ९२ दिवसात १७७ लेखांचे ११ लाख ९० हजार वाचक)