अकोल्यात "रंगली" बॅनरांची "फाडाफाडी" पिचडांनंतर आ. लहामटेंच्या "बॅनरच्या चिंध्या" पोलीसांकडून कारवाई..!

बॅनर "फाडाफाडी"..!!

अकोले (प्रतिनिधी) :-                  
                            गेल्या काही दिवसांपुर्वी  अकोल्याच्या "जनतेने" ४० वर्षाच्या "इतिहासाला पुर्णविराम" दिला. माजी मंत्री मधुकर पिचड यांचे "चिरंजीव" वैभव पिचड यांचा "दारून पराभव" झाला आणि विशिष्ट लोकांनी "जणुकाय" अकोल्याची "जहागिरी" जिंकल्याचा "अविर्भाव" आणला. त्या आवेशात आ. लहामटेंच्या कार्यकर्त्यांनी चक्क "माजी आमदाराचा" "बॅनर फाडून" त्यावर "चिखलफेक" केली. इतकेच काय..! सोशल मीडियावर "अश्लिल शब्दांचा" वापर करुन अकोल्याच्या संस्कृतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. त्यामुळे "भाऊप्रेमींची" मस्तकी फारच गरम झाली. त्यांनतर मात्र "भाजप कार्यकर्त्यांनी" थेट "दांडोक्याची" भाषा सुरु केली. यावर पोलिसांनी कायद्याच्या अधीन राहुन कारवाई देखील केली. त्यानंतर हा प्रकार 'थांबेल' असे वाटत होते. मात्र, "विद्यमान आमदार" डॉ. किरण लहामटे यांचा देखील "दिवाळी शुभेच्छांचे बॅनर" अज्ञात व्यक्तींना फाडून टाकल्याचे काल निदर्शनास आले. त्यामुळे ही "बॅनर फाडाफाडी" करणारे "माथेफिरू" कोण ? याचा तपास करणे गरजेचे आहे. हे असेच चालत राहिले. तर, "विकास रहायचा बाजूला" आणि "भकास" तालुका जनतेच्या पदरात पडेल. त्यामुळे, जाणकार मंडळींनी भलेही एक काम कमी केले तरी चालेल. पण, दोन आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये जी दरी निर्माण झाली आहे. ती भरून काढण्याचे काम केले. तर, तालुक्यावर उपकार केल्यासारखे होईल. असे जाणकारांना वाटते आहे.
            
    कोणताही "देश" असो वा "राज्य", "जिल्हा" असो व "तालुका", गाव असो वा "वाडी" येथे अचानक "अराजकता" माजत नाही. तर, त्याला स्थानिक पातळीवर हळूहळू "असंतोष" वाढत जातो. मग, "जालियनवाला बाग हत्याकांड" असेल किंवा १८५७ चे युद्ध. त्यामुळे, शुल्लक-शुल्लक गोष्टी कोणत्या थराला जातात. हे आता नव्याने सांगायला नको. अशाच प्रकारची "अराजकता" अकोल्यात "रुढ" होऊ लागल्याचे पहायला मिळत आहे. "व्हाट्सअॅप" वरती पाहिले. तर, कोणी कोणाची "भिडभाड" ठेवायला तयार नाही. जुण्या जाणत्या "वैचारिक व्यक्तींचे वाभाडे" तरुणाईकडून ओढले जाऊ लागले आहे. ज्यांनी ३५ वर्षे तालुक्याचे प्रतिनिधित्व केले. त्यांना प्रश्न विचारणे गैर नाही. पण, अपशब्दांचा वापर करणे कितपत योग्य आहे. ज्यांनी ५ वर्षे तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्न केले. त्या वैभव पिचड यांना अगदी खालच्या भाषेत विद्यमान आमदारांच्या कार्यकर्त्यांकडून अश्लिल शिवीगाळ होणे ही तालुक्याच्या पांढऱ्याशुभ्र वस्रावर काळीकुट्ट "शाहीफेक" केल्यासारखा प्रकार आहे. हा प्रकार इथेच थांबत नाही. तर, दिपावलीच्या शुभेच्छा लावलेला बॅनर "फाडने" आणि त्यावर "चिखलफेक" करणे. हे  वैचारिक तालुक्याला अगदी "काळींबा" फासेल असा प्रकार आहे.
           
आता ही "विकृती" येथे थांबेल. असे वाटत होते. मात्र, तसे झाले नाही. वैभव पिचड यांच्या बॅनर फाडीचे "सडेतोड" उत्तर कोण्या "माथेफिरूने" त्याच पद्धतीने दिले. "पत्थर का जबाब पत्थर से" असेच काहीसे "प्रतिउत्तर" मिळाले. आ. डॉ. किरण लहामटे यांनी जनतेला दिपावलीच्या हार्दीक शुभेच्छा देणारा बॅनर शहरात लावला होता. मात्र, यापुर्वी पिचड यांचा बॅनर मद्यपीने फाडल्याचे सांगितले गेले. त्यानंतर मात्र, आमदारांचा बॅनर फाडणारा हा महाभाग कोण ? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. आता ही फाडाफाडी आणि उत्तराला प्रतिउत्तर देण्याची जुगलबंदी सुरूच राहीली. तर, विकास करायचा कोणी.? असाही प्रश्न पुढे येऊ लागला आहे.

माध्यमांवर झळकले फाटके बॅनर.!

             "महत्वाचे"
ज्या तरुणाने माजी आमदारांना "अश्लिल शिवीगाळ" केली. त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. संबंधीत व्यक्तीने माफी देखील मागितल्याचे सांगण्यास आले. "थोडक्यात" सांगायचे झाले. तर, आपण ज्यांच्यासाठी "पोटतिडकीने भांडत" असतो. त्यापैकी आपल्यावर वेळ आल्यानंतर कोणी मदतीला धावून येत नाही. त्यामुळे, कोणीही असो.! दुसऱ्यांच्या झेंड्यावर पंढरपूर करण्यापेक्षा स्वत: अशा चुका करू नका. ज्यामुळे, आपण अंधभक्त ठरू आणि अडचणीत येऊ. आपणच आपल्या जीवणाचे शिल्पकार आहोत. हेच वास्तव आहे.

- सागर शिंदे 

==================

                   "सार्वभाैम संपादक"
                 
                    सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
                  -------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ९२ दिवसात १७७ लेखांचे ११ लाख ९० हजार वाचक)