...तर राज्यात "आणिबाणी", नाहीतर पवार साहेब "मुख्यमंत्री" अन्यथा "उद्धवाचे अजब" सरकार..!!

शरद.........प"वॉर"

मुंबई (प्रतिनिधी) :-
                काल-परवा "महाराष्ट्र विधानसभेच्या" निवडणुका झाल्या. खऱ्या अर्थांने पहिल्यांदाच "ईव्हीएमने" सुटकेचा श्वास सोडला. कारण, निकालाची घोषणा होईपर्यंत अनेकांच्या तोंडून वाक्य येत होते. "मतदान" तर झालय. आता "ईव्हीएम" काय करेल देव जाणे.!! त्यामुळे, नकळत तो प्रश्न मार्गी लागला. पण, जनतेने एकालाही "एकहाती कौल" दिला नाही. त्यामुळे, "भाजपची कोंडी" झाली, "शिवसेना भाव खाऊन" गेली, "राष्ट्रवादी  तडफडत" राहिली तर काँग्रेसला निव्वळ बघ्याची भुमिका घ्यावी लागत आहे. या सर्वांत "एमआयएम", "वंचित" व "मनसे, बसप" यांच्याविषयी न बोललेलं बरं. पण, "सत्ता स्थापनेचा" विचार केला. तर, नेमके काय होऊ शकतं. याचा "सारांश" डोळ्यासमोर येतो. तो असा की, एकतर, कोणीही सरकार स्थापन करु शकले नाही. तर, राज्यात "राष्ट्रपती राजवट" लागू होईल, दोन म्हणजे, "शरद पवार" या "महाराष्ट्राचे चौथ्यांदा मुख्यमंत्री" होतील. तीन म्हणजे, "आघाडीची मदत" घेऊन "उद्धव ठाकरे सत्ता स्थापन" करतील, चार म्हणजे, काहीच नाही झाले. तर, नेहमीप्रमाणे "महायुतीची सत्ता" स्थापन होऊन "भाजप" थोडी 'माघार' घेईल. याचा अंदाजांचे "दाखले" इतिहासात तपासले तर लक्षात येते. की,......

"धुरंधर" राजकारणी..!

         दि. १२ डिसेंबर १९४० रोजी "वर्तमानाच्या गर्भात" धुरंधर राजकारणी "जाणत्या राजाचा" जन्म झाला. त्या दिवसापासून तर आजवर ७९ वर्षाच्या काळात अनेक "चढ-उतार" त्यांनी अनुभविले आहे. हारलेल्या बाजुला पलटी मारून "बाजीगर" कसे व्हायचे. हे धडे त्यांनी राजकारणातच अनुभविले होते. म्हणून तर १८ जुलै १९७८ साली ते अवघ्या ३८ व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. तेव्हाची परिस्थिती काय होती.!! सन १९७८ साली जेव्हा आणीबाणी उठली तेव्हा महाराष्ट्रात दोन्ही काँग्रेस विधानसभेला अलिप्त लढल्या. त्यात रेड्डी काँग्रेसला ६९ जागा, इंदिरा काँग्रेसला ६२, जनता पक्षाला (भाजप) ९९, शेतकरी कम्युनिष्ट पक्ष १३, माकप ०९ व ३९ जागा अपक्ष आल्या होत्या. तेव्हा जनता पक्षाला "बहुमत" सिद्ध करता आले नाही. म्हणून वसंतदादा पाटील यांनी रेड्डी व गांधी यांच्यात एकोपा करुन ७ मार्च १९७८ ला सरकार स्थापन केले होते. तेव्हा शरद पवार त्यात "उद्याेगमंत्री" होते. या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे आणि वसंत दादा याचे टिपन बसत नसे. त्यांना कंटाळून  पवारांनी सर्वात मोठी चाल खेळली. त्यावेळी  ४० आमदारांसह सत्तेतून बाहेर पडले. परिणामी सरकार अल्पमतात आले.  वसंतदादा पाटील यांना मुख्यमंत्री पदाहून खाली खेचले गेली. त्यामुळे पवार पॅटर्न कोठे आणि कसा आमलात येईल. हे काही सांगता येत नाही. आता ते स्वत: मुख्यमंत्री होऊ शकतात आणि अदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्री करून सत्ता स्थापन करु शकतात.

हे आपल्याला काय पटेना बुवा..!

          खरे पाहता आज जे सुशिलकुमार शिंदे  पवार साहेब व बाळासाहेब थोरात यांना सत्तेसाठी शिवसेनेस पाठींबा देण्यास नकारात्मकता दर्शवितात. त्याच शिंदेंनी पवार साहेबांसोबत दादांच्या "पाठीत खंजिर खुपसला" त्यात सुशिलकुमार शिंदे देखील भागिदार होते. त्यांच्यासह सगळ्यांनी मिळून "समाजवादी काँग्रेसची" निर्मिती करून दादासाहेब रुपवते यांना अध्यक्ष केले होते. या सर्वांनी "जनतादलाशी" बैठक घेऊन आजच्या "भाजपच्या पाठींब्याने" सरकार स्थापन होते. त्यावेळी, एस. एम. जोशी यांनी "पुरोगामी" नेत्यांचे स्वागत केले होते. मग, आज "हिदुत्ववादी" उद्धव ठाकरे यांनी त्यांना "वेलकम" म्हणाले. तर बिघडले कोठे.?

त्यावेळी, १८ जुलै १९७८ रोजी "पवार प्रणित भाजपची सत्ता" महाराष्ट्रात आली. यात समाजवादी काँग्रेस, जनता पक्ष, शेकाप व कम्युनिष्ठ पक्ष यांनी मिळून पुरोगामी लोकशाही दल (पुलोद) स्थापन करुन वयाच्या ३८ वर्षी शरद पवार मुख्यमंत्री झाले होते. साहेबांनी तेव्हा भाजपला मदत केली होती. आता शिवसेनेला मदत करुन ८० वर्षाचे "जाणकार व्यक्तीमत्व" मुख्यमंत्री झाले. तर, बिघडले कोठे ?

असे करेल सेना तर पुढे होईल दैना..!

         अर्थात केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले. की, काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेना असे सरकार स्थापन झाले. तर, ते दिर्घकाळ टिकणार नाही. खरे पाहता आठवले हे "राजकीय वादळाची" दिशा ओळखणारे राजकारणी आहेत. त्यांच्या वाक्याला "इतिहासाचे प्रमाण" आहे.
कारण, सन १९८० साली केंद्रात पुन्हा काँग्रेस आले आणि जनतापक्षात फुट पडली. परिणामी १७ फेब्रुवारी १९८० साली राष्ट्रपतींनी पवारांचे "पुलोद" सरकार "बरखास्त" करून राज्यात "राष्ट्रपती राजवाट" लागू केली होती. त्यानंतर महाराष्ट्रात १९८० ला पुन्हा निवडणुका झाल्या तेव्हा शरद पवारांच्या "समाजवादी काँग्रेस" पक्षाचे "हाल बेहाल" झाले. तेव्हा अब्दुल रेहमान अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर तब्बल ६ वर्षे पवार साहेब "विरोधी पक्ष" म्हणून कार्यरत होेते. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना असे सरकार स्थापन झाले. तरी, शिवसेनेची "हेकेखोरी" पाहता. हे सरकार हमरी-तुमरीचा "सामना" करेल. असे जाणकारांना वाटत नाही.

- सागर शिंदे

- सुशांत पावसे

==================

             "सार्वभाैम संपादक"
                 
                सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
                  -------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ९० दिवसात १७५ लेखांचे ११ लाख ८१ हजार वाचक)