|
धुरंधर
|
अकोले (प्रतिनिधी) :-
"पवार साहेब"..! का कुणास ठाऊक.! पण आज फार प्रकर्षाने "फुले, शाहु, आंबेेडकरांची" आठवण झाली. कारण, गेली ३४ दिवस आम्ही जो "सत्तासंघर्ष" पाहत होते. त्यामुळे आपण "सामाजिक अराजकतेकडे" वाटचाल करत आहोत की काय !! या प्रश्नाने "मनाला" प्रचंड वेदना होत होत्या. खरं सांगू.! यात तुम्ही सुद्धा जनतेच्या मनात कोठेतरी "शंकेच्या चष्म्यात" अस्पष्ट दिसत होते. पण, खरोखर.! तुम्हाला समजून घ्यायला १० नाही १०० जन्म घ्यावे लागतील. हेच खरे आहे. साहेब..! तुम्हाला वाटलं असतं तर "भाजप काय" आणि "शिवसेना काय" ! सत्ता तर दोन्हीकडे होती. पण, "माऊली" तुम्ही महाराष्ट्राचा "स्वाभिमान गहान" ठेवला नाही. खरं सांगायचं ठरलं तर अगदी कालपर्यंत या "महाराष्ट्रातून थोर पुरुषांच्या पाऊल खुना बुजून गेल्याचे भासू लागले होते". "पुरोगामी" महाराष्ट्राला "सत्तेचे ग्रहण" लागल्याचे "अभद्र विचार" मनावर नकळत बिंबले जात होते. "इडा पिडा जावो आणि बळीचे राज्य येवो" या वाक्याची "दया" येऊ लागली होती. पण, साहेब..! तुम्ही खरोखर "जाणता राजा" म्हणून धावून आलात. खरंतर राज्यात "महायुती" सत्ता स्थापन करु शकली नाही तोवर काही वाटले नाही. इतकेच काय ! राज्यात "राष्ट्रपती राजवट" लागली. तरी मनाला यत्किंचितही वाईट वाटले नाही. पण, त्यानंतर जे काही पहायला मिळाले. ते खरोखर "लोकशाहीचा गळा" घोटण्यासारखे होते. पाहिलत ना..! "सत्तापिपासू" लोक "पुन्हा येण्यासाठी" कोणत्या थराला जाऊ शकतात.? किती हा अट्टाहास ? साहेब.! खरोखर कधी नव्हे गेली ३३ दिवस "लोकशाहीला अगदी नग्न" करताना दिसू लागले होते. साहेब.! कधी नव्हे इतका "सत्तेचा आणि पदांचा उन्माद" उघड्या डोळ्यांना पहायला मिळत होता.
|
तुलना नाही.! खरी आदरांजली..!
|
साहेब.! जर आज "संविधान दिन" म्हणून "डॉ. बाबासाहेब आंबेडकर" महाराष्ट्रात डोकावून पाहत असतील. तर, त्यांना या "धुर्त राजकारण्यांनी लोकशाहीची लक्तरं वेशीवर टांगलेली दिसत असतील. काय वेदना होत असतील त्या महाज्ञानाच्या महामानवाला"..!! काय ते ५ वाजता
"राष्ट्रपती राजवट" हटविणारे "राष्ट्रपती", काय ते "सुर्याच्या गर्भात शपतविधी" देणारे "राज्यपाल" आणि काय तो "पुन्हा येण्यासाठी" मुख्यमंत्र्यांनी मांडलेला
"अट्टाहास". बाप रे..! बाबासाहेबांना देखील कल्पना नसेल. माझ्यापेक्षा
"अतीहुशार" लोक या पृथ्वीतलावर जन्म घेतील. पण, साहेब..! ही "रयत" पहात होती हा अधिकाराच्या गैरवापराचा "उन्माद". ही "लोकशाही" अनुभवत होती "कायदेशीर" राबविली जाणारी
"हुकूमशाही". पण, त्याच वेळी अगदी "राजे" होऊन तुम्ही धाऊन आलात. ही "जुलमी सल्तनत" तलवारीच्या टोकावर घेऊन संपविण्यासाठी.
"भारतरत्न" म्हणून या "संविधानाची" तुम्ही 'लाज' राखली, अगदी "कालिया" होऊन 'थुै-थुै' नाचलात तुम्ही
"वामनाच्या" डोक्यावर. जेव्हा हे सगळं आम्ही पाहत होतो. तेव्हा तुमच्यात आम्हाला फुले, शाहु, आंबेडकर आणि छत्रपती दिसले. इतकेच काय ! तुम्ही घडविलेले डॉ. कोल्हे, अमोलजी मिटकरी, धनुभाऊ, दिलीपजी वळसे पाटील, जयंत पाटील आणि
"धुरंधर पुरोगामी" जितेंद्र आव्हाड काय
"निष्ठावंत मावळे" घडविलेत तुम्ही. साहेब..! मी किती मोठा होईल की सिमीत राहिल माहित नाही. पण, "इतिहासाच्या पानावर" तुमचे नाव
"सुवर्णाक्षरांनी" लिहीले जाईल. त्या अक्षरातील मी एक "खारीचा वाटा" होण्याचा नक्की प्रयत्न करेल.
|
छत्रपती राजे अन पवार मावळे
|
मी "अभ्यासू" नसेलही पण "अभ्यासक" जरुर आहे. मला प्रचिती आहे. आजवर जे-जे 'महान' झाले. त्यानी स्वत:साठी काहीच केले नाही. जी तळमळ होती. ती तेवळ रयत व "स्वराज्यासाठी" होती. त्या चौकटीत साहेब.! तुम्ही अगदी फिट्ट बसता. तुम्हाला वाटलं असतं तर तुम्ही भाजप सोबत गेले असते. तुमचा कोण वाली होता.? चौकशा, बारा भानगडी आणि बरेच काही मातीत मिसळून गेले असते. कदाचित दिल्लीत "झुकले" असते तर "राष्ट्रपती" झाले असते. इतकेच काय. ! "लेकीला लाल दिव्याच्या" गाडीत मिरवताना "बाप" म्हणून किती "उर" भरुन आला असता. पण नाही.! दिल्लीच्या तख्तापुढे "पुतण्या झुकला" तरी ८० वर्षाच्या "योद्ध्याने" तिन पक्षांची "खिंड" एकट्याने लढविली आणि बाजी देखील मारली. वा..! काय तो "डौल" म्हणायचा. तुम्हाला पाहिलं की कालपर्यंत "कपाळाच्या भुवया" जमा व्हायच्या. काय चाल असावी यांची असे म्हणून "डोक्यावरची केसं" ताईट व्हायची. पण, आज तुम्हाला पाहुन "छाती वृदावते"..! अंगावर शहारे उमटून "केसांचा देखील कणा अगदी ताट" होतो. पुतण्याची "दगाबाजी" झाली आणि ५४ आमदार जणू "भुमिगत" झाले. तरी, तुमचा रुबाब अगदी "सह्याद्रीसारखा ताठ" होता. तुम्ही स्वत:ला सांगत होते. "मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेऊनी फक्त लढ म्हणा"..! आणि तुम्ही लढलात देखील तसेच. ज्या वैऱ्याने "रात्रीच्या अंधारात" तुमच्या "पाठित खंजिर" खुपसला. अगदी त्याच वैऱ्याने "भर दुपारी" तुमच्यासमोर "गुढगे टेकले". याला म्हणतात "युद्ध"..! आणि इतके सगळे होऊन देखील तुम्ही "फितुरीला पदरात" घेतलं. याला म्हणतात "कर्ण".!
|
सूर्यपुत्र कर्ण, दानशूर पवार
|
"कर्ण"..! होय 'कर्ण'च. अगदी वेळ आली असती. तर, भाजपने शिवसेनेच्या "नाकावर टिचून" अडिच वर्षे "मुख्यमंत्रीपद" दिले असते किंवा या "सत्ता संघर्षाचा केंद्रबिंदू" ठरल्यामुळे शिवसेनेने अडिच वर्षे "मुख्यमंत्रीपद" दिले असते. पण, नाही.! उलट बाळासाहेब ठाकरे यांचे "स्वप्न" पुर्ण करण्यासाठी एक पाऊल मागे घेत पाच वर्षे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांना "मुख्यमंत्रीपदाचा बहुमान" दिला. अडिच वर्षेचे स्वप्न पाहणारी "शिवसेना" आहे तरी कोणाची ? छत्रपतींच्या शब्दानेच तिचा "जन्म" होते ना ? मग ! जेथून "शिवराय" सुरु होतात. तेथे "जाणता राजा" स्थिरावतो. हेच तर दानशुरांचे "तत्व" आहे. त्यामुळे, साहेब..! "प्राचिन, मध्ययुगीन आणि अधुनिक भारताच्या इतिहासात" जे "कल्याणकारी" राजे होऊन गेले. त्या प्रत्येकांचे "प्रतिबिंब" तुमच्यात "परावर्तीत" होते. बस इतकेच माझ्यासारख्या सामान्य लेखकाला वाटते.
|
भाजपचा टाईम ऑफ..!
|
साहेब..! आपल्यासारखे "पुरोगामी" विचारांचे "योद्धे" या देशात आहेत. म्हणून तर "वैचारिक" आणि "थोरांचा लढाऊ वारसा" येथे टिकला आहे. अन्यथा "हिटलरशाही" कशी रुजू झाली. हे आम्ही चांगले अभ्यासले आहे. कदाचित तुम्हासारखे "हजारो शरद पवार" या देशात नसते. तर, "संविधानाला जाळून" येथे "मनुस्मृती" रुजू पाहिली असती. तुम्ही नसते तर "सहकारा" ऐवजी "सरकार शाहीने" गोरगरीब जनता उपाशी मेली असती. तुम्ही नसते. तर, "कर्जापोटी" घरात "बाप्या माणूस" शिल्लक राहिला नसता. तुम्ही नसते तर "शेतीच्या" उताऱ्यांवर "सावकारांची मक्तेगिरी" असती, साहेब.! तुम्ही नसते तर "महिला सक्षम" झाल्या नसत्या. इतकेच काय ? "घरात पीठ नसणाऱ्यांना "विद्यापीठ" सोडा पायपीट करुन देखील पोट भरण्याचा अधिकार या व्यवस्थेने ठेवला नसता". म्हणून तुम्हाला "धन्यवाद" देतो. की, ज्या भाजपने शिवसेनेत "कट्टर हिंदुत्व" आणि "जातीवादाचे रक्त मिश्रीत" केले आहे. त्यांना "काँग्रेस" सोबत सत्तेच्या प्रवाहात आणून "मंदीर आणि मश्जिद" या दोन्हीत "देवच" आहे. "माणूस आणि आदमी" या दोन्हींचे "रक्त" लालच रंगाचे आहे. पाकिस्तानला नष्ट करण्यासाठी "मिसाईल" बनविणारे "एपीजे अब्दुल कलाम" आणि सगळ्या जाती, धर्म व परंपरांना एका संविधानात बांधणारे अस्पृश्याचे चटके खाल्लेले "डॉ. बाबासाहेब" यांचे विचार एक आहे. "कुरानाच्या प्रति जतन" करणारे "छत्रपती" आणि सारे जहाँसे अच्छा हिंदोसता हमारे हे गित लिहीणारे "महंमद इकबाल" एक आहेत.
|
तो बघ महाराष्ट्र माझा.!
|
साहेब.! तुम्हाला देखील कल्पनाही नसेल. हे जे काम तुम्ही केले आहे. ते कोण्या "पक्षाची युती" नाही. तर, "जात, धर्म, वर्ण" यांच्यावर घातलेला "घाव" आहे. त्यामुळे, तुम्हाला मी "अवतार" म्हणणार नाही. पण, तुम्ही देखील एक "महामानव" आहात. यावर मी ठाम आहे. आजवर जी लोकं "संविधानावर चिखलफेक" करत होते. आज ७० वर्षाच्या प्रदिर्घ काळानंतर त्या संविधानाने "अन्याय के खिलाफ" देर हैं। लेकीन "अंधेर" नाही। हे सिद्ध करून दिले आहे. ते ही "संविधान दिनाच्या" दिवशी. फक्त लढणारा "शरद पवारांसारखा योद्धा" पाहिजे. साहेब.! तुमच्या "धैर्याला" पाहुन डॉ. बाबासाहेबांची छाती "गौरवाने" फुगली असेल. कारण, ते म्हणत असे. "संविधान कितीही वाईट असो". फक्त त्याला "हताळणारे" लोक "चांगले" हवे. त्या चांगल्यापैकी एक "कायदेतज्ञ" हिरा म्हणजे पवार साहेब होय. बाकी वाईट कोण हे सांगण्याची गरज राहिली नाही. ते जनतेने पाहिले आहे. साहेब ! तुमचे मनस्वी "आभिनंदन".! "ईडा पिडा" गेली आणि "बळीचे राज्य" आले. आता फक्त "शेतकरी" आणि "तरुणांचे मायबाप" होऊन पुन्हा बांधावर या. ! कारण, ते फार अतुरतेने तुमची वाट पाहत आहेत.
|
पवार साहेबांवरील कविता
|
शरदचंद्रजी पवार साहेबांना सार्ववभौम पोर्टलच्या वतीने कोटी कोटी शुभेच्छा..!
- सागर शिंदे
=============
"सार्वभाैम संपादक"
सागर शशिकांत शिंदे
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" १०० दिवसात २०७ लेखांचे १४ लाख २ हजार वाचक)