"नायबचा" नवाब "प्रांतकार्यालयात"; "बाई" ..! "डाळींब" सोलून देता का ? "महिलेचा" अवमान, तक्रार दाखल
"बाई" साहेब..! डाळींब सोलून देता का ? |
निवडणुकीची "रणधुमाळी" सुरू असताना "प्रांताधिकारी" कार्यालयात वेगळीच "रंगत" सुरू असल्याचे ऐकायला मिळाले. "महसुल" खात्यातील एक "नवाब" अधिकारी महोदय महिलेकडे जातात काय ! आणि त्यांना डाळींब सोलायला लावतात काय ! अर्थात या "अधिकाऱ्यांना" ठराविक कर्माचाऱ्यांनी "हुजरेगिरी" करून "राजेशाहीत" जगायची सवय लावलेली असते. त्यामुळे, त्यांना आपण "लोकशाहीतले नायब" आहोत की "राजेशाहीतले नवाब" हेच कळायला तयार नाही. साहेबांनी बाईसाहेबांना काम सांगितले खरे.! पण, त्यांचा इगो हर्ट झाला आणि त्यांच्यातली "दुर्गा" जागा झाली. तुम्हाला डाळींब सोलून द्यायची कामे माझी नाहीत. असे थेट उत्तर देत. हवेत गेलेल्या नवाबांना बाईंनी जमिनीवर आणले. हे प्रकरण इथेच थांबले नाही. तर, त्यांनी थेट प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. आता, जर विभागीय कार्यालयातून प्रस्ताव गेला. तर, "अपशब्दांचा" वापर, "अधिकारांचा गैरवापर" आणि "महिलेशी गैरवर्तन" अशा शासकीय शब्दान्वये साहेबांचा "नकाब" देखील उतरु शकतो. त्यामुळे, साहेबांनी क्षमा मागूनही प्रकरण "जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात" गेले आहे. आता कारवाई तर होणारच..!!?
येथे डाळींब सोलून मिळत नाही.! |
डाळींबाचा प्रश्न उलला ? |
असाचा काहीसा अपमान बाईसाहेबांना पचला नाही. त्यांनी डाळींबासह साहेबांवर ताव खाल्ला. अधिकारी असले म्हणून काय झाले. कोणती कामे कोणाला सांगायची याचा क्वामन सेन्स त्यांनी समजून सांगितला. महिलेचा पारा चढताच साहेबांनी माघार घेतली आणि क्षमा देखील मागितली. आता हे प्रकरण येथे मिटेल असे वाटले होते. पण, "ज्याने गुरू नाही केला. त्याचा जन्म वाया गेला". असे बोलले जाते. त्यामुळे, झालेही तसेच. बाईसाहेबांनी उशिराने तक्रार दाखल केली. या "उत्खननामुळे" संगमनेरात चांगलीच खळबळ उडाली. "बाई-साहेबांची" गोष्ट तालुक्यात चांगलीच चविचा विषय ठरली आहे.अर्थात डाळींब सोलण्यास सांगणे चुक आहेच. पण, साहेबांनी दिलगिरी देखील व्यक्त केली. तरी देखील डाळींबाला उशिरा रंग चढला कसा ? ही चिकित्साची गोष्ठ ठरली आहे. याप्रकरणी चौकशी होईल. कोण चुक कोण बरोबर हे चौकशी अहवालात निष्पन्न होईल. मात्र, कधीकधी समज-गैरसमज होऊन असे प्रकार होतात. असे जाणकारांना वाटते आहे. बाकी आता राम भरोसे..!!
दरम्यान संगमनेर शहरात एका पदाधिकाऱ्याला जमावाने चांगलाच चोप दिल्याचे समोर आले आहे. गल्लीबोळात शिरुन प्रेम करू पाहणाऱ्या या एकतर्फी प्रेमविराला तरुणांनी चांगलेच "हाताच्या पंजा"ने चोपले आहे. विनंती केल्यानंतर या प्रकारावर पडदा पडला तरी याचे देखील उत्खनन होऊ शकते. अशी माहिता सुत्रांनी दिली.
- सागर शिंदे
==================
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" १०० दिवसात २०० लेखांचे १२ लाख ५२ हजार वाचक)