भाजपच्या "इडीचा डाव" राष्ट्रवादीने "रडीने" हताळला..!! "रडगानं" सुरूच !!
अकोले :-
आजवर इतिहासाच्या पटलावर अनेक "डाव" पाहिले. ते म्हणजे, "भातुकलीच्या" डावापासून तर "द्रैपदीचा लिलाव" करणाऱ्या पांडवांच्या "द्यूत" खेळापर्यंत. येथे "कौरवांच्या" एकाच डावाने सगळे "पांडवप्रस्त" होत्याचे नव्हते झाल्याचे इतिहास "गवाह" आहे. असेच "उध्वस्त" करणारे "डाव" अधुनिक काळात देखील "इडी" सारख्या भयानक रुपाने पुढे येऊन सगळी "धनसंपदा" लुटू पहात आहे. या "इडीला" उत्तर म्हणून राष्ट्रवादीने "रडी"चा डाव खेळणे सुरु केला आहे. म्हणूनच शरद पवार, अजित पवार, राहित पवार, जितेंद्र आव्हाड आणि डॉ. किरण लहामटे या आणि अशा अनेकांनी "भंडाऊन" सोडलेल्या "इडीला" "उत्तर" देण्यासाठी "भावनिक" राजकारण सुरु केले आहे. त्यातून, संपत आलेल्या राष्ट्रवादीला पुन्हा उभे कराण्यासाठी "रडून-रडून" का होईना जनतेच्या "ह्रदयाला" स्पर्श करण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला आहे. त्यामुळे "इडीच्या" प्रश्नाला "रडीने" उत्तर, अशीच भुमिका राष्ट्रवादीने घेत "सहानुभूतीची" लाट निर्माण केल्याचे बोलले जात आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या "मक्तेदारीला" कंटाळून म्हणा की, "इव्हीएमच्या" आशिर्वादाने म्हणा. पण, केंद्रात व राज्यात भाजप- सेनेची "सत्ता" आली. हे विरोधकांचे आरोप असले तरी "कमळ फुलले" हेच वास्तव. पण, हे अस्तित्व टिकविण्यासाठी "विकास" प्रश्नांपेक्षा भाजपने "राष्ट्रीय आस्मिता" व "इडी" सारख्या संस्थेचा "भोकाडी" म्हणून वापर केल्याचे आरोप केले जात आहे. "येतो की खोलू पाईल". अशी व्यंगचित्रे सोशल मीडियावर गेल्या अनेक दिवसांपासून फिरु लागली आहेत. त्याला अनुसरुन विचार करता. राष्ट्रवादीच्या २० पेक्षा जास्त मात्तबरांनी भाजपत प्रवेश केला. हे सगळे धुतल्या तांदुळासारखे निर्मळ नाही. तर, बहुतींशी बंडखोरांवर काहीना काही आरोप आहेत. ही "भोंडबाऱ्यासारखी" फुटातूट काही कालांतराने थांबेल असे वाटत होते. मात्र, याला "पुर्णविराम" बसण्याऐवजी त्याची "फासे" थेट "राष्ट्रवादीच्या मुळावर" फेकण्यात आले आणि चक्क शरद पवार यांच्यावर "इडीने" गुन्हा दाखल केला. तेव्हापासून जे "इडीचा" डाव "रडी"वर गेला. तो आजवर.
एकीकडे उतारवयात काही संबंध नसताना १२० (ब) प्रमाणे शरद पवारांवर आरोप करण्यात आले. त्यामुळे सगळ्या राज्यात निष्ठावंत कार्यकर्ते रडू लागले. त्यांचे सांत्वन करत पवार साहेबांनी इडीला सामोरे जाणे टाळले. त्यातून बाहेर पडताय कोठे, नाहीतर लगेच अजित पवार यांनी आमदारकीचा राजिनामा देऊन प्रेस घेतली. काकांना त्रास झाला असे भावनिक आवाहन करीत आम्हालाही "मन" आहे ना राव. फालतू आरोप करण्यालाही काहीतरी सिमा असते. ज्या बँकेत ११ ते १२ हजार कोटींच्या ठेवी आहेत. तेथे २५ हजार कोटींचा घोटाळा कसा होऊ शकतो.? असे म्हणत इडीचे उत्तर रडू कोसळून दिली. या मन भरून आलेल्या दोन आश्रुंनी असे भावनिक वातावरण तयार झाले की, उभ्या महाराष्ट्रात दादांच्या कंठासोबत लाखो लोकांचा कंठ "दाटून" आला. आणि "राष्ट्रवादी पुन्हा" हा नारा गुंजू लागला. या रडारडीने भाजपचा डाव स्वत:वर उलटला की काय ? असे प्रश्न पडू लागले. त्यानंतर अनेकांचे कंठ दाटून आले. पण, ते मीडियासमोर येऊ शकले नाही. मात्र, जितेंद्र आव्हाड यांच्या भाषणाने कमालच केली. पवार साहेबांचे वय, त्यांचे आजारपण, हे जातीयवादी सरकार पाडण्याविषयीची तळमळ आणि पडत्या काळात सोडून गेलेले सहकारी हे सर्व भर सभेत मांडले. आणि नकळत खुद्द शरद पवार साहेबांना "हुंदका" अनावर झाला. आता हे सर्व माध्यमांच्या कॉमेरॅत येणार नाही. असे झाले तर नवलच. त्यामुळे पहडासारख्या "जाणत्या राजाला" रडताना उभ्या महाराष्ट्राने पाहिले. हे वातावरण इतके भावनिक झाले की, जनतेच्या डोळ्यातून आणि भाजपच्या अंगातून घाम निघू लागला. हे रडगाणं असंच चालु राहिले. तर, कमळ आश्रुंच्या पाण्यात बुडून जाईल. हे कळून चुकले. पण, नशिब की "आश्रुंना शो कॉज नोटीस" काढता येत नाही. नाहीतर असाही काही नियम सरकारकडून जारी करण्यात आला असता यात शंका नाही. असे बोलले जाऊ लागले.
रोखठोक सार्वभौमच्या ८ लाख २५ हजार वाचकांना दसरा आणि विजया दशमीच्या (धम्मचक्र परिवर्तन दिन) हार्दीक शुभेच्छा..!!
आजवर इतिहासाच्या पटलावर अनेक "डाव" पाहिले. ते म्हणजे, "भातुकलीच्या" डावापासून तर "द्रैपदीचा लिलाव" करणाऱ्या पांडवांच्या "द्यूत" खेळापर्यंत. येथे "कौरवांच्या" एकाच डावाने सगळे "पांडवप्रस्त" होत्याचे नव्हते झाल्याचे इतिहास "गवाह" आहे. असेच "उध्वस्त" करणारे "डाव" अधुनिक काळात देखील "इडी" सारख्या भयानक रुपाने पुढे येऊन सगळी "धनसंपदा" लुटू पहात आहे. या "इडीला" उत्तर म्हणून राष्ट्रवादीने "रडी"चा डाव खेळणे सुरु केला आहे. म्हणूनच शरद पवार, अजित पवार, राहित पवार, जितेंद्र आव्हाड आणि डॉ. किरण लहामटे या आणि अशा अनेकांनी "भंडाऊन" सोडलेल्या "इडीला" "उत्तर" देण्यासाठी "भावनिक" राजकारण सुरु केले आहे. त्यातून, संपत आलेल्या राष्ट्रवादीला पुन्हा उभे कराण्यासाठी "रडून-रडून" का होईना जनतेच्या "ह्रदयाला" स्पर्श करण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला आहे. त्यामुळे "इडीच्या" प्रश्नाला "रडीने" उत्तर, अशीच भुमिका राष्ट्रवादीने घेत "सहानुभूतीची" लाट निर्माण केल्याचे बोलले जात आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या "मक्तेदारीला" कंटाळून म्हणा की, "इव्हीएमच्या" आशिर्वादाने म्हणा. पण, केंद्रात व राज्यात भाजप- सेनेची "सत्ता" आली. हे विरोधकांचे आरोप असले तरी "कमळ फुलले" हेच वास्तव. पण, हे अस्तित्व टिकविण्यासाठी "विकास" प्रश्नांपेक्षा भाजपने "राष्ट्रीय आस्मिता" व "इडी" सारख्या संस्थेचा "भोकाडी" म्हणून वापर केल्याचे आरोप केले जात आहे. "येतो की खोलू पाईल". अशी व्यंगचित्रे सोशल मीडियावर गेल्या अनेक दिवसांपासून फिरु लागली आहेत. त्याला अनुसरुन विचार करता. राष्ट्रवादीच्या २० पेक्षा जास्त मात्तबरांनी भाजपत प्रवेश केला. हे सगळे धुतल्या तांदुळासारखे निर्मळ नाही. तर, बहुतींशी बंडखोरांवर काहीना काही आरोप आहेत. ही "भोंडबाऱ्यासारखी" फुटातूट काही कालांतराने थांबेल असे वाटत होते. मात्र, याला "पुर्णविराम" बसण्याऐवजी त्याची "फासे" थेट "राष्ट्रवादीच्या मुळावर" फेकण्यात आले आणि चक्क शरद पवार यांच्यावर "इडीने" गुन्हा दाखल केला. तेव्हापासून जे "इडीचा" डाव "रडी"वर गेला. तो आजवर.
आता रडायचं अन लढायचं !! |
आता "राजा तशी प्रजा" साहेबांनी भावनिक वातावरण तयार केले. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन अकोल्यात डॉ. किरण लहामटे यांनी एक सभेत आपल्या आश्रुंना वाट मोकळी करुन दिली. जो व्यक्ती दोन वेळच्या अन्नासाठी काबाड कष्ट करतो. त्याने डॉ. लहामटे यांना उमेदवारीसाठी शंभर रुपये देऊ केले. अर्थात त्याने या इतिहासातील खारीचा वाटा उचलु पहीला. हे अनेकांच्या मनाला भावले आणि डॉक्टरांना त्यांच्या सोबत राहुन लुटणारे काही "संधीसाधू" आणि पै-पै जमा करून त्यांच्या पदरात मदत टाकणारी जनता. यांची तुलना करता. डॉ. लहामटे यांना आश्रु अनावर झाले आणि त्यांनी पवारांचा पायंडा कायम ठेवला. या बातम्या माध्यमांनी उचलुन धरल्याने "राष्ट्रवादी पुन्हा" चे नारे तालुक्यात गुंजला. डॉ. लहामटेंचे डोळे कोरडे होतात कोठे नाहीतर.लगेच जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांवर अभिमान व्यतीत करीत साहेब चक्क दोन तास त्यांच्या प्रचारात राहिले. हे त्यांच्यासाठी ऐतिहासिक क्षण आहे. असे म्हणत त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. यावेळी उपस्थितांचा कंठ दाटला आणि एकाच वेळी टाळ्यांचा कडकडाट झाला. आव्हाडांच्या व पवारांच्या जयघोषाने मुंब्रा नगरी दुमदुमून गेली.
अर्थात भाजपने नेहमी अस्मितेचा राजकारण केलेे आहे. पुलवामा, बालाकोट, जम्मु कश्मिर, अभिनंदन, सर्जिकल स्ट्राईल, राम मंदिर अशा राष्ट्रीय अस्मिता पुढे करून मते मागितली. असे विश्लेषक म्हणतात. तर, आता इडीचा डाव राष्ट्रवादीने रडीवर नेवून भावनिक राजकारण केले. तर, बिघडले कोठे ? असे आम जनतेला वाटते. आता ही इडी कुठवर चालणार हे माहित नाही. पण, "रडी"ने वातावरण फिरतय की काय ? असे वाटू लागले आहे. याचे काही होवो. पण, इतिहास याची नोंद घेईल असाच इतिहास घडेल. यात शंका नाही.परंतु एक गोष्ट प्रकर्षाने नमुद करावीशी वाटते की, जे कोणी आपण रडताना पाहिले आहे. त्यांचे आश्रु कदापि खोटे नाहीत. जो त्या क्षणातून जातो. त्यांच्या काळजाला काय वेदना होतात. हे तोज जाणो. हे लेखकाने केलेले भांडवल आहे. बाकी वास्तव काय याचा अर्थ जो तो परिने लावावा.
रोखठोक सार्वभौमच्या ८ लाख २५ हजार वाचकांना दसरा आणि विजया दशमीच्या (धम्मचक्र परिवर्तन दिन) हार्दीक शुभेच्छा..!!
-- सागर शिंदे
===============
"सार्वभाैम संपादक"
- सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ७० दिवसात १४० लेखांचे ८ लाख २५ हजार वाचक)