उध्दव ठाकरेंच्या "बाणाने" उडविली "बाजीप्रभू" थोरातांची "खिल्ली"
आता थोरात आणि जोरात, होऊन जाऊद्या !! |
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर संगमनेर मधुन शिवसेनेने आज रणशिंगण फुंकले गेले. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना शह देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संगमनेरला आज हजेरी लावली. उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र तेजस ठाकरे यांची आज प्रथमतः संगमनेर मध्ये राजकीय स्टेजवर उपस्थिती दिसली. त्यांना संगमनेर मधुन तरुणांचा व युवा सैनिकांनचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाल्याचे पहावयास मिळाले.
गुनगान गायले, धन्यवाद !! |
साहेब !! आज त्यांनी दोघांवर बाण सोडले .!! |
आता इतिहासाचे दाखले याना आठवू लागले आहेत. "बाजीप्रभु" कोण आहेत हे माहीत आहे का ? कशासाठी लढले ते स्वराज्यासाठी लढले. त्यांनी स्वराज्यासाठी रक्त सांडवलं. यांचं काय सांडलं ? आक्कल उतू जाते बाकी काय नाही. अशा शब्दात थोरतांचे नाव न घेता टोला लगावला. थोरात साहेब तुमचे नेते बँकॉकला पोहोचले. तेव्हा, तुम्ही काय प्रचार करू नका. आराम करा. नाहीतरी जनता तुम्हाला घरी बसवणारच आहे. कुठे छत्रपती, कुठे बाजीप्रभु आणि कुठे हे ? उपमा देण्यासाठी काहीतरी संबंध लागतो. यांच्या करामती काही सांगायला नको. जे करायला घाबरत नाही, ते मी बोलायला का घाबरू ? जे खरं आहे ते खरं आहे. ठाकरे खरं बोलायला घाबरत नाही.
युतीच्या सरकारमध्ये कामांबद्दल जी नाराजी होती ते मार्गी लावली. म्हणुन, आम्ही युती बरोबर आहोत. साठवर्षे सत्ता देऊनही महाराष्ट्र विकासाशिवाय तडफडला. मग, आता जाहीरनाम्यात लिहताय ८०टक्के भुमीपुत्रांना प्राधान्य. आता त्यांना बेकारी कळतेय आता हे स्वतः बेकार झाल्यावरच यांना कळलं आहे. पवार साहेब देखील बेकार झाले आता. बेकार झालेल्या नेत्यांचे मोर्चे काढताय. परंतु भूमिपुत्रांनाही प्राधान्य युती सरकार देणार. सर्व चांगली लोक आपल्याकडे आली आहेत. वैभव पिचड देखील आले आहेत.
नाराज राहु नका, पिचड आपलेच आहेत !! |
मला पार्टीकडून सांगितले नगर-अकोल्याचे सैनिक नाराज आहेत. काल मी शिवतीर्थावरून सांगितले. ज्या शिवसेनेच्या जागा भारतीय जनता पार्टीला सोडल्या. तिथले स्थानिक शिव सैनिक नाराज झाले त्यांची काल ही माफी मागितली. आजही ही मागतो. हा निर्णय मी पक्ष प्रमुख म्हणुन घेतला. यात कोणालाही दोषी ठरवु नका. जे मी केलंय ते मीच केलंच आहे. आणि ते तुमच्यासाठी केलं आहे. त्यामध्ये माझ्या मनात कुठलंही पाप नाही. निवडणूका म्हणजे "फड" नाही, करमणूक नाही, मी शिवतीर्थावरून महाराष्ट्राला वचन दिले आहे. गोरगरिबांसाठी १० रु थाळी देणार. प्रत्येक जिल्ह्यात सुपरस्पेशालिस्ट हॉस्पिटल देणार. ७/१२-८ कोरा करणार. मुंबई-पुणा रस्ता करतोय, समृद्धी महामार्ग करतोय, निळवंडे करतोय यासाठी सत्ता हवी आहे. कर्जमुक्त नाहीतर चिंता मुक्त करणार. शेतकऱ्याना १० हजार रुपये देणार यासाठी मला तुमच्या आशिर्वादाची गरज आहे.
ना. विखे व शिवसेनेचा गोतावळा |
पुढील अंकात वाचा उद्धव ठकरे यांच्या भाषणाचे राजकीय विश्लेषण, काय हवे होते आणि काय नको.!!
--------------
उद्या वाचा
एकास एक उमेदवारीच्या प्रयत्नांचे शिल्पकार विनय सावंत यांची विशेष मुलाखत..!
--------------
उद्या वाचा
एकास एक उमेदवारीच्या प्रयत्नांचे शिल्पकार विनय सावंत यांची विशेष मुलाखत..!
सुशांत पावसे
संगमनेर प्रतिनिधी