उमेदवार झाला "हायजॅक" !?, फोन "आऊट आॅफ कव्हरेज"..!! वंचित नेत्यांचा संताप, उद्या भुमिका!
अकोले (प्रतिनिधी) :-
मतदान प्रक्रिया जसजशी जवळ येत चालली आहे. तसतसे अकोल्यात "राजकीयची हिट" वाढताना दिसत आहे. एकीकडे राष्ट्रवादी एकास एक उमेदवार देण्यासाठी आटापिटा करीत होती. तर, दुसरीकडे ठाकर समाज्याची मते "डायव्हर्ट" करण्यासाठी भाजपकडून अतोनात प्रयत्न केल्याचे दिसत होेते. आज उमेदवारी मागे घेण्याची अंतीम डेट होती. त्यामुळे सद्या नऊ पैकी ३ उमेदवार रिंगणार उरले आहेत. दोन दिवसापासून वचितच्या उमेदवाराची "पायधरणी" सुरू होती. मात्र, आज सकाळपासून हे महाशय "आऊट आॅफ कव्हरेज" गेल्याचे बोलले जात होते. आंतीम क्षणापर्यंत त्यांची शोधाशोध सुरु होती. मात्र, एकावरचड एक मलिदा मिळाल्याने विरोधकांना पाडण्यासाठी पुरक वातावरण निर्माण करण्याची परंपरा वंचितने कायम ठेवल्याचे बोलले जाऊ लागले. जर, विरोधकांना १९९९ प्रमाणे अल्पमतात पराभव पत्कारावा लागला. तर, ठाकर समाज आणि अकोलेकरांमध्ये वंचितचा चेहरा हा इतिहासात "व्हिलन" म्हणून रेखाटला जाईल. असे मत जनतेने आणि राजकीय विश्लेषकांनी मांडले आहे.सन २०१९ ची लोकसभा आठवतेय ना ? प्रकाश आंबेडकरांना भाजपची "बी टिम" म्हणून संबोधलं गेलं. तेव्हा वंचितच्या नाकाच्या शेंड्यावर राग आला. त्यानंतर असे वाटत होते. वंचितांना सामाजिक शहानपण येईल. पण, तसे झाले नाही. उलट, पुरोगामी आणि डाव्या विचारसारणीला स्विकारण्यापेक्षा जातीयवादी पक्षांना खतपाणी घालण्याचे काम करु पाहिले. तेच विधानसभेत पहायला मिळाले आहे. असा आवाज वैचारिक जनतेतून येऊ लागला आहे. तेच वातावरण, अकोल्यात पहायला मिळाले आहे. पिचड घराण्याचा पराभव करण्यासाठी अशोक भांगरे, विनय सावंत व अजित नवले यांनी पुढाकार घेतला आहे. "अब की बार, एक उमेदवार" असा नारा देऊन सर्व विरोधक एकवटले आहे. मात्र, वंचितने प्रकाश आंबेडकरांप्रमाणे एकला चलो रे ! चा नारा दिला आहे. बरं हा नारा सत्यवादी आहे का ? याचे चिंतन वंचितच्या चाहत्यांनी केले पाहिजे.
खरे पाहता वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी वंचित उमेदवार दिपक पथवे यांच्यावर प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. कोणत्याही कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता. वेळ आल्यानंतर आऊट आॅफ कव्हरेज गेले. त्यामुळे त्यांच्यावर नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.
काय होऊ शकते वंचितमुळे
ठाकर समाज्याची ४२ हजार मतदार आहे. तर आंबेडकरी जनतेचे १५ हजार मतदान आहे. यापैकी ५७ हजार पैकी ५ ते १० हजार मतदान वंचितला होऊ शकते असा त्यांचा अंदाज आहे. त्यामुळे, जीतका फायदा पिचडांना होईल तितकाच तोटा डॉ. लहामटे यांनी होईल. विशेषत: तळागाळात डॉ. लहामटे यांना जनाधार आहे. त्याचा फटका बसेल. पण, ही बहुतांशी मते "ज्याचा कर्चा त्याची चर्चा" अशी असल्याचे बोलले जाते. त्यामुळे याचा फायदा आणि तोटा योग्य ती वेळच दाखवून देईल. मात्र, डॉ. लहामटे यांना थोडाफार फरक पडू शकतो असे वाटते. असे असले तरी. वंचितचे पदाधिकारी उद्या काय निर्णय घेतात. त्यावर या मतांचे ७० टक्के वातावरण फिरेल. यात शंका नाही.
काय म्हणाले तालुकाध्यक्ष
पथवे यांनी आम्हाला सांगितले की, अर्धा तास माझा मोबाईल बंद लागेल. त्यानंतर आम्ही सगळ्या दिवसभर ते कोठे पळून गेेले. काही तपास लागला नाही. आम्ही घरी जाऊन पाहिले. पण, त्यांचा थांगपत्ता लागला नाही. त्यांनी जाणून बुजून आमच्याशी संपर्क तोडला आहे. आज आम्हाला लोकांची जी इच्छा आहे. त्यासोबत जायचे होते. जनभावनेचा आदर करायचा होता. पण, त्यांनी असा खोडसाळपणा करून आमचा व लोकांचा विश्वासघात केला आहे. आमचे १५ हजार मतदान तालुक्यात आहे. त्यांना काय सुचित करायचे. हे वरिष्ठ साहेबांशी बोलून उद्या पत्रकार परिषद घेऊन संबोधीत केले जाईल. वंचितचा वापर कोणाचे "अर्थ"पुर्ण हितसंबंध जोपासण्यासाठी होऊ नये. यासाठी आम्ही भुमिका घेणार आहोत.
- गणीभाई ईनामदार
(वंचित घ. तालुकाध्यक्ष)
-- सागर शिंदे
===============
"सार्वभाैम संपादक"
- सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ७० दिवसात १४० लेखांचे ८ लाख १५ हजार वाचक)