"साखर" कारखाना राजकीय "रडारवर"..तर कर्मचाऱ्यांचे "निलंबन अटळ" मुंडेंकडून "निषेध"
अकोले (प्रतिनिधी) :-
विधानसभेच्या निवडणुकांचा बिगूल वाजला आणि अनेकांनी इकडून तिकडे ऊड्या मारायला सुरूवात केली. त्यात पिचड साहेब असतील किंवा डॉ. लहामटे. त्यामुळे अकोल्यात तरी दोन्ही बंडखोरांची कुस्ती चांगलीच रंगात आली आहे. उभी हयात ज्या पिचड साहेबांनी भाजपला जातीयवादी संबोधून कारणे निमीत्त कारणे प्रवेश केला. तर उभी हयात भगवा गळ्यात घालून ज्या किरण लहामटे यांनी पवार साहेबांवर नको त्या भाषेत टिका केली. त्यांना हातात घड्याळ घालावे लागते.
काय दुर्दैव आहे या राजकारणाचे !! कालची "निष्ठा" आज "विष्ठेसारखी" झाली. नेते पळतात सत्तेसाठी आणि जनता अंधळी झाली. विकला गेला मीडिया पैशासाठी अन् लोकशाही पोरकी झाली.
असेच काहीसे दिसू लागले आहे. पण, इतक्या सगळ्या "विपक्ष" परिस्थितीत "रोखठोक सार्वभौम" समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधूता या तत्वांवर अजूनही पाय रोवून उभा आहे. कोणा एकाची बाजू घेऊन नाही. तर, वास्तवाची जाणिव करून देण्यासाठी. हे एक जनतेचे माध्यम आहे. म्हणून एक गोष्ट आनंदाने सांगावी वाटते. की, तालुक्यातच सोडा, शरद पवार, धनंजय मुंडेसाहेबांपासून तर अगदी अशोक भांगेर, अजित नवले, शांताराम वाळूंज, डॉ. लहामटे यांच्यासह अनेकांनी "सार्वभौम" चा अनुषंग घेऊन भाषणे केली आहेत. तर पिचड साहेबांपासून तर धुमाळ साहेबांपर्यंत बहुतांशी लोक या पोर्टचा आधार घेऊन दाखले देताना जनतेने पाहिले आहे. त्यामुळे आम्ही ८० दिवसात ९ लाख ७५ हजार जनतेच्या गळ्यातील विश्वासाचा ताईत बनलो आहे. "सार्वभौम" वर येणारे "राजकीय विश्लेषण" हे अकोले संगमनेरातच नाही. तर, राज्यात व्हायरल होते.
काल धनंजय मुंडे साहेब आले होते. त्यांनी सार्वभौमच्या लेखाचा संदर्भ घेत. कारखाना प्रशासनाची वरात काढली. ज्यांच्यासाठी खूप काही केले. ते सोडा पण, साहेबांना बुके देणे ही एमडी साहेबांची नैतिक जबाबदारी नव्हती ? कि त्यांनाही पुढे जाण्यास मज्जाव करण्यात आला होता ? या एक चुकीने आणि बुकेने सबंध राष्ट्रवादी दुखावली गेली आहे. त्याची सल "सार्वभौम" पोर्टलचा अनुषंग घेऊन मुंडे साहेबांनी व्यक्त केली आहे. याच पोर्टलने कारखाना कर्मचाऱ्यांची बाजू घेऊन "रविवारची" सुट्टी "गुरूवारी" कायम केली होती. पण, ज्या व्यक्तीने तो कारखाना उभा केला. ज्या एक हजार व्यक्तींचे कुटुंब ज्या पवारांमुळे उभे राहिले. त्यांना साधं एक फुल देऊ वाटले नाही. किती स्वार्थी लोक म्हणायचे हे असे मेसेज व्हायरल होत आहे. पिचड साहेब, गायकर साहेब, कैलास वाकचौर साहेब यांची कोंडी आपण समजू शकतो. परंतु एमडी साहेबांचे काय ? त्यांच्यावरिल दबावही समजू शकतो. पण, ज्यांच्यामुळे आपल्या घरातील चुल पेटते आहे. त्या कामगार युनियनने तरी पुढाकार घेतला का ? हेच कामगार मुख्यमंत्री येणार तर हेलीपॅड तयार करत होते. आणि पवार साहेब येणार तर यांना काय गवत उपटायची कामे लागली होती का ? असा सवाल राष्ट्रवादीच्या निष्ठावंतांनी केला आहे.
साहेबांच्या सभांना गर्दी करण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार येतात, आणि पालक आले तर तोंड लपवत फिरतात. यालाच म्हणतात, उपकाराचा फेड अपकाराने. यातील काही कामगार महाशय कारखाना सोडून गळ्यात कमळाच्या मफलरी घालुन फिरताना दिसत आहेत. यात दुधसंघ, प्रकल्प कार्यालयातील मास्तर, गडगंज पगार घेणारे कॉलेजचे प्रध्यापक. या सगळ्यांची निवडणुक आयोगाकडे पुराव्यांसह तक्रार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे, कालपासून संस्थात्मक प्रचाराचा खुला वावर कमी झाल्याचे दिलते आहे. दरम्यान, पुरावे दिले. तर, संबंधित व्यक्तीवर शंभर टक्के कडक कारवाई केली जाईल. असे, कारखाना एमडी साहेबांसह संस्था प्रशासक प्रमुखांनी सांगितले आहे. तर, अमित शहांच्या स्वागतासाठी कारखाना किती झोंबून आहे. हे देखील चित्र लायु दिसणार आहे.
अर्थात भाजपकडे मनुष्यबळाला तोटा नाही. त्यातल्या त्यात युती झाल्यामुळे दोन नद्यांसारखा संगम एक झाला आहे. त्यामुळे, खरे नितळ व निर्मळ पाणी कोणते. हेच साहेबांना समजायला तयार नाही. एक गोष्ट प्रमुख्याने वाटते आहे. पिचड साहेबांच्या मागे जवळ-जवळ ९५ टक्के लोकप्रतिनिधी आहे. मात्र, या पुढाऱ्यांमागे तळागाळातील जनता नाही. हे त्रीवर सत्य आहे. हे महाशय आपला कोठा वाढविण्यासाठी संख्याबळाचा अकडा देतील. पण, तो पुर्णत: ताकतीने व निष्ठेने आपल्या मागे उभा राहिल. असे जर कोणाला वाटत असेल. तर ते साफ खोटे आहे. त्यामुळे "टांगा फलटी, घोडे फरार" असे झाले नाही म्हणजे बरे.!
जसजशी मतदानाची वेळ जवळ येत चालली आहे. तसतशा अतर्गत हलचाली वाढताना दिसत आहे. अर्थात "सार्वभौमच्या नजरेत" अनेक शंका ह्या येत्या दोन दिवसात द्रृढ होतील. मात्र, जोतो आपापल्या हवेत आहे. काहींचे हितसंबंध खोलवर आहेत. वरवर मात्र, संदिग्धता आहे. त्यामुळे जे दिसते तसे नसते हे देखील नाकारुन चालत नाही.