"सत्ता", "पैसा" आणि "दहशतीचा "उन्माद" म्हणजे पिचड..!! होय..! मी त्यांचा "साक्षिदार" विनय सावंत "बोलतोय"...!!

अकोले (प्रतिनिधी) :-
                    उद्याची विधानसभा निवडणूक ही ऐतिहासिक पर्वाची साक्ष ठरणार आहे. कारण, या तालुक्याने गेली ४० वर्षे "अनन्वीत" अन्याय-अत्याचार सहन केला आहे. "पिचड" नावाच्या वाळवीने सगळा तालुका पोखरून काढला असून "सत्ता, पैसा आणि दहशत" यांचा "उन्माद" येथील गोरगरीब जनतेने अनुभविला आहे. ठराविक "पुढारी, "लाभार्थी" व त्यांच्या मागे-पुढे फिरणारी "जनता" यांचाच विकास झाल्याचे पहायला मिळते आहे. आता मात्र, ही मक्तेदारी मोडीत काढून "मतदार राजा" मैदाना उतरला आहे. त्यामुळे ही लढाई आता डॉ. लहामटे, भांगरे, तळपाडे, मेंगाळ किंवा कोण्या विनय सावंत यांची राहिलेली नाही. तर, या युद्धाचे सुत्र, स्वत: जनतेने हाती घेतले आहे. म्हणून याला निवडणूक म्हणता येणार नाही. तर ही "जागरुक" जनतेच्या "वैचारिक अस्मितेची" लढाई आहे. असे म्हटल्यास काहीच वावघे ठरणार नाही.

             आनंदाची बाब अशी वाटते की, गेली ४० वर्षे तालुक्यात सत्ता एखाद्या "माहेरवाशिनी" प्रमाणे "नांदत" राहिली. पवार साहेबांनी पालक म्हणून कधी मंत्रीपद तर सत्ता नसताना देखील विरोधी पक्षनेते म्हणून तालुक्याला सन्मान दिला. पण, दुर्दैव असे की, त्या ४० वर्षात तालुका जितका "सुजलाम, सुफलाम" व्हायला पाहिजे होता. तितका तो झाला नाही. पिचड साहेबांनी कामे केले नाही. असे आम्ही म्हटले तर ते चुक ठरेल. पण, जी कामे झाली. ती, सत्ता, निधी आणि मंत्रीपदे यांच्या तुलनेत ती काहीच नाही. असे आजच्या तरुण पिढीला वाटते. आणि ते का वाटू नये ? 
       आदिवासी समाज्यासाठी ९ टक्के बजेटची तरतुद आहे. त्या तुलनेत कोठे आहे या समाज्याचा विकास ? निधी, तरतुद आणि विकास यांचे कोठेही "संतुलन" बसत नसल्याचे येथे प्रत्येकाला दिसत आहे.  काय म्हणतोय तालुक्यातील खेड्या पाड्यातील रस्ता ? गेली २०-२० वर्षे खडीला डांबर माहित नाही. क्षेत्रफळाने मोठा आणि मीनी जम्मु-कश्मिर येथे असूनही अद्याप दळण-वळणाच्या सुविधा नाहीत. एकीकडे महिलांनी चंद्रावर पाऊले टाकलीत, आणि दुसरीकडे मरण दारशी आले. तर, आमची महिला दवाखान्यात पाऊल टाकू शकत नाही. किती मोठा विरोधाभास आहे हा. होय.! हेच वास्तव आहे या तालुक्याचे. आरोग्य नाही, शिक्षण नाही, रोजगार नाही, पर्यटन नाही किती प्रश्न मांडावेत, त्याला कोणतेच उत्तर शोधून सापडत नाही. त्यामुळे, "विकास" करायचा असेल. तर, "परिवर्तन" हवे आहे. यावर प्रत्येक व्यक्ती ठाम झाला असून येथेल तरूण रस्त्यावर उतरुन बदलाची ही "मशाल" स्वत: घेऊन पळत सुटला आहे. त्यामुळे, डॉ. लहामटे हे कोण्या पक्षाचे म्हणून नाही. तर, खऱ्या अर्थाने "जनभावनेचे प्रतिनिधित्व" करणार आहेत. यात शंका नाही.
   
        पिचडांनी कोणत्या पक्षात रहावं, कोठे सत्तांतर, हस्तांतर  किंवा पक्षांतर करावे. हा आमचा विषय नाही. मात्र, लोकांचे प्रश्न सोडवून विकास करावा. हिच मापक अपेक्षा होती. मात्र, त्यांनी "याला उभे करून", "त्याला पाडायचे", "त्याला पाडून", "आपण उभे रहायचे", हा असला भलताच "उपक्रम" सुरु ठेवला. त्यामुळे "मत विभाजन" होऊन त्यांनी गेली ४० वर्षे तालुक्यावर हुकूमत गाजविली. आज, जनता प्रश्न विचारु लागली तर म्हणे "विकासासाठी" पक्षप्रवेश केला. अर्थात हे सर्व "थोतांड" आहे. येथील जनता तुम्ही शिकविली नाही. पण, ती बाहेर जाऊन शिकून सवरुन तुम्हाला जाब विचारायला आली आहे. हे पाच वर्षे सोडा, गेली ४० वर्षे काय केले. याचा हिशोब द्या. !! साहेब, जनता आता "बोळ्याने दुध पित नाही". नव्या पिढीला समाजहित कळू लागले आहे. त्यामुळे, उद्या होणाऱ्या पराभवाला सामोरे जायला तयार रहा. हेच हा तालुका तुम्हाला खुनावतो आहे.
         साहेब..!! गेली ४० वर्षे तुम्ही ज्या तालुक्याचे आमदार आहात ना !! तेथील आदिवासी समाज्याच्या तरुणाचे "लिलाव होतात लिलाव" होय.!! दोन वेळच्या अन्नासाठी चाकण, नारायणगाव येथे रोजगारासाठी जणावरांसारखी बोली लागते. ती ही मानसांवर. कोणाचे आहे हे पाप ? याचे उत्तर आज रस्त्यावर उतरलेली जनता मागत आहे. देणार का उत्तर !!!
     
              आज सकाळी माळेगावात पिचड साहेबांशी आमची "आमने-सामने" झाली.  ते सांगत होते. मोदींनी ३७० हटवून "जम्मू-कश्मिर" मुक्त केले, "राफेल" भारतात आले. पण, साहेब..! त्यातून अकोल्याच्या किती तरुणांना रोजगार मिळाला याची आकडेवारी मिळेल का या तालुक्याला. आम्ही "राष्ट्रीय अस्मिता" मानतो. मात्र, "पोटाची" देखील एक "अस्मिता" असते. त्यावर तुम्ही गेली ४० वर्षे काहीच का बोलायला तयार नाहीत. फक्त एकच दुर्दैव मनाला वेदना देऊन गेलं. की, "गणपतराव देशमुख" सारखे व्यक्तीमत्व "११ वेळा आमदार" राहिले. दोन वेळा वगळता, आयष्यभर विरोधी बाकावर बसले. त्या तुलनेत तुम्हाला अवघी पाच वर्षे बसता आले नाही. याहुन खेद असा की, आपल्या उतारवयात मत मागण्यासाठी तुम्हावर ही वेळ यावी. हे माझ्या डोळ्यांना सहन झाले नाही. तेव्हा एकच प्रश्न मनात आडवा पडला. साहेब..!! विकास केला असता तर कदाचित ही वेळ आलीच नसती...!!
             अकोले तालुका "पुरोगामी" विचारसारणीचा व "डाव्या चळवळीचा" आहे. याच मातीत मधुकर पिचडांनी "फुले-शाहु-आंबेडकरांचे" नाव घेऊन राजकारण केले आहे. येथील बहुजन समाजाने याच तत्वांवर त्यांचे प्रतिनिधित्व स्विकारले होते. मात्र, एका रात्रीत असे काय झाले ? की, या महापुरुषांची तुम्हाला एॅलर्जी झाली आणि तुम्ही आरएसएस प्रणित भाजपचा झेंडा हाती घेतला. "विकास" म्हणाल तर, ४० वर्षात तुम्ही अकोल्याचे "नंदनवन" करु शकले असते. तुम्हाला पवार साहेबांसारखा "दिपस्तंभ" तुमच्या पाठीशी होता. मात्र, ती तुमची मानसिकताच नव्हती. त्यामुळे, घरं भरायचे सोडून तुम्ही अन्यत्र लक्षच देऊ शकले नाही. हीच खंत आज प्रत्येकाच्या मनात आहे. त्यामुळे, आम्ही सर्व राजकीय गोळाबेरजेतील विरोधक. व्यक्तीश: पिचड किंवा त्यांच्या कुटूंबाविरोधात नाही. तर, राजकीय "अपप्रवृत्तीच्या विरोधात" आमची "वैचारिक लढाई" आहे. त्यामुळे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असाच हा लढा निसर्गाने घडून आणला आहे. असे म्हटल्यास काहीच वावघे ठरणार नाही.

विनय सावंत (राजूर)

(रा. सेवादल व छात्रभारती)
    क्रमश: भाग २

   -- सागर शिंदे

उद्या संध्याकाळी वाचा शिवाजी राजे धुमाळ यांची विशेष मुलाखत भाग १

===============


             "सार्वभाैम संपादक"
                 

    - सागर शशिकांत शिंदे   

Rajratna.sagar@gmail.com
                  -------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ७५ दिवसात १५४ लेखांचे ८ लाख ३५ हजार वाचक)