ना. आठवलेंच्या "शिर्डी" पराभवाचे "शिल्पकार"; "जातीय" काँग्रेस-राष्ट्रवादीच. होय..! मी "साक्षिदार"
संगमनेर :-
आरपीआय म्हणजे संपुर्ण देशात, प्रत्येक राज्यात शाखा असलेली सामाजिक आणि राजकीय संघटना आहे. जेथे अन्याय, अत्याचार होईल तेथे जशास तसे उत्तर देण्यासाठी धाऊन जाणारी संघटना म्हणजे आरपीआय. या पक्षाचे प्रमुख मा.रामदास आठवले. काय जादु आहे या माणसात काही कळत नाही. जिथे जातील तेथे माणसांचा गराडा पडलेला असतो. कोणतीही अपेक्षा न ठेवता यांच्यावर लोक जिवापाड प्रेम करतात. अगदी यांच्यासाठी काहीही करायला समाज तयार असतो. आर्थिक बाबतीत समाज जरी फाटका असला तरी साहेबांसाठी मनाची श्रीमंती दाखविण्यास कुठेही कमी पडत नाही. अशा या लोकनेत्यास मुरब्वी आणि धुर्त राजकारण्यांनी शिर्डी मतदार संघातुन २००९ ची लोकसभा लढविण्यासाठी आणले आणि खुप मोठा पराभव करण्याच षंडयंत्र रचले गेले. त्यांचा पराभव करून आंबेडकरी चळवळ संपविण्याचे दिवास्वप्न बघीतली गेली.
दलीत अत्याचारग्रस्त म्हणुन बदनाम असलेला जिल्हा म्हणजे अहमदनगर. ज्याच्या नावात कानामात्रा वेलांटी नाही इतका सरळ परंतु साखर कारखानदारी व सहकारामुळे नवी सरंजामशाही निर्माण झालेला अहमदनगर जिल्हा होय. येथे काँग्रेस -राष्ट्रवादी पक्षातर्फे मा. रामदास आठवले यांना आघाडीची उमेदवारी देण्यात आली. रक्तात स्वाभिमान असल्यामुळे साहेबानी निवडणुक स्वत:च आस्तित्व जपत पंजा व घड्याळ नाकारुन कपबशी या निशाणीवर लढण्याचा निर्णय घेतला. आठवलेंनी सर्वात सुरक्षीत मतदार संघ म्हणुन या मतदार संघाची निवड खुद्द सोनिया गांधी आणि शरद पवार साहेबांकडुन करण्यात आली.
वरकरणी पहाता हे सर्व अगदी सुरळीत वाटत होते. पण, आतुन वेगळेच षडयंत्र चालु होते.पाचही तालुक्यातील आमदार हे काॅंग्रेस-राष्ट्रवादीचे होते. पण, या षडयंत्राची किंचतही चाहुल आठवले साहेबांना लागली नाही. साहेब शिर्डीतुन उभे रहात आहेत आणि आपल्याला आठवले साहेबांच्या विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायची अशी प्रतीज्ञा कार्यकर्ते करीत होते. समाजात नवचैतन्य निर्णाण झाले होते.
साहेबाचे समाजाप्रती योगदान अनमोल आणि अद्वितीय आहे. त्यामुळेच तरुणांसह जेष्ठ मंडळी, महीला, साहेबांना विजयी करण्यासाठी प्रचारात उतरल्या होत्या. जिल्ह्यातील आंबेडकरी नेते तन मन धनाने या प्रचारात सहभागी झाले होते. यामध्ये प्रामुख्याने अकोल्याचे सुपुत्र आठवले साहेबांचे मित्र विजयराव वाकचौरे साहेब, अशोकराव गायकवाड साहेब, दिपकजी गायकवाड, भिमाभाऊ बागुल, सुरेन्द्रजी थोरात, दिलीप मन्तोडे, श्रावण वाघमारे, सुधाकर रोहम, संतोष रोहम, शांताराम संगारे, बाळासाहेब गायकवाड, ही मंडळी साहेबांच्या विजयासाठी जिवाचे रान करीत होती.
वरवर जरी ही निवडणुक जिंकण्यासाठी सोपी वाटत होती. तरी, आतील षडयंत्र वेगळेच चालले होते. आठवलेंना पराभुत करण्यासाठी सर्व हेवेदावे बाजुला ठेऊन सर्व जातीयवादी व साखरसम्राट कट कारस्थान रचत होते. मी नावे लिहीत नाही. पण, कोणीही धुतल्या तांदळासारखे नाहीत एवढेच सांगतो. एक विशिष्ठ समुदाय, त्यांचे सोयरेधायरे, जिल्ह्यातील जेष्ठ नेते विखारी प्रचार करीत होते. आठवले साहेबांच्या प्रचाराचा शुभारंभ संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथे खांडेश्वर मंदिराच्या प्रांगणात होता. यावेळी, अनेक नेत्यांनी जोशपुर्ण भाषणे केली. जेव्हा मंदिरात नारळ फोडण्याची वेळ आली, तेव्हा आठवले साहेबांनी नारळ न फोडता तो महादेवाच्या पिंडीला अर्पण केला.
येथेच जातीवादी प्रचाराला सुरवात झाली. आठवले साहेबांविषयी धार्मिक, जातीय कुटता मतदारांमध्ये कशी निर्माण होईल यासाठी विशिष्ठ यंत्रना नियोजन करीत होती.
बाहेर अफवा पसरविली गेली. की, आठवले साहेबांनी पिंडीला नारळ फेकुन मारला. राजंनगावच्या सभेत एका जेष्ठ नेत्याने आपल्या भाषणात विखारी फुत्कार सोडले. तो म्हणाला, तुम्हाला रामराम हवा की जयभिम, निळ हवी की गुलाल, मेनबत्ती हवी की अगरबत्ती अशा पध्दतीने साहेबांच्या विरोधात प्रचार यंत्रना राबवीली जावु लागली. मात्र, याची थोडीशीही कल्पना साहेबांच्या गुप्तहेर यंत्रणेला अाली नाही. खास मुंबईवरुन ही टीम स्थानिकांच्या मदतीने प्रचारात येणार्या अडचणी सोडवीण्यासाठी आलेली होती. पण, अती आत्मविश्वासामुळे सर्वजन गाफील होते. आणि शत्रु त्याची चाल खेळला होता.
आठवले साहेबांनी भिमगर्जना केली. काँग्रेसवाल्यानो तुम्ही माझे सामान घराबाहेर फेकले. एक दिवस मी तुम्हाला सत्तेतुन या दिल्ली शहरातून बाहेर फेकल्याशिवाय राहनार नाही. आणि राजकीय गरज म्हणुन साहेबांनी मा.बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या अग्रहाखातर शिवशक्ती आणि भिमशक्तीचे एकत्रीकरण केले. आणि येथुनच काँग्रेस राष्ट्रवादीच्या विजयीरथाला लगाम लागला.भाजपा सेना आरपीआय युतीने त्यांना सत्तेतुन घरी बसवीले. हे शक्य झाले ते फक्त आठवले साहेबामुळे. साहेबांचा पराभव करणारे आज राकारणातुन संपले आहेत. ज्या नेत्यानी साहेबांना पराभुत करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनाच पक्षांतर करुन भाजपाची वाट धरावी लागली. एवढी बिकट आवस्था त्यांची आज झालेली आहे.काँग्रेस राष्ट्रवादीचा सत्तासुर्य मावळण्यास आठवले साहेबांचा शिर्डी पराभव आणि दिल्ली येथे साहेबांचे बाहेर फेकलेले सामान या दोन घटना कारणीभुत आहेत.आठवले साहेबांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास. हमको मिटा सके वो जमानेमे दम नही..! जमाना हमसे है ! हम जमानेसे नही.!