"डॉक्टरांच्या" कार्यकर्त्याने केले पिचडांच्या बॅनरचे "आॅपरेशन"..!"वेळ आली" तर आता "दांड्याने" उत्तर देऊ : "वाक्-युध्द" सुरू
अकोल्याच्या "संस्कृतीवर" चिखलफेक..! |
"बदल" हा निसर्गाचा नियम आहे. तर, "परिवर्तन" ही जनतेची मागणी. त्यामुळे, काही "अघटीत" घडून गेले. तर, त्याचे "नवल" नक्कीच असावे. परंतु, त्याचा "उन्माद" कधी नसावा. आता हाच उन्माद अकोल्यात दिसू लागला आहे. लोकांनी "राष्ट्रवादीच्या" हातात प्रतिनिधीत्व दिली. पण, ज्या डॉक्टरांना तालुक्याचे आॅपरेशन करण्याची संधी दिली. त्यांच्या कार्यकर्त्यांनी चक्क तालुक्याच्या "वैभवावर" (संस्कृती) चिखल फेकून "पुरोगामी" विचारांवर "मुठमाती" सोडली आहे. जेथे विकासाच्या "फिती" कापायच्या तेथे "द्वेषाने" विरोधकांचे "बॅनर" फाडून आम्ही "भेस" बदलला. परंतु, पुर्वाश्रमीचा "आरएसएसवादी" "बेस" बदलला नाही. हेच ही कृती सिद्ध करू पहात आहे का ? असा प्रश्न "वैचारिक जनतेने" उपस्थित केला आहे. पण, एक गोष्ट अधोरेखीत करुन ठेवा. पाच वर्षापुर्वी ज्या शरद पवारांनी बबनराव पाचपुतेंना सत्तेबाहेर बसविले. त्यास "प्रतिउत्तर" म्हणून जनतेने पुन्हा पाचपुतेंच्या गळ्यात विजयाची माळ घातली. त्यामुळे, पाच वर्षातील १ हजार ८२५ दिवसांचा "माज" जनता मतदानाच्या १ दिवसात उतरविते. हे गणित कोणी विसरु नये..! त्यामुळे, ज्या जनतेने तुम्हाला वैचारिक समजून शांतता प्रस्तापित करण्यासाठी कौल दिला आहे. त्या अकोल्यात कोणी अशांततेने कायदा व सुव्यवस्था निर्माण करण्याचे काम करू पहात असेल. तर, अणखी पाच वर्षानंतर हीच जनता व निर्भिड माध्यमे प्रश्न करतील. की, ज्यांनी "पुरोगामी" आणि "डाव्या चळवळीला" समोर ठेऊन भाषणे ठोकली. अशा डॉ. अजित नवले, विनय सावंत, सुरेश खांडगे, दशरथ सावंत, संपत नाईकवाडी, शांताराम वाळूंज, विनोद हांडे यांना ठणकाऊन विचारतील. काय हो साहेब..!! हेच का तुमचे पुरोगामीत्व ? आणि उजव्या हातांनी केलेले डावे विचार..!! त्यामुळे, उद्याचा प्रश्न कोण्या आमदारास नसेल. तर, याच बहुजन चेहऱ्यांना असेल. असे विचारवंतांचे मत आहे. त्यामुळे "समजून" वागायचे की "उमजून" जगायचे. हे त्यांनीच ठरविले पाहिजे.
शांतता, उत्तर आपण नाही, वेळ देईल..! |
खुप दुरचा काळ नाही. गेल्या लोकसभेला नगरमध्ये एका नेत्याचा "बॅनर फाडला" आणि काही क्षणात "दंगल उसळून" गेली. कोठे "दगडफेक" झाली. कोठे "लाठीचार्ज" झाला, एव्हाणा "गोळीबाराची" वेळ आली. करणारे करून गेला आणि सामान्य मानसांची "वाताहात" झाली. हेच अपेक्षित आहे का अकोले तालुक्यात ? विरोध हा तात्विक असावा. निवडणुक निकालानंतर द्वेेषाला मनात थारा नसावा. तुम्हाला आठवत असेल. लोकसभेच्या तिकीटाहुन थोरात- विखे हा पेटलेला वादाचा वनवा. निकालानंतर सुजय विखे व थोरात साहेब एकाच विमानात एकाच सिटवर बसून दिल्लीला गेले. काल विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि ना. राधाकृष्ण विखे व आ. थोरात यांनी हस्तांदोलन करून हातात हात घेतला. खरतर सामान्य जनतेने शिकले पाहिजे या नेत्यांकडून. पण नाही, आम्ही विरोधकांचे बॅनर फाडण्यात धन्यता मानतो. हेच आम जनतेचे दुर्दैव आहे.
"इलेक्शन" नंतर फक्त "रिलेशन"..!! |
..तर दांड्याने उत्तर देऊ..!! |
राहिला प्रश्न बॅनर फाडल्याचा. तर, एक गोष्ट सत्य आहे. की, तो आदिवासी तरुण डॉ. लहामटे यांचा कार्यकर्ता आहे. उंचखडक बु येथील गावपुढाऱ्यांच्या विरोधात त्याचे विचार असल्याचे बोलले जाते. ज्या गावात वैभव पिचड यांना शंभर मतांचे लिड आहे. तेथे एक ना दोन तब्बल चार मातब्बर पुढारी आहेत आणि एकही बडा नेता विरोधक नाही. असे असूनही ५११ पैकी २१५ मतदान डॉ. लहामटेंना होते. हा गावपुढाऱ्यांवरील कमी रोष नाही. पवार साहेबांची आस्मिता व शिवसेचा बंड यामुळे गावातील वातावरण तणावाचे होतेच. मात्र, स्थानिक ठिकाणी वादाचा मुद्दा पुढे आला नाही. त्याचे प्रतिबिंब थेट तालुक्याच्या ठिकाणी पहायला मिळाले. हा तरुण गरिब कुटुंबातला असला तरी, याला बळ देणारा "मास्टर माईंड" कोण ? याचा शोध सुरु आहे. हा "नशाधुंद" असला तरी याने आमदार किंवा भांगरेंचा बॅनर का फाडला नाही. वैभव पिचड हेच का त्याच्या नशेच्या अजेंड्यावर होते. विशेष म्हणजे एक बॅनर सकाळी फाडण्यात आला होता. त्याची वाच्चता नको. म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी तो बदलवून दुसरा लावला. पण, या बहाद्दराने त्यावर देखील चिखल फेकून फाडून टाकला. त्यामुळे, चुक एकदा होते. पण, त्याची पुनरावृत्ती होत असेल. तर, तो गुन्हाच आहे. या प्रकारानंतर "भाजप कार्यकर्ते" म्हणायला थोडे "जड" जाईल. पण, "पिचड समर्थकांनी" आक्रमक भुमिका घेतली. जर, समजून सांगून एकत नसाल. तर "दंडे" हातात घ्यावे लागतील. त्यामुळे, पोलीस निरीक्षक आरविंद जोंधळे यांनी अतिशय दक्ष भुमिका घेत. संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन खाक्या दाखविला. कायदेशिर कारवाई करत समज देखील दिली.दरम्यान नगरपंचायत व पीडब्ल्युडी यांची अनाधिकृत बॅनरची भुमिका अतिशय भोंगळ पद्धतीची राहिलेली दिलते आहे. यातून त्यांनी देखील धडा घेणे गरजेचे आहे. तर, विजयाचा उन्माद असाच चालत राहिला. तर, एका जत्रेत देव म्हातारा होत नाही. हे येणारा काळ जनता दाखवून देईल. यात शंका नाही. अशा प्रतिक्रिया जनतेतून येऊ लागल्या आहेत.
- सागर शिंदे
==================
- सागर शिंदे
"सार्वभाैम संपादक"
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ९० दिवसात १७५ लेखांचे ११ लाख वाचक)