"निळवंड्याचे" पाणी अकोले-संगमनेरात "पेटले" त्याचे "राजकारण" करून पिचड- थोरातांनी "मत लुटले"!!? -आरोप
आज फिर हैं ! पाणि-पाणि..!! |
संगमरेचा विकास झाला नाही. असे म्हणता येणार नाही. पण, विकास कोणाचा झाला. हा प्रश्न महत्वाचा आहे. ठराविक ठेकेदारांची "मक्तेदारी" आणि "कुटुंबशाही" या गोतावळ्यात जितका विकास झाला. की, कालपर्यंत थोरात साहेबांच्या समर्थनार्थ असणारी जनता. विरोधात कशी गेली. हे कळलेच नाही. या दरम्यान मतांचे राजकारण करण्यासाठी निळवंड्याचे "पाणी पेटवायची" नैटंकी पिचड आणि थोरातांनी जोरात केल्याचे जनतेने पाहिले. पण, आता स्वार्थापोटी पिचड भाजपात गेले आणि पाणीप्रश्न सुटला असे समजा. अशा घोषणेचा टेंभा टाकून मुख्यमंत्री महोदय चालते झाले. पण, संगमनेरच्या राजकारणात खऱ्या अर्थाने आग लागली. आता नशिब थोरातांचे. की, येथे भाजपला उमेदवारी मिळायला यश आले नाही. नाहीतर तळेगापासून तर वर निळवंड्यापर्यंत पाण्याला आग लागली असता. आश्वसनांच्या खैरातीवर शेतकऱ्यांचे पोटं भरले असते. प्रत्यक्षात काय ? हे निवडणुकीनंतरच समजले आसते. आता काही झाले तरी मुख्यमंत्री संगमनेरात येत नाहीत. पण, कालव्यांचा प्रश्न आणि धरणांची उंची वाढवून जे पाणी गढूळ केले आहे. त्यावर उदया काय राजकारण पेटतय हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. तर, जे पिचड ओरडू-ओरडू सांगतात. अकोल्याचे थेंबभर पाणी खाली जाऊ देणार नाही. वेळ आली तर पहिले आम्ही आडवे पडू. अशी विधाने. आणि मुख्यमंत्री म्हणाले, निळवंडे कालव्याचा प्रश्न सुटला असे समजा. त्यामुळे पिचड मुख्यमंत्र्यांपेक्षा वरचड ठरतात की, मुख्यमंत्री त्यांना दाबतात. हे लवकरच उघड होईल. मात्र, ही संगमनेरकर व अकोलेकरांची फसवणुक होत असल्याचे नेत्यांच्या विसंगत अश्वासनांतून लक्षात येऊ लागले आहे. त्यामुळे मतदार राजाने जागरुक राहुन योग्यतो निर्णय घ्यावा. असे माध्यमांतून संदेश पुढे येऊ लागले आहेत.
जागा गेली सेनेला, घाई केली की काय घोषनेला !! |
संगमनेर विधानसभेची निवडणुक ही पाणी प्रश्नावरच गाजत आहे. मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ मुक्त महाराष्ट्राची केलेली घोषणा जिरायती भागातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी वाटते. त्यामुळेच विरोधकांन कडुन पाणी प्रश्नाचेच मुद्दे प्रचारात केंद्रस्थानी राहतील असे दिसुन येत आहे. निळवंडे कालव्यांच्या प्रश्नांची सोडवणूक मुख्यमंत्र्याने एन निवडणूकीच्या तोंडावर केली याचा सकारात्मक परिणाम झाला. कालव्यांच्या कामाला सुरुवात झाली.
जे ३५ वर्षे घडले नाही. ते मुख्यमंत्र्यांनी एक तासाच्या बैठकित केले. परंतु निळवंडे कालव्याचा प्रश्न अडला होता की अडवला होता ? असा संभ्रम आज ही जनतेत आहे. कालव्यांची कामे अकोल्यातुन सुरू होयला हवी होती. परंतु पिचड होऊ देत नाही. याकारणाने ज्या वेळेस तळेगाव निमुन भागात पिचड साहेबांचे पुतळे जाळायला सुरवात झाली. तेव्हा आमदार थोरतांनी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनची बाजू घेऊन ठोस भूमिका घेयला हवी होती. परंतु तसे न करता याउलट योगदान देणार्यांचे पुतळे काय जळता. असे वक्तव्य करून थोरतानी शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठच चोळले होते. याची खदखद तळेगाव-निमुन गटात आजही दिसून येते. मात्र, या परिस्थितीत विखें पाटीलनी एक पाऊल पुढे टाकून पिचडांबरोबर घेऊन कालव्यांच्या प्रश्नात मार्गच काढला. नाही तर बदलत्या राजकीय प्रवासात आपल्या बरोबर घेऊन थोरतांना एकाकी पाडले.
हात जोडतो तुम्हाला, पाणी द्यावे शेतीला !! |
साकुर भागातील पिंपळगाव खांड धरणाच्या पाण्याचा प्रश्न ही असाच प्रलंबित राहिल्याने या धरणाच्या लाभ क्षेत्रातील गावे पाण्याच्या प्रतीक्षेत आहे. या पाण्यासाठी वास्तविक आग्रही भूमिका घेऊन थोरात यांनी पिचडांकडे आग्रह धरून पाणी मिळवायला हवे होते. पण ते ही ते करू शकले नाही. सद्या पाऊसाचे प्रमाण अधिक असल्याने दुष्काळाचे चटके बसत नाही. परंतु ह्या वर्षीच्या उन्हाळ्यात दुष्काळाने मात्र शेतकरी होरपळून निघाला. नदीपासुन 2 कि.मी अंतरावरच असूनही मोठ्या प्रमाणात दुष्काळाच्या झळया पहायला मिळाल्या.
नदीचा भाग सोडला तर संगमनेरमध्ये ही मराठवाड्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. तळेगाव गट, निमुन गट, साकुर गट या भागात दुष्काळाची तीव्रता मोठया प्रमाणात आहे. दुष्काळ परिस्थितीमुळे स्थानिक बाजारपेठेत ही आर्थिक उलाढाल मंदावलेली दिसते. संगमनेर विधानसभा ही शेतकरी बेल्टवरच अवलंबून असते. आणि ह्याच परिस्थितीचा फायदा उचलत विरोधकांनी थोरतांनवर टीकेची झोड उठवत ३५ वर्षाच्या राजकारणात पाण्याचा प्रश्न मिटवू शकले नाही. अजुन किती संधी देणार असा प्रश्न सोशल मीडियावर नागरिकांकडून विचारले जात आहे.आता पाणी पिचडांकडे, सत्ता भाजपकडे, विरोधक विखेकडे आणि प्रश्न जनतेकडे. त्यामुळे चारही बाजुंनी थोरातांची कोंडी झाल्याचे दिसते आहे. आता यावेळी, थोरात साहेब कोणते पिल्लू काढतात. याकडे विरोधकांचे लक्ष लागले आहे.
-- सुशांत पावसे
(संगमनेर प्रतिनिधी)
===============
"सार्वभाैम संपादक"
- सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ७२ दिवसात १४४ लेखांचे ८ लाख १० हजार वाचक)