"सावधान"..!! उद्याचा निकाल "धक्कादायक" असू शकतो., कोण होईल "आमदार" !!
अकोले (प्रतिनिधी) :-
"बेगाने" शादीमे आब्दुल्ला "दिवाना" ही म्हण तुम्ही एकली आहे ना ? त्यालाच अनुसरुन मला अकोल्याच्या तमाम नागरिकांना "नम्र विनंती" करायची आहे. मित्रांनो...!! निवडणुक लोकशाहीचा उत्सव नक्कीच आहे. पण, त्याला गालबोट लागणार नाही. याची जबाबदारी आपलीच आहे. हे विसरु नका. तुम्ही ज्याच्यासाठी आज लढाल ना..! तो उद्या विरोधकाच्या मांडिला मांडी लावून बसलेला असेल. यात "उंदरांचा" जीव जाईल आणि "मांजरांचा" खेळ होईल. तुम्ही कोठे एकले नसेल की, दंगलीत आमदार, खासदार गेला. अथवा, १० आमदारांच्या टोळक्यावर "गोळीबार" किंवा "लाठीचार्ज". असे इतिहासात घडले नाही. पण, ज्यांच्यासाठी आपण जमतो. तो "सेफ" राहतो आणि सामान्य व्यक्तीचा "जीव" जातो. म्हणून. उद्या निकाल आहे. त्यामुळे, जे कोणी स्वत:ला झोकून देऊन वेळ आली. तर, दोन हात करणार आहे. त्यांनी एक पाऊल पुढे टाकताना हजारदा विचार करा. की, अकोल्यात साखर कारखान्यातील निवडणूक निकालात. संतोष तिकांडे यांचा हकनाक जीव गेला. अगदी त्या माऊलीने चिलेपिले पोटाशी कुरवाळून मोडका संसार उभा केला. नवलेवाडीचा तरुण आयुष्यभर आधू झाला. तर, इंदोरीचा एक तरुण गेल्या १५ ते २० वर्षापासून आजूनही बेडवर नि:शब्द देवाकडे अखेरचा श्वास मागत आहे. या कुटुंबाकडे कोणी राजकारणी डोकावून पहायला गेला नाही. मग का इतकी उठाठेव. कोणासाठी ?
तुम्हाला आठवतय ना !! अहमदनगर शहरातील "केडगाव दुहेरी हत्याकांड". दोन शिवसैनिकांची निघृण हत्या झाली होती. आज त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले. काय महागात पडली ही मपनाची निवडणुक.!! कोण आणून देईल का ? त्या आईला आपली मुले. कोण आणून देईल त्या मुलांना आपला बाप. त्यामुळे, जनतेने जो कौल दिला आहे. तो, स्विकारा. निकालाच्या वेळी संयम बाळगा. प्रशासनाला सहकार्य करा. हीच खरी लोकशाही आहे.
दुर्दैव असे की, गणेशोत्सव, शिवजयंती, मोहरम, ईद हे आणि असे अनेक सण उत्सव आजकाल पोलीस बंदोबस्तात साजरे करावे लागत आहे. हा खरा लोकशाहीचा अपमान आहे. आणि लोकशाहीचा उत्सव देखील पोलीस बंदोबस्तात साजरा करावा लागत असेल. तर, त्या ईतके दुर्दैव कोणतेच नसेल. त्यामुळे निवडणूक निकाला दरम्यान जशी जबाबदार नागरिक म्हणून मतदान केले. तसे निकालाच्या वेळी देखील शांतता बाळगवी. असे आवाहन लोकशाही समर्थक म्हणून आम्ही करत आहोत.
उद्या २२ फेऱ्यांमध्ये निकाल जाहिर होणार आहे. अटातटीची लढत आहे. महसुल व पोलीस यंत्रणा सज्ज आहे. "ज्याला जास्त मते तो आमदार होणार आहे". त्यामुळे कार्यकर्त्यांनो संयम बाळगा. आपले एक पाऊल चुकले. तर, उद्या तुमच्या संपुर्ण कुटुंबाची दिवाळी, दिवाळं काढू शकते. हे प्रकर्षाने मांडावेसे वाटले. एक पत्रकार म्हणून विनंती करावी वाटली. ती आपण स्विकाराल. अशी आशा बाळगतो. जो कोणी आमदार होईल त्याला मनस्वी शुभेच्छा. वाचत रहा. "रोखठोक सार्वभौम".
"बेगाने" शादीमे आब्दुल्ला "दिवाना" ही म्हण तुम्ही एकली आहे ना ? त्यालाच अनुसरुन मला अकोल्याच्या तमाम नागरिकांना "नम्र विनंती" करायची आहे. मित्रांनो...!! निवडणुक लोकशाहीचा उत्सव नक्कीच आहे. पण, त्याला गालबोट लागणार नाही. याची जबाबदारी आपलीच आहे. हे विसरु नका. तुम्ही ज्याच्यासाठी आज लढाल ना..! तो उद्या विरोधकाच्या मांडिला मांडी लावून बसलेला असेल. यात "उंदरांचा" जीव जाईल आणि "मांजरांचा" खेळ होईल. तुम्ही कोठे एकले नसेल की, दंगलीत आमदार, खासदार गेला. अथवा, १० आमदारांच्या टोळक्यावर "गोळीबार" किंवा "लाठीचार्ज". असे इतिहासात घडले नाही. पण, ज्यांच्यासाठी आपण जमतो. तो "सेफ" राहतो आणि सामान्य व्यक्तीचा "जीव" जातो. म्हणून. उद्या निकाल आहे. त्यामुळे, जे कोणी स्वत:ला झोकून देऊन वेळ आली. तर, दोन हात करणार आहे. त्यांनी एक पाऊल पुढे टाकताना हजारदा विचार करा. की, अकोल्यात साखर कारखान्यातील निवडणूक निकालात. संतोष तिकांडे यांचा हकनाक जीव गेला. अगदी त्या माऊलीने चिलेपिले पोटाशी कुरवाळून मोडका संसार उभा केला. नवलेवाडीचा तरुण आयुष्यभर आधू झाला. तर, इंदोरीचा एक तरुण गेल्या १५ ते २० वर्षापासून आजूनही बेडवर नि:शब्द देवाकडे अखेरचा श्वास मागत आहे. या कुटुंबाकडे कोणी राजकारणी डोकावून पहायला गेला नाही. मग का इतकी उठाठेव. कोणासाठी ?
तुम्हाला आठवतय ना !! अहमदनगर शहरातील "केडगाव दुहेरी हत्याकांड". दोन शिवसैनिकांची निघृण हत्या झाली होती. आज त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले. काय महागात पडली ही मपनाची निवडणुक.!! कोण आणून देईल का ? त्या आईला आपली मुले. कोण आणून देईल त्या मुलांना आपला बाप. त्यामुळे, जनतेने जो कौल दिला आहे. तो, स्विकारा. निकालाच्या वेळी संयम बाळगा. प्रशासनाला सहकार्य करा. हीच खरी लोकशाही आहे.
दुर्दैव असे की, गणेशोत्सव, शिवजयंती, मोहरम, ईद हे आणि असे अनेक सण उत्सव आजकाल पोलीस बंदोबस्तात साजरे करावे लागत आहे. हा खरा लोकशाहीचा अपमान आहे. आणि लोकशाहीचा उत्सव देखील पोलीस बंदोबस्तात साजरा करावा लागत असेल. तर, त्या ईतके दुर्दैव कोणतेच नसेल. त्यामुळे निवडणूक निकाला दरम्यान जशी जबाबदार नागरिक म्हणून मतदान केले. तसे निकालाच्या वेळी देखील शांतता बाळगवी. असे आवाहन लोकशाही समर्थक म्हणून आम्ही करत आहोत.
शांतता पाळावी..!! |
एक गोष्ट मुद्दाम सांगावी वाटते. एकदा अकोल्यात गोळीबार झाला आणि गणेश रमेश देठे (वय १८) हा तरुण त्यात मयत झाला. हे प्रकरण दडपले गेले. मात्र, त्याच्या पश्चात त्याची आई, वडील, चुलता, चुलती, एक मावशी यांनी आयुष्याला पुर्णविराम दिला. त्याचा एक भाऊ त्याच्या डोक्यावर आई बाप आणि भाऊ नावाचे छत राहिले नाही. त्यामुळे, लाखो आणि कोटी रुपये कमविणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या नादाला लागून, सुंदर जिवणाला कलंक लावून घेऊ नका. हीच कळकळीची विनंती आहे.
कायदा व सुव्यवस्था पाळा |
"सुचना"
कोणी विजयी होवो अथवा पराजित. त्यांच्या विजयाची आणि पराजयाची कारणे "रोखठोक सार्वभौम" अगदी ठणकाऊन आपल्या समोर मांडणार आहे.सागर शिंदे
===============
"सार्वभाैम संपादक"
- सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ८५ दिवसात १६६ लेखांचे १० लाख २० हजार वाचक)