आता आशेचे "किरण" नकोत, तालुक्याचे "वैभव" खुलू लागले आहेत. कारण, "विकास" काळजात "घुसला".!!

                    
अकोले (प्रतिनिधी) :-
                 आत्ता कालपरवा तालुक्याचे माजी आमदार वैभव पिचड यांनी आपला "उमेदवारी" अर्ज दाखल केला. आणि खऱ्या अर्थाने मी "पक्षप्रवेश" का केला. याचे प्रमाण देऊन कार्यकर्त्यांना साद घातली. त्यांनी जे काही मांडले. ते नक्कीच अनेकांच्या "मस्तकी" उतरल्याचे दिसू लागले. एकीकडे "निष्ठावंत" म्हणून "बंडखोरी" केल्याचे शल्य आणि दुसरीकडे "रखडलेला विकास". यात "वैभव पिचड" यांची प्रचंड "कोंडी" झालेली पहायला मिळाली आहे. पण, जेव्हा ज्याचे आपण एखाद्या समाज्याचे "प्रतिनिधीत्व" करतो. त्यांची "भूक" भागवीणे हे आपले "अद्य कर्तव्य" आहे. आणि ते जर आपण करू शकलो नाही. तर आपल्याला "पालक" म्हणून घेण्याचा काही एक "अधिकार" नाही. म्हणून "पक्ष सोडला" तरी पवार साहेबांवर "व्यक्तीनिष्ठा" ठेऊन त्यांनी  तालुक्याच्या विकासाचे "पालकत्व" स्विकारले. असे त्यांचे स्पष्ट मत आहे. माझ्या भाजप प्रवेशानंतर तत्काळ राजूर न्यायालय मंजूर झाले, १६८ कोटींचे कोल्हार-घोटी रस्त्याचे काम वाकी पासून सुरु झाले, अशा अनेक अन्य कामांना मंजुरी मिळाली आहे. तर गेली पाच वर्षे डॉ. किरण लहामटे हे झेडपीत सदस्य होते. त्यांनी किती रस्ते, शाळा खोल्या, पाणी प्रश्न, आरोग्य केंद्र उभारुन आदर्श "झेडपी गट" उभा केला ? सत्तेत राहुन जालिंदर वाकचौरे विकास करु शकतात. मग डॉ. लहामटे का नाही.? असा प्रश्न वैभव पिचड यांनी केला. त्यामुळे, आज तालुक्याच्या "वैभवाला" सुरुवात झाली असेल. तर, उद्याचा आशेचा "किरण" काय कामाचा. अशा प्रतिक्रिया जनतेतून उमटू लागल्या आहेत.

आता एवढ्यावर निवडून येणार !!

                  गेली ४० वर्षे काय केलं ? कदाचित याचे उत्तर एक दिवस सगळ्यांना मिळेल. पण, वैभव पिचड यांनी पाच वर्षात काय केलं ? याचे उत्तर त्यांनी सरळ आणि निर्मळ मनाने वारंवार दिले आहे. रस्ते, पाणी, आरोग्य केंद्र, राेजगार, पर्यटन, पुनर्वसन, शिक्षण, न्यायालय, शासकीय इमारती, शेतीप्रश्न, सबस्टेशन या आणि अनेक प्रश्नांना शासन दरबारी मांडण्याचे काम वैभव पिचड यांनी प्रामाणिकपणे केेले आहे. हा दाखला आपण नाही. तर, खुद्द मुख्यमंत्री महोदय यांनी दिला आहे. यातील पर्यटन, रस्ते, सबस्टेशन, न्यायालय व अन्य बाबींना मंजुरी मिळाली आहे. याचा अर्थ म्हणजे, ते विरोधात असताना इतक्या विकासाच्या कामांची मांडणी त्यांनी केली होती. त्याला सरकारकडून पाचर ठोकण्यात आली. म्हणून, केवळ विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी प्रवेश केलाय. हे नाकारता येत नाही.

राष्ट्रवादीत राहुन रस्त्यावरची लढाई करुन झाली. मोर्चे, आंदोलने करूनही जनतेचा प्रश्न सुटला नाही. तर मांडलेले प्रश्न पुर्णत्वास नेण्यासाठी पक्षबदल केल्याने काय बिघडलं ? एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भासले म्हणतात. माझ्या फाईली केराच्या टोपलीत जात होत्या. तर अकोल्याच्या फाईली कोठे जात असतील. याची कल्पना न केलेलीच बरी. त्यामुळे विरोध करून कामे रखडून ठेवण्यापरी, समर्थन करून कामे मंजूर केली. तर बिघडलं काेठे.? पक्ष किंवा व्यक्ती मोठा नसतो. तर, जनतेच्या प्रश्नांचे निराकरण. हाच "लोकशाहीचा कणा" आहे. हे पटवून देण्याचे काम वैभव पिचड यांच्या माध्यमातून होत आहे. पण, "पक्षपात" या प्रश्नाचा "बाऊ" करून ज्यांच्याकडे "विकासाचा अजेंडाच" नाही. तर फक्त "पिचड विरोधक" अशी "आयडेन्टीटी" आहे. त्याने बोंबा ठोकायला सुरुवात केली आहे. हे लोक विसरत आहेत. की, याच वैभव पिचडने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विधानसभेत "सरकार विरोधी बंड" पुकारला होता. इतकेच काय !! त्यामुळे, "निलंबनाच्या कारवाईला" देखील सामोरे जावे लागले होते. तेव्हा नाही कोणी समर्थन केेले. असे मत मांडण्याचा प्रयत्न वैभव पिचड यांच्याकडून झाला.

"कर्जमाफी" करा !!!

          सत्तेत असताना  किती निधी मिळतो. याचे प्रमाण देताना ते म्हणाले. गेल्या पाच वर्षात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून अकोल्यासाठी फक्त १४ कोटी आले. तर हिच रक्कम सत्तेतील शिवाजी कर्डीले यांनी १०६ कोटी आणली. तर, मुख्यमंत्री पेयजल योजनेतून मोनिका राजळे यांनी २०० पेक्षा जास्त कोटी मंजूर करून आणले. तर अकोल्याला फक्त ४८ कोटी मिळाले. असा "पार्टी वीथ डिफरन्स" मांडला. आपल्याकडे पाऊस चांगला होतो. मात्र, पडलेले पाणी डोळ्यादेखत खाली निघून जाते. ते अडविण्यासाठी अजेंडा आहे. मात्र, निधी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मी भाजपात गेलो. यात गैर काय ? गेली अनेक वर्षे मी ग्रामीण रुग्णालयांचा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, हजारदा पाठपुरावा करूनही ते काम मंजूर झाले नाही. येथे १०० कॉटेज असाव्यात, सिटीस्कॅन, एमआरआय, व्हेंटीलेटरची सुविधा असावी. यातून तालुक्याच्या आरोग्याचा प्रश्न सुटावा. असे मनस्वी वाटणे, ही माझी चुक आहे का? असाही प्रश्न त्यांच्या दबक्या स्वरातून बाहेर पडला. जेव्हा  विरोधात होतो. तेव्हा, चने आहे तर दान नाही, आणि दात आहे. तर, चने नाही. असेच अनुभव आले. जसे मुळेकडे "वीज होती, तर पाणी नव्हते, आज पाणी आहे तर वीज नाही". अशी परिस्थिती होती. त्यामुळे दोन "सबस्टेशन" मंजूर करण्यासाठी "आटापिटा" करावा लागला आहे. हे सर्व करत असताना पद नको. पण, सत्तेत असायला हवे. याची प्रकर्षाने जाणिव झाली. हा स्वार्थ नाही. तर, विकास कामे करू शकत नाही. ही खंत होती. म्हणून पक्षबदल केला. त्यात कोठे स्वार्थ होता.
          जेव्हा-जेव्हा अकोल्यातील पाणी पळवून नेण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा तेव्हा. मी स्वत: पहिला आडवा झालो आहे. आढळा धरणातून वेल तोडून पाणी नेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कोठे होेते हे विरोधक.? असा ठोकून सवाल पिचडांनी केला. उद्या सरकार आले तर मुळा परिसरात शिपाई बुडी येथे एक टिएमशी धरण बांधण्याचा मानस आहे. विताक्यातून शेतीला पाणि मिळावे म्हणून महाकाळच्या पुर्वेकडून खिरविऱ्यापर्यंत पाणी आले पाहिजे, तसेच कोंभाळण्यातून खाली उतरावे अशी उपायोजना सुरू आहे. पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी उद्याच्या काळात पश्चिम वाहिन्या पुर्वेकडे वळविण्याचा मानस आहे. या आणि अशा अनेक विकासाच्या अजेंड्याखाली मी भाजपात प्रवेश केला. यात मी जनतेचे हित पाहिले. हीच माझी चुक आहे का ? असा प्रश्न त्यांनी जनतेला विचारला आहे.
         आज विरोधक फक्त सैरभैर होऊन पळत आहेत. कुठलाही अजेंडा नाही. नियोजन नाही, मुद्दे नाही. फक्त पिचड साहेबांना विरोध आणि राष्ट्रवादी सोडली. बरं हे प्रश्न कोण विचारतय ! ज्यांनी कायम पक्षबदल करत करत इथवर मजल मारली आहे. ज्यांनी निव्वळ झेडपी लढवून कट्टर विरोधक म्हणून नाव कमविले आहे. माझे तसे काहीच नाही. मी पहिल्यांदाच पक्ष बदलला आहे. जे पवार साहेबांचा आदर करतात. त्या कार्यकर्त्यांना मी मानतोच. मात्र, मी स्वत: त्यांना श्रद्धास्थान मानतो. आज तिकीटासाठी ज्यांनी बारामती गाठली. त्यांनी तात्विक श्रद्धेचे धडे देऊ नये. कालपर्यंत विरोधात होतो, म्हणून विकास होऊ शकला नाही. पुन्हा तालुक्याला तेच दिवस पहायला नको म्हणून जनतेने विचार केला पाहिजे. मला नुसते आमदार रहायचे असते. तर होतो तेथेच काय गैर होते ? असाच काहीसा रोख त्यांच्या बोलण्याचा होता. वैभव पिचड यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्याकडे जनतेचा कौल झुकलेला दिसला आहे. आजचे "वैभव" हवे की उद्याचे बेभरवशावरील आशेचे "किरण" असा नारा सोशल मीडियात गुंजू लागला आहे. एकंदर या दोन्ही बाजू पाहता तालुक्याच्या निवडणुकीकत रंगत येणार हे निच्छीत झाले आहे. "वेट अॅण्ड वॉच"..!!

 -- सागर शिंदे

===============

             "सार्वभाैम संपादक"
                 

    - सागर शशिकांत शिंदे   

Rajratna.sagar@gmail.com
                  -------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ७० दिवसात १४० लेखांचे ८ लाख वाचक)