पक्षाची "कारवाई" हसत "स्विकारेल", परंतु "अकार्यक्षम" आमदारांना "हात" देणार नाही..!!

                   
अकोले (प्रतिनिधी) :- 
                   अकोले तालुका हा नगर जिल्ह्यात "क्षेत्रफळाच्या द्रुष्टीने सर्वात मोठा" आहे. येथे  इतर तालुक्यांच्या तुलनेत जास्त निधी येतो. झेडपी, बांधकाम, पंचायत समिती, आमदारकी, ग्रामपंचायती अशा अनेक ठिकाणी सत्ता काँग्रेस-राष्ट्रवादीची  होती. पण, पिचड साहेब म्हणाले. विकासकामे होत नाहीत. पण, केवळ सत्तेत नाही. म्हणून जर तुम्ही विकास खुंटला असे म्हणाल. तर, खरोखर हे कारण ज्याला पटले. त्याच्या बुद्धीची किव करावी लागेल. किंवा ज्याने सांगितले त्याच्या. कारण, तुम्ही लक्षात घ्या. शेजारी संगमनेर तालुका पहा. बाळासाहेब थोरात देखील विरोधी पक्षातच होते ना ? बच्चू कडू विरोधातच होेते ना ? ११ वेळा संसद लढविणारे गणपतराव देशमुख विरोधी पक्षातच होते ना. तरी त्यांनी आपल्या मतदारसंघात काय विकास केला. हे साहेबांनी दौरा करु पहावे. मग कळेल विकास म्हणजे काय असतो. विकास-विकास आणि त्यावर आरोप प्रत्यारोप करत-करत तुम्ही "विकास वेडा" केला आहे. हेच वास्तव जनतेने पाहिले आहे. म्हणून आता ही निवडणूक विरोधक आणि "पिचडशाही" अशी नाही. तर जनता आणि "पिचड" अशी झाली आहे. हे जर अजूनही लक्षात आले नसेल. तर, त्याचे उत्तर मिळायला अगदी बोटावर मोजता येतील इतकेच दिवस राहिले आहे.

        अकोले तालुक "दुर्गम" भाग आहे. आजही वाडी वस्तीत लाईट नाही. आहो. धक्कादायक वाटेल. पण, आदिवासी भागात जर महिला डिलेवरीला आली. तर अक्षरश: झोळी करून रस्त्यापर्यंत आणावे लागते. गाडी भेटली तर ठिक. नाहीतर दवाखान्यात पोहचेपर्यंत "रस्त्यात प्रसुती" होऊन बाळाचा आवाज कानावर पडतो. साहेब..! हा आहे का आमचा ४० वर्षाचा विकास ? जीव गेेला तरी पुढील काही वर्षानुवर्षे आदिवासी भागात कोण्या मुलाचे नाव आम्हाला "विकास" ठेऊ वाटणार नाही. इतकी "दहशत" या शब्दाने केली आहे.  तालुक्याची ओळख पुर्वी कळसुबाई होती. आता, खड्ड्यांचा तालुका म्हणून अनेक पर्यटकांनी राज्यभर ओळख निर्माण करुन दिली आहे. यात "मोलाचा वाटा" साहेब तुमचाच आहे. जेव्हा कोणी मुंबईकडून येताना इगतपुरी सोडतो. तेव्हा गाढ साखर झोपेत असला तरी तो जागा होतो. कारण, घोटी नंतर अकोल्याची हद्द लागते आणि गाड्या रस्त्यावर "शराबी" सारख्या "डोलू" लागतात. इकडे संगमनेरहुन निघाले आणि "खडखड" गाडी वाजली की, समजून जायचे. अकोल्याची हद्द सुरु झाली आहे. हाच आमचा विकास आहे का ? जेव्हा साहेब म्हणतात गेली पाच वर्षात आम्ही फक्त ३ किलोमिटर रस्ता करू शकलो. तेव्हा खऱ्या अर्थाने या तालुक्यात "परिवर्तन" झाले पाहिजे. असे प्रकर्षाने वाटते.
          अकोले तालुक्यात पर्यटनाला किती वाव आहे. ज्या छत्रपती शिवरायांनी येथे वास्तव्य केले. त्यांच्या पाऊलखुना आजही रयतेला बळ देतात. त्यांचे संवर्धन झाले पाहिजे. कळसुबाई ही सर्वात उंच आहे. म्हणून नावारुपाला आली, भंडारदरा निसर्गाने फुलून आलाय, म्हणून लोक आकर्षित झाले. जागतील दर्जाची सांदन दरी अकोल्यात आहे. इतिहासाने दखल घेतली. मात्र, आमचे आमदार त्यांचे "संवर्धन" करायला तयार नाहीत. असे जगाला वाटते की, येथे रोजगार निर्माण होऊ शकतो. मात्र, आदिवासी आणि बहुजन समाज शिकला सवरला पाहिजे. असे पिचडांना वाटत असते. तर, त्यांनी इंजिनियरिंग कॉलेज, एलएलबी, एमबीबीएस असे उच्च शिक्षणाची सुविधा अकोल्यात केली नसती का ? पुर्वी यशवंतराव चव्हाणांना शिक्षणाचे महत्व कळले आणि त्यांनी मुक्त विद्यापिठ उभे केले. येथे आम्हीच शिकलो नाही. तर लोकांनी का शिकावं.? आम्ही अकोल्यात डॉक्टर, वकील, इंजिनियर तयार करत नाही. तर, रोज "हुजरेगिरी" करणारे "कार्यकर्ते" तयार करतो. हेच दर्जेदार प्रोडॉक्शन करणारी एमआयडीसी आमच्याकडे आहे.
       आढळा परिसरात पाण्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. वेळ आली तर, ४० रुपयांचे पाणि तेथे विकत घ्यावे लागते. ज्या अकोले तालुक्याला सुजलाम सुफलाम म्हणावं वाटतं. तेथील जनावरे सिन्नर सारख्या ठिकाणी चारा छावन्यांमध्ये न्यावे लागतात. यापेक्षा तालुक्याला अजून किती वाईट दिवस पहायचे आहे.? आमच्याकडे "झिंग्यांना" सदन करायला पाणि आहे. मात्र, शेतकऱ्यांना प्यायला पाणि नाही. म्हणजे मानसे, जनावरे मेली तरी चालतील. पण, "झिंग्या" जगल्या पाहिजे. असा दुरदृष्टीकोण आजवर कोठे आम्ही पाहिला नाही.

ओ..! नो..! धरणातून थेट राजकारणात !

      आज नगरपंचायत जनतेने पिचडांच्या ताब्यात दिली. त्यात अनेक घोटाळे केले. खूप गोष्ट मांडण्यापेक्षा फक्त आरोग्याचा प्रश्न मांडू. तालुक्यात ४ सरकारी रुग्णालये आहेत. त्यात ६० टक्के कर्मचारी भरती रखडलेली आहे. सांगायला इकतके वाईट वाटते की, सरकारी रुग्णालयातून डॉ. खासगी डॉक्टरांची नावे सांगून धंदे करू लागले आहेत. त्यामुळे आज सहज चक्कर मारुन पहा. सगळे दवाखाने फुल आहेत. नगरपालिकेच्या अस्वच्छतेचे हे बळी आहेत. "डेंग्युचे थैमान" सुरू असू ६ ते ७ जणांचे बळी गेले आहेत. याला जबाबदार कोण ? गरिबांकडे उपचाराला  पैसे नाहीत. सरकारी दवाखान्यांत औषधे उपलब्ध नाहीत. रात्री सोडा, भर दिवसा डॉक्टर उपलब्ध होत नाहीत. कधी लोकप्रतिनिधी म्हणून यांनी डोकावून पाहिले  का ? निव्वळ प्रचार आणि अपप्रचार करण्याच्या नादात मतदारांच्या अस्मितेच्या आणि जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे आमदारांना लक्ष द्यायला वेळ नाही. एक राजकारण म्हणून नाही. तर, सेवाभावी किंवा समाजसेवेचा "वसा" म्हणून मी या सर्व प्रश्नांसाठी लढा देत आहे.

काय सही बोलतोय हा !!

             मी शिवसेनेला माझे कुटुंब मनले आहे.  मी पक्षाशी एकनिष्ठ आहे. पण, काहीही झाले तरी चालेल. पण, वैभव पिचड यांना मी साथ देणार नाही. पक्षाचा आदेश जेव्हा कधी येईल. तेव्हा मी उत्तर देईल. एकवेळी पक्षाने कारवाई केली तरी बेहत्तर. पण, पिचडांचा प्रचार करणे. हे माझ्या सदसद विवेकबुद्धाला पटणार नाही. गेली कित्तेक वर्षे शिवसेनेने त्यांच्या विरोधात व्यासपिठ उभे केले आहे. त्यांच्या अकार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. आणि आता त्यांचे त्यांच्या व्यासपिठावर जाऊन कौतुक करायचे. हे मला जमनार नाही. मी तेथे जाऊन हात मिळवायचा. ज्या माझ्या सहकाऱ्यांनी माझ्यावर जीवापाड प्रेम केले. त्यांना सतरंज्या उचलायल लावायच्या. एकवेळी राजकीय सन्यास घेतलेला बरा. पण, ही अवहेलना मी सहन करून घेणार नाही. राहिला प्रश्न साथ कोणाला देणार. तर, आम्ही छत्रपतींना व राघोजी भांगरे यांना साक्षी माणून एकास एक ची शपथ घेतली आहे. मी तत्वाशी कधीच बेईमानी करणार नाही. घानेरडे राजकारण करायचे असते. तर मी अर्ज भरला असता. पण, तत्वहीन रक्त माझ्या अंगात सळसळ करत नाही. तर मी तत्वाने चालणारा तरुण आहे.  म्हणून जे काही करायचे ते सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन करेल. उद्या कोणाला साथ द्यायची की अलिप्त रहायचे. हे स्पष्ट करेलच. पण, कोणत्याही परिस्थितीत अकार्यक्षम आमदार वैभव पिचड यांना मी साथ देणार नाही.

 -- सागर शिंदे (शब्दांकन)

===============

             "सार्वभाैम संपादक"
                 

    - सागर शशिकांत शिंदे   

Rajratna.sagar@gmail.com
                  -------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ७० दिवसात १४० लेखांचे ८ लाख वाचक)