जाऊद्या ना "बाळासाहेब"..!! तो "पोल" नाही "झोल" आहे..!!
विजयी थोरात |
जेव्हा माजी मंत्री बाळासाहेब थोरत यांना चितपट करण्यासाठी ना. विखे यांनी कंबर कसली होती. तेव्हा सगळ्या राजकारण्यांच्या पायाखालची वाळू सरकली होती. कारण, आखाड्यात "समसमान" पैलवान होते. परंतु, संगमनेरची जागा भाजपला मिळू शकली नाही. तेव्हाच थोरातांचा विजय निच्छित झाल्याचे बोलले जात होते. संगमनेरमध्ये मतदारांचा कौल घेतला. तर, बहुतांशी ठिकाणी "घराघरात" फक्त "थोरात" हेच वातावरण दिसून आले. इतकेच काय !! बुथनिहाय आढावा घेतला असता. थोरातांचे पारडे जड भरल्याचे दिसले. असे असताना अचानक इलेक्ट्रनिक मीडियाचे "एक्झिट पोल" थोरातांना पाडून गेले. खरंतर, हे "पोल" पाहुन अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. भल्या-भल्या संपादकांनी यावर अक्षेप नोंदविला. हे "मशिनच्या" फेरफारीत बदल करून "वादळापुर्वीची" निर्मिती करण्याचा डाव तर नाही ना ? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. कर्जत-जामखेड व अकोल्यात ज्या प्रकर्षाने परिवर्तनाची लाट आहे. तितकी संगमनेरात नक्कीच नाही. मात्र, काँग्रेसचे मोक्याचे सिट इलेक्ट्रॉनिकच्या बळावर पाडायचा डाव या माध्यमांनी घातलाय का ? असे शंकास्पद प्रश्न अभ्यासकांकडून उपस्थित केले जाऊ लागले आहे. असे झाले. तर, यानंतरच्या निवडणुकांवर लोकशाहीचा विश्वास राहणार नाही. असे जाणकार मंडळींना वाटू लागले आहे.
जस-जसा मतदानाचा दिवस जवळ-जवळ येत होता. तस तशी जनतेची उत्सुकता वाढतच चालेली होती. आ. थोरात एक लाखाचे लीड घेतील. की, अंतर्गत गटबाजीत, पठार व तळेगाव भागातील पाणी प्रश्नामुळे मतदार त्यांनाच पाणी पाजेल. या आणि अशा अनेक दुर्लक्षित बाबींचा मागोवा घेण्याचा आपण प्रयत्न केला आहे. त्यातून, असे लक्षात येते की, खरंच पाणी प्रश्न विरोधकांना तारू शकते का ? कारण, दुष्काळाच्या झळया राहाता तालुक्यातही जाणवल्या आणि अकोल्यात देखील. तर, दुष्काळाच्या प्रश्नावर महाराष्ट्र देखील होरपळुन निघाला होता. तेव्हा, पाणी प्रश्न हा विरोधकांना किती तारेल. असे कोणाला वाटले नाही. तरी त्याचे उत्तर हे येत्या २४ तारखेलाच निश्चितच कळणार आहे.
संगमनेर तालुक्यातील दुष्काळी भागात आ. थोरातांचे वर्चस्व असलेले पंचायत समिती मार्फत मोफत पाण्याचे टँकर पुरविण्यात आले होते. दुष्काळ असतानाही संगमनेर शहरातील जनतेला पाणी टंचाई जाणवली नाही. याचे कारण म्हणजे, निळवंडे ते संगमनेर थेट पाईपलाईन. संगमनेर तालुक्यातील तळेगाव व पठार भागात उन्हाळ्यात पाणी प्रश्न निर्माण होतो. परंतु, आ .थोरतांनी पाणी पुरवठा यंत्रणेमार्फत दुष्काळात जनतेची व जनावरांची तहान भागवण्याचे काम देखील साहेबांनीच केले आहे. त्यावेळी तालुक्यात कधी सेना व बीजेपी यांचे टँकरच कधीच दिसले नाही. त्यामुळे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा निवडणुकीचा मुद्दा होऊच शकत नाही. जसे बीजेपी सत्तेत असूनही "राम शिंदे" यांच्यासारख्या "जलसंपादन" मंत्र्याच्या तालुक्यात जनता तहानलेली राहिली. तरी त्यांचे दुर्लक्ष होते. शेवटी, तेथे रोहित पवार सारखा मसिहा येऊन जामखेडला बारामतीचे पाणी पाजतो. असे इथे काही झाले नाही. तेथे थोरात पुरून उरल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे जनतेने त्यांना नाकारल्याचे मतदानात दिसले नाही.
२४ तास थांबा..!! |
विजयी भव: |
ज्या-ज्या वेळी थोरातांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधक संपूर्ण शक्तीनिशी करतात. त्या-त्या वेळी आ. थोरातांनी उभे केलेला "सहकाराचा भक्कम किल्ला" न डगमगता आ. थोरतांच्या विजयाचा "शिल्पकार" ठरतो. हे इतिहास सांगतो आहे. हे "सहकाराचे जाळे" उभे करत असताना जणु "रायगडच" डोळ्या समोर ठेऊन उभे केले आहे. या "रायगडावर" कितीही "परकीय आक्रमण" झाले. तरी त्याची "तटबंदीही" कोणी "नस्तनाबुत" करू शकला नाही. त्यामुळे आ.थोरतांचे वर्चस्व या मतदारसंघावर "निर्विवाद" राहिले आहे. लोकसभेची निवडणूक महायुतीने जरी "राष्ट्रीय मुद्यांवर" जिंकली असली. तरी, "सरकार" विरुद्ध "सहकार" असेच चित्र पहावयास मिळाले आहे. यामध्ये "विजय" कोणाचा होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. असे असले तरी संगमनेरची फाईट टफ झाली. तरीदेखील, थोरातांचा पराभव होईल. असे वातावरण निच्छित निर्माण झाले नव्हते.
पोल गेले खड्ड्यात, ते मान्यच नाही..! |
दरम्यान काही इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी दिड ते दोन महिन्यापुर्वी संगमनेरचा "एक्झिट पोल" काढला होता. तेव्हा संगमनेरचे तिकीट देखील निच्छित झालेले नव्हते. इतकेच काय ! ही जागा भाजपच्या अजेंड्यात होती. मात्र, आता अचानक ती जागा बदलली. तरी, "पोल" बदलला नाही. एका पावसे नामक मुलाने जेव्हा इलेक्ट्रॉनिक माध्यमांना खसकाविले. तेव्हा त्यांनी थोराेतांना पुन्हा विजयी असल्याचे दाखविले. त्यामुळे, मैदानावर जे चित्र आहे. ते वास्तव न दाखविता उताविळ होऊन मतदान होते कोठे. नाहीतर, २८८ मतदारसंघाचे "एक्झिट पोल" काही तासात समोर येतात. ते ही त्याला कोणताही आधार नसताना. त्यामुळे, माध्यमांवरील विश्वास कमी होईल. असेही खडेबोल त्या मतदाराने सुनावले. त्यानंतर की काय !! "एक्झिट पोल"मध्ये थोरात पुन्हा निवडून आले. इतकेच काय सेना भाजपच्या जागा वाटप झालेल्या नसताना जो सर्वे केला. आणि तो वारंवार दाखविला जातो आहे. हे कितपत योग्य आहे. ? हे सर्व पोल "बिना लायटीचे" असून "फेज उडालेले" आहेत. हे उद्या (दि.२४) दिसणारच आहे. फक्त काही तास वेट अॅण्ड वॉच...!!
- सुशांत पावसे
- सागर शिंदे
===============
"सार्वभाैम संपादक"
- सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ८५ दिवसात १६६ लेखांचे १० लाख २६ हजार वाचक)