संगमनेरची उमेदवारी म्हणजे, खोदा "पहाड" निकला "चुहा" बीजेपीला "डिच्चू"..!
आता बोलाना !! |
आपली माघार !! |
नगर जिल्ह्यात १२ विधानसभांपैकी ८ जागांवर भाजपचे उमेदवार उभे आहेत. असे म्हटले जात होते की, नगर जिल्ह्यात जे काही करायचे ते ना. विखे पाटील करतील ती पुर्वदिशा राहिल. मात्र, या ठिकाणी फारसा काही बदल झालेला दिसून येते नाही. श्रीरामपूर आणि संगमनेर या जागांचा बोलबाला असताना, दोन्ही ठिकाणी "लोणीच्या वाड्याची" हुकूमत चाललेली दिसून आली नाही. विशेषत: आता फक्त जे काही करायचे ते फक्त श्रीरामपूर मतदारसंघात होईल. संगमनेरमध्ये कोणताच पॅटर्न चालणार नाही. अशी चर्चा रंगली आहे. कारण, अकोल्यात जसे राष्ट्रवादीने जनतेच्या मनातील उमेदवार किरण लहामटे यांना दिले. तसा उमेदवार संगमनेरचा नाही. कारण, अनेक कट्टर शिवसैनिक बाळासाहेब थोरात यांना शह देऊ शकले असते. अशी नावे चर्चेत होती. मात्र, मातोश्रीने अनेकांच्या मंडवळ्या सोडून खुंटीला टांगल्याचे पहायला मिळाले. नवले यांनी यापुर्वी जनता दलाकडून उमेदवारी केली होती. तर, त्यात त्यांना अपयश आले होते. तर त्यांनी जेव्हा अॅग्रीचे कॉलेज काढले. तेव्हा बाळासाहेब थोरात हे राज्यात "क्रुषीमंत्री" होेते. आता हे गणित अधिक स्पष्ट सांगण्याची गरज काय ?, याहुन महत्वाचे म्हणजे, मातोश्रीचे "वारस" आदित्य ठाकरे आता वरळीतून निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे नशीब माना. की, ती जागा आघाडीत राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली आहे. अन्यथा काँग्रेसच्या अधिकार कक्षेत असती तर !! खा. संजय राऊत म्हणाल्या प्रमाणे आदित्ययान सुखरुप विधानभवनात बिनविरोध अलगद पोहचले असते आणि एक नवा विक्रम घडला असता. त्यामुळे, मजेदार किस्सा म्हणजे ही जागा काँग्रेसकडे असती तर, कदाचित संगमनेरात अज्ञात चेहरा उभा राहुन लाखभराचे लिडने थाेरातांनी गुलाल उधळला असता. असे झाले असते तर, यात नवल वाटण्यासारखे काही नसते. कारण, बारामती पोटनिवडणुकीत शिवसेनेने सुप्रिय सुळे यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता. हे "साटंलोटं" विसरुन कसे चालेल.!!
शिवसेना उमेदवार |
आपली पण माधार !! |
दुसरी महत्वाची बाब म्हणजे, अकोल्यातील शिवसेनेची जागा भाजपला घेण्यासाठी ना. विखे पाटलांनी मोठी महत्वाची भुमिका बजावली आहे. त्यामुळे अकोले बदल्यात संगमेरला नमते माप द्यावे लागल्याचे बोलले जाते. नाहीतर जिद्दीला पेटलेले विखे साहेब. राज्याचे राजकारण उलथे-पालथे करू शकतात. याचे प्रमाण द्यायची गरज मला तरी वाटत नाही. मात्र, या सगळ्यात त्यांनी संगमनेरकडे दुर्लक्ष केले असे म्हणणे चुकीचे ठरेल. त्यामुळे, अजून थोडे दिवस फक्त वेट अॅण्ड वॉच....!!
-- सागर शिंदे
===============
"सार्वभाैम संपादक"
- सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ७६ दिवसात १३४ लेखांचे ७ लाख ५० हजार वाचक)