|
विनयशिल व्यक्तीमत्व
|
अकोले (प्रतिनिधी) :-
सन १९८० सालापासून पिचडघराने निवडून येत राहिले. मात्र, त्यांना जनतेचा कौल कधी मिळाला नाही. उलट, त्यांना मिळालेल्या एकूण मतांपेक्षा विरोधकांना मिळालेली मते. अती वरचड होती. त्यामुळे तालुक्याची निवडणूक "वन वे" झाली असे कधीच झाले नाही. हे सर्व विरोधक एका छताखाली आणण्यासाठी गेल्या २ वर्षापासून आम्ही प्रयत्न करीत होतो. तेव्हा "दसरा" मेळाव्याच्या दिवशी सर्व पिचड विरोधकांनी "बेल भंडार" हाती घेऊन "एकास एक उमेदवार" ही "शपथ" घेतली. हे सुत्र "डेव्हलप" करण्याचे काम फक्त आम्ही केले. बाकी, ही जनतेची इच्छा आहे. यात काही एक शंका नाही. त्यानंतर देवगावला राघोजी भांगरे व अकोले बाजार तळावर याच निर्णयावर "मोहर" लावली गेली. अन् खरे पाहता आम्हाला ९९ टक्के यश आले.
|
दोनच उमेदवार दिले, तरच...!!
|
दरम्यानच्या काळात उमेदवारी कोणाला द्यायची. याहुन मोठी रस्सीखेच सुरु होती. तेव्हा आम्ही सर्व शरद पवार साहेबांकडे गेलो होतो. ते म्हणाले, "एकास एक" उमेदवार असेल. तर, मी तुमच्या पाठीशी ऊभा आहे. तुम्ही कामाला लागा. जनभावनेचा कानोसा घेऊन आम्ही योग्य वेळी निर्णय घेऊ. असा शब्द मिळाला. त्यानंतर कौतुकाची गोष्ट अशी की,
हे आव्हान अशोक भांगरे यांनी स्विकारले आणि पहिला पुढाकार त्यांनी घेतला. ४० वर्षे त्यांनी पिचडांना झुंज दिली. पण, हार मानली नाही. येथे विरोधी वातावरण कायम ठेवण्यात ते यशस्वी राहिले. जेव्हा बारामतीहुन डॉ. लहामटे यांच्या नावाची घोषणा झाली. तेव्हा अगदी उदात्त हेतूने भांगरे म्हणाले. डॉ. उच्च सुशिक्षित उमेदवार आहे. जनतेचा कौल आहे. त्यामुळे लहामटे म्हणजेच भांगरे. असे म्हणून त्यांनी पहिल्यांदाच निवडणुकीतून माघार घेतली आणि दंड थोपटून स्वत: उमेदवार असल्यासारखे प्रचारार्थ सज्ज झाले. त्यांच्या या समर्पनामुळे त्यांच्यावर खोटारडे आरोप करणाऱ्यांची मुस्कटदाबी झाली. आज एक "दिपस्तंभ" म्हणून ते निवडणुकीची वाट निर्वित आहेत व आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन धेय्याचे अंतर काटित आहोत.
यांच्यासह सतिश भांगरे, मारुती मेंगाळ, सौ. सुनिता भांगरे व डॉ. अजित नवले यांचे अत्यंत मोलाचे योगदान आहे. एकंदरीत या सर्वांना राजकीय व सामाजिक शहानपण आले व त्यांनी बंड पुकारला नाही हेच अती महत्वाचे आहे. यांच्या व्यतिरिक्त एक सुप्त लाट सुरू आहे. जी डॉ. लहामटे यांना सपोर्ट करते. मात्र, उघडपणे बोलू शकत नाही. त्यांच्या गुप्त मतांचा फटका पिचडांना पडणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. यात शंका नाही.
|
..तर हेच विजयाचे शिल्पकार !!
|
एक गोष्ट प्रकर्षाने नमुद करावीशी वाटते. की, निवडणुकांचा हा सुवर्णकाळ असतो. येथे भले भले लाचार होतात. मीडिया आज आमच्या सोबत तर उद्या पॅकेज वाढल्यानंतर त्यांच्यासोबत जाईल. पण, जनता त्यांच्या मतावर ठाम राहिल. आज जे पुढारी पिचडांच्या व्यासपिठावर दिसत आहेत. ते गुण्यागोविंदाने बसले आहेत. असे जर कुणाला वाटत असेल. तर, तो गोड गैरसमज त्यांनी काढून टाकावा. कारण, ज्या शिवसैनिकांनी उभे आयुष्य ज्यांना विरोध केला. त्यांच्या चटाया उचलनं येथील भगवा करणार नाही. ज्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्वासाहुन प्रिय आहेत. ते पिचडांना स्विकारणार नाहीत. ज्यांनी जातीय पक्षाला साथ दिली. त्यांना अकोल्याचा "शिवसैनिक" व "भिमसैनिक" कसा स्विकारेल. हे उघड-उघड गणित आहे. तो समुदाय वैचारिक आहे. त्यांना आरएसएसचे विचार पचणी पडणार नाही. त्यामुळे ते नक्कीच डॉक्टरांना पदरात घेतली. असे तरी वातावरण आहे. त्यामुळे तालुक्यात "कमळाबाई" फुलणार नाही. हेच वास्तव आहे.
खरंतर एक विशेष बाब वाटते. कालपर्यंत जे स्वत:ला कॉम्रेड म्हणत होते. पुरोगामी आणि डाव्या चळवळीचा वसा सांगत होते. तेच भाजपचा जातीयवाद अभिमानाने फुलविताना दिसत आहे. म्हणजे, झाले असे की, कालचा "भजनी" आज "तमाशात रंगबाजी" करताना दिसू लागला आहे. पण, ज्यांनी पुरोगामी झेंडे मिरविले. ते जनतेच्या डोळ्यात डोळे घालताना शरमेने मान खाली घालताना दिसत आहे. अर्थात नाईलाज आहे. संस्था चालवायच्या असतात. उभे केलेले साम्राज्य टिकवून ठेवायचे असते. त्यासाठी ही धडपड सुरू आहे. त्यामुळे, त्यांच्या तोंडात आज जरी भाजपचे शब्द असले. तर, मनात भाजपचा विचार उगवेल अशी सुपिकता सद्यातरी वाटत नाही.
|
निवडणुकीत ! वढ ५ ची !!
|
गेली वर्षेभर तालुक्यातील सुजान नागरिक एकास एक उमेदवारीचा नारा देत होते. तसे झाले, तरच परिवर्तन होईल. हे साध्य करण्यासाठी आम्ही जीेवाचे रान केले. आता आमची जबाबदारी संपली आहे. जो काही निर्णय घ्यायचा. तो जनतेला सुत्र हातात घेऊन घ्यायचा आहे. कारण, "आता नाही. तर, परत कधीच नाही" उद्या निवडणुकीच्या अंतीम टप्प्यात दारु व पैशांची उधळण होऊ शकते. मात्र, ज्या डॉ. बाबासाहेबांनी तुम्हाला जो मताचा अधिकार दिला आहे ना.! तो तेला-मिठाच्या किमताचा नाही. ही लोकशाही उभी करण्याचा अधिकार एका मतातून प्रदान केला आहे. आता तो विकायचा की सत्कर्मी लावायचा. हे तुमच्या मनावर आहे.
धन्यवाद
-- विनय सावंत
(रा.सेवादल, छात्रभारती)
-- सागर शिंदे
===============
"सार्वभाैम संपादक"
- सागर शशिकांत शिंदे
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ७६ दिवसात १५५ लेखांचे ८ लाख ४० हजार वाचक)