"उद्धव ठाकरे साहेब "आता आम्हाला माफ करा"..!! अकोल्यात "शिवसेना फुटली", मेंगाळ व दराडेंचा बंड..!

शिवसेनेतून बंड
अकोले (प्रतिनिधी) :- 
                अकोले तालुक्यात शिवसेनेत उभी फुट पडल्याचे पहायला मिळाले आहे. याचा खुप मोठा तोटा पिचडांना होणार आहे. पंचायत समितीचे उपसभापती मारुती मेंगाळ व शिवसेनेचे बाजीराव दराडे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी बंड पुकारला आहे. एकीकडे उद्धव ठाकरे संगमनेरमध्ये बोलतना म्हणाले की, अकोल्याची जागा शिवसेनेने सोडावी हा माझा निर्णय आहे. तो मी आपल्या भल्यासाठी घेतला आहे. त्याला प्रतिउत्तर देताना दराडे व मेंगाळ गटाने खद्द शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची माफी मागितली  आहे. आता आम्हाला पिचड नको. डॉ. लहामटे हवा आहे. कालपर्यंत तुम्हीच पिचडांना विरोध करीत होते. आज त्यांचे समर्थन करायला लावू पहात आहे. हे कोठेतरी कट्टर शिवसैनिकांना बोचत आहे. त्यामुळे नाही चा पाडा काही शिवसैनिकांनी पाठ केला आहे. आज ११ आॅक्टोंबर रोजी मेंगाळ व दराडे यांनी पत्रकार परिषद घेऊन डॉ. लहामटे यांना मदत करण्याची भुमिका घेतली आहे.

                 बाजीराव दराडे म्हणाले की, आम्ही पेचात पडलेलो असताना. जनतेशी बोलून आज आम्ही डॉ. लहामटेंना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. गेली अनेक वर्षे पिचडांना आपण विरोध केला. काल ठाकरे साहेब आमची माफी मागत होते. आता आम्ही साहेबांची माफी मागतो. जे पिचडांबरोबर गेेले. ते ३५ वर्षे त्यांच्यासोबतच होते हे जनतेला माहित आहे. जे गेले ते शिवसैनिक नाही. जे आज येथे उपस्थित आहे. ते खरे शिवसैनिक आहे. १९ तारखेपर्यंत सगळे शिवसैनिक पुन्हा डॉ. लहामटे यांच्याकडे येतील. आजच जनतेने लहामटेंना आमदार केले आहे. पिचडांची दहशत, दादागिरी बंद करायची आहे. म्हणून किरण लहामटेंचा प्रचार करणार आहे. बिताका संदर्भात पिचडांनी फक्त राजकीय वेळकाढूपणा केला. लोकांना वाटले आता बिकाक्याचे पाणि येईल. मात्र, त्या पाण्यावर पिचडांनी निवडणूक काढली. नंतर फसवणूक सोडून काहीच हाती आले नाही. आता नविनच खुळ काढलय की कोंभाळण्यातून पाणी खाली आणू. ही केवळ दिशाभूल आहे.
    मारुती मेंगाळ म्हणाले, आम्ही पिचडांच्या विरोधीत निवडून आलो आहोत. वेळ आली तर उपसभापती पदावर पाणी फेरायची वेळ आली तरी बेहत्तर, मी त्यालाही तयार आहे. जनतेची भावना माझ्यासाठी महत्वाची आहे. एकास एक शपथ घेतली ती सार्थ ठरविणार आहे. गेली ४० वर्षे ठाकर समाज्याचा वापर केला गेला.

जाधव म्हणाले, गेली ३० वर्षे मी शिवसैनिक म्हणून काम केले. परंतु  आजवर आम्हाला कधीच विश्वासात घेतले नाही. गेली ४० वर्षे पिचड घराण्याचे तालुक्यावर वर्चस्व गाजविले आहे. या दरम्यान जे प्रलंबित प्रश्न होते. ते आजही जैसे थे आहे. म्हणून शिवसैनिकांनी कडवा विरोध केला. आणि मत विभाजनाचा फायदा घेऊन सत्ता प्रस्तापित केली. ४० वर्षे विकास खुंटल्यामुळे या परिवर्तनाच्या लाटेत सहभागी होणार आहे. प्रवाहात गेले तरी शिवसेना कमकुवत होणार आहे आणि विरोधात गेले तरी कमकुवत होणार आहे. त्यामुळे पक्षात राहुनच पिचडांना विरोध करून अस्तित्व टिकवणार आहे.
 नंदकुमार वाकचौरे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांची माफी मागितली, आता आम्ही उद्धव ठाकरे यांची माफी मागतो. तुम्ही तुमची इच्छापुर्ती करायला अकोल्याची जागा सोडली. आता आम्ही आमची इच्छापुर्ती करण्यासाठी डॉ. लहामटे यांना साथ देणार आहे. आम्ही घड्याळाला मदत करत नाही. तर पिचडांचे विरोधक आहेत. म्हणून लहामटेंना मदत करत आहोत. हे लक्षात घ्यावे. मच्छिंद्र बर्वे म्हणाले, तालुक्यात रोजगार, शिक्षण, पर्यटन, आरोग्य असे अनेक प्रश्न प्रलंबित ठेवले आहे. दुर्गम भागात आजही माझी भगिनी उपचारावाचून वंचित आहे. ४० वर्षे सत्ता उपभोगली.

यावेळी, भानुदास तिकांडे, लालुशेठ दळवी, अॅड. संभाजी जाधव, बाजीराव दराडे, मारुती मेंगाळ, बाळासाहेब मालुंजकर,  भाऊसाहेब सहाने, सुरेश खांडगे सर, गावंडे वसंत, सुरेश पथवे, तुकाराम मेंगाळ, संजय फोडसे, मधुकर मेंगाळ आदी उपस्थित होते.

  -- सागर शिंदे