आमदारांची "स्टंटबाजी" ठरतेय "बाधक"..! "माजी" आमदारांना अश्लिल "शिवीगाळ" ! यासाठीच "परिवर्तन" हवे होते का ?

"माजी" चूक कळली "आजी"

 अकोले (प्रतिनिधी) :- 
                      तालुक्याचे "राजकारण" खरोखर इतक्या "खालच्या पातळीवर" जाईल असे सामान्य जनतेला अगदी कधीच वाटले नव्हते. कारण, "परिवर्तन" नक्कीच हवे होते. पण, विजयाचा "उन्माद" आणि शब्दांचा "विपर्यास" इतक्या "निच पातळीला" जाईल. याची जनतेला जरा देखील "कल्पना" नव्हती. कारण, एक "आमदार साहेब" अधिकाऱ्यांना फोन करुन "धारेवर" धरतात काय ! आणि त्या "क्लिपा व्हायरल" होतात काय !! त्यावर "प्रक्षोभीत" होऊन त्यांचे कार्यकर्ते माजी आमदार वैभव पिचड यांच्याविषयी अगदी "अश्लिल" बोलून ते "व्हायरल" करतात काय..!! कोठे चालला हा पुरोगामी आणि डाव्या चळवळीचा तालुका. ? अशोकराव भांगरे यांनी १९८० ते २०१९ पर्यंत पिचडांच्या विरोधात "काट्याची टक्कर" दिली. पण, या ४० वर्षाच्या "प्रदिर्घ काळात" सोशल मीडियावर आया बहिनींची आब्रु किंवा गुप्तांगाचा साधा कोठे उल्लेख होऊन तो कधीच चव्हाट्यावर आली नाही. इतकेच काय.! हे वास्तव तुम्हाला पटणार नाही. पण, या दोघांच्या "एव्हाना" मधुकर तळपाडे यांच्या देखील "लढतीला" कधी "आदिवासी" आणि "मराठा" असे रुप आले नव्हते. तितके आज आल्याचे दिसू लागले आहे. असे, जाणकारांना वाटते. हे सर्व "आजी-माजी" युद्ध निवडणुकीनंतर संपेल असे वाटत होते. मात्र, ते अधिकच "प्रगल्भ व उग्र" होत चालताना जनतेला दिसू लागले आहे. अर्थात, पोलीस प्रशासनाने याची वेळीच दखल घेणे गरजेचे आहे. अन्यथा उद्या "कायदा" व "सुव्यवस्थेचा" प्रश्न निर्माण होऊन तालुक्यात जातीय दंगली पेटू शकतात. असे विचारवंतांना मत व्यक्त केले आहे.

अपप्रचार...!!

               ती पोष्ट अजूनही सगळ्यांना आठवते आहे. निवडणूक "ड्युटीवर" असणारा कोल्हापुरला नियुक्त एका "सरकारी" कर्मचाऱ्याने "पोष्टल मतदान" केले. ते "गुपित" करणे "अनिवार्य" असताना. त्या "महाशयांनी" त्याचा "स्क्रिनशॉट" काढून आमदार किरण लहामटे साहेबांना टाकला. त्यानंतर मतदानापुर्वीच ती पोष्ट प्रचंड व्हायरल कशी झाली कोणास ठाऊक. तरी, याची प्रशासनाने नोंद का घेतली नाही. हा एक आश्चर्याचा प्रश्न अनेकांना भेडसावला आहे. त्या सोशल मीडियाच्या "कॅम्पेनिंगचा" वैभव पिचड यंत्रणेने अगदी कोणताच "अक्षेप" नोंदविला नाही. अर्थात ही "संधीसाधू यंत्रणा" निष्ठावंत कसली आली ? "निष्ठावंत" म्हणजे जेव्हा शरद पवार साहेबांना "नोटीस" येते आणि सबंध जनता रस्त्यावर उतरते. त्याला म्हणतात "निष्ठावंत". 

       याऊलट, येथे पिचड साहेबांना अगदी नको-नको तशा शिव्य, ते ही भाजपच्या सोशल मीडिया गृपवर.!! छे..! बघ्याच्या भुमिकेला देखील "हद्द" असते. तेव्हा खरे माध्यमांना प्रश्न पडतो. पिचड साहेब..! तुम्ही "गर्दी" खूप जमा केली. पण, "दर्दी" मानसे अगदी "बोटावर मोजता येईल". इतके देखील जमा करू शकले नाही का ? असा प्रश्न पडतो.  कार्यकर्ते उत्तर देतात, भाऊ म्हणाले शातंतच बसा..!! यांना कळत कसे नाही. लोकशाही आणि सनदशिर मार्गाने  तुम्ही निषेध का करू शकत नाहीत. भाऊ यांना तोंडाने सांगतील का ? कायदेशीर मोर्चे आंदोलने काढा..!! अर्थात, ३५ वर्षे सत्तेत राहिल्याने भाऊंनी कार्यकर्ते कधी एसीच्या बाहेर काढलेच नाही. त्यामुळे बड्या घरचे नेते, रस्त्यावर येतील तरी कसे.!! भाऊंनी सुटबूट घालून टिचीत रहायला शिकवलय. मग.! झेंड हातात धरील तरी कोण ? मग भाऊंचे बॅनर फोडो नाहीतर, चिखल फेको.   फक्त देखते रहो..!  हे असेच राहिले. तर, पुढचा आमदार नक्कीच भांगरे कुटुंबातील असेल. यात शंकाच नाही. असे अभ्यासकांना वाटते. अर्थात हाच शिवीगाळीचा प्रकार कधी रामदास आठवले यांच्याबाबत झाला असता. तर, आजा कार्यकर्ते रस्त्यावर असते. पण, तुमच्या तिजोऱ्या खाली केल्या आणि तुमचे "तोतया निष्ठावंत"  दिवाळीत "मशगुल" झाल्याचे बोलले जात आहे. पण, येणाऱ्या काळात रस्त्यावरच्या "संघर्षाशिवाय" पर्याय नाही. हेच सत्य आहे.

वाटचाल "परिवर्तनाकडे".! 

               वास्तव पाहता, "नवनिर्वाचीत" आमदार साहेबांनी टोल अंतर्गत महामार्गावर खड्डे बुजवून "स्टंटबाजी" केली. असे माध्यमांना प्रसिद्ध झाले. दुसरीकडे कोंभाळने रस्त्याहुन अधिकाऱ्यांना आता किरण लहामटे आहेत. लक्षात ठेवा..!! या शब्दात "खडेबोल" सुनावले. ते देखील व्हायरल झाले. अधिकारी महोदय "जी सर, जी सर" सोडून बोलणार तरी काय..! पण, कोणताही रस्ता करण्यासाठी प्रपोजल टाकावे लागते, त्याला मंजूरी मिळवावी लागते, कामाच्या तुलनेत निधीसाठी खटाटोप करावा लागतो. वारंवार मंत्रालयात खेटा घालाव्या लागतात. अधिकाऱ्यांपेक्षा आमदार महोदयांची भुमिका यात महत्वाची असते. पण, फोन लावला आणि रस्ता झाला. असे होत असते. तर, "शेतात जायला" देखील "डांबरीकरण" झाले असते. ज्या संदर्भात आमदारांनी "पीडब्ल्युडी" अधिकाऱ्यांना फोन केला होता. ते चार आठ दिवसात रस्ता करतो म्हणाले. आता दोन दिवस उलटून गेले.  रस्ता खरोखर होणार आहे का ? छे..! ही निव्वळ जनतेची दिशाभूल आहे. तु मारल्यासारखं कर मी रडल्यासारखे करेल. जनता आहेच. उदोउदो करायला. हेच तर लोकशाहीचे दुर्दैव आहे. असे मत अभ्यासकांनी सार्वभौमशी बोलताना व्यक्त केले.

राष्ट्ररवादी पुन्हा...?????

        चला जनता जनार्दन आहे. शेवटी जोवर डॉ. अजित नवलेंसारखे कट्टर लोकशाही समर्थक व प्रस्तापितांचे विरोधक आहेत. तोवर विश्वास आहे. की, परिवर्तन होऊ शकते. कारण, आता सत्कार, मिरवणुका बंद करा. असे ठणकाऊन सांगण्याची धाडस त्यांनी केली. याच "मार्क्सवादाला" आम्ही "लाल सलाम" करतो. बाकी सगळ्या राष्ट्रवादी नेत्यांची गत "गुतली गाय" अन "फटके खाय" अशीच काहीशी झाल्याचे बोलले जात आहे.

रोखठोक सार्ववभौमच्या माध्यमातून शरद पवार साहेबांना एका मतदाराचा खरमरीत सवाल..! साहेब..! तुमच्याकडे पाहुन मत दिल्याने चूक का वाटायला लागली आहे..!?

- सागर शिंदे 

==================

                   "सार्वभाैम संपादक"
                 
                    सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
                  -------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ९२ दिवसात १७७ लेखांचे ११ लाख ५० हजार वाचक)