"पैशाच्या" वादातून "मित्रांनीच" केला "मित्राचा" खून, गुन्हा दाखल; "दोघे ताब्यत" !!
आई ती आई असते..!! |
पैशाच्या देवाण-घेवाणीहुन तीन मित्रांमध्ये तात्विक वाद झाले होते. यात प्रथमेश एकनाथ भोसले (वय १८ रा. पिपळगाव निपाणी, हल्ली नवलेवाडी) या तरुणाची निघृण हत्या झाल्याची घटना सोमवारी (दि २८) सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास गर्दनी शिवारातील चिमनदरा परिसरात घडली. या तिघांच्या व्यवहारात प्रथमेशची दगडाने ठेचून हत्या झाल्याने अकोले तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. हा खून त्याचेच मित्र गोर्डे व देशमुख यांनी केल्याचे समोर येत असून. पोलिसांनी दोघांना संशयीत म्हणून ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात ३०२ कलमान्वे खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रथमेश भोसले |
प्रथमेशने नांदेड येथे "सीईटिचे क्लास लावलेले होते. परंतु, दिवाळीच्या सनासाठी तो नवलेवाडी येथे आला होता. त्याचे वडील एकनाथ भोसले हे एकदरी परिसरात आदिवासी शाळेवर शिक्षक आहेत. प्रथमेश घरी आल्यानंतर त्याचे मित्र अकोल्यात भेटले. त्यांचे यापुर्वी किरकोळ आर्थिक व्यावहार होते. त्यामुळे पहिल्याच भेटीत त्यांच्यात तु-तू, मै-मै झाली. हा वाद टोकाला गेला. दरम्यान फिरण्याचा बहाणा करून ते गर्दणी परिसरात गेले होते. त्यांचे काही वैयक्तीक कामे पुर्ण झाल्यानंतर तेथे देखील तिघांमध्ये वाद झाले. प्रथमेशने त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे दोघे समजून घेण्याच्या पलिकडे होते. परिणामी या दोघांनी सगनमताने प्रथमेशच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. प्रथमेश हा एका पायाने अधू होता. त्यामुळे, त्याला प्रतिकार करणे शक्य झाले नाही. त्यामुळेच तो मृत्युला शरण गेला.दरम्यान हा प्रकार रानात जनावरे चारणाऱ्या व्यक्तीने पाहिल्याचे बोलले जाते. ही माहिती स्थानिक पाटलास समजल्यानंतर, अभंग यांच्या प्राथमिक खबरीनुसार पोलीस निरीक्षक आरविंद जोंधळे यांनी या घटनेची दखल घेत घटनास्थळी धाव घेतली. कार्यक्षम पोलीस उपनिरीक्षक दिपक ढोमने यांनी तपासाला गती देत घटनेचा पंचनामा केला. काही तांत्रीक गोष्टींचा सखोल तपास करून दोघांची नावे निष्पन्न केली. अवघ्या काही तासात या तपासाची उकल करण्यास अकोले पोलिसांना यश आले आहे. दोघा संशयीतांना ताब्यात घेताच तालुक्यात एकच खळबळ उडाली. त्यांनी गुन्ह्याबाबत माहिती देण्यास टाळाटाळ केली. मात्र, पोलिसांचा खाक्या अंगावर पडताच दोघे पोपटासारखे बोलू लागले. त्यामुळे, हा प्रकार समोर आला आहे.
माझ्या लेकराला न्याय हवा आहे..! |
या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक ढोमने करीत आहे.
- सागर शिंदे
==================
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ९० दिवसात १७५ लेखांचे ११ लाख वाचक)