विखे, शिंदे, कर्डीले,कोल्हे, मुरकुटे,पाचपुते राजळे पिचड हा ८/१२ चा फॉर्म्युला आघाडीचा ७/१२ काढणार का ?
अहमदनगर (प्रतिनिधी) :-
ज्या भाजपने अनेकांच्या भ्रष्टाचाराचा ७/१२ काढून विरोधकांची पळता भुई थोडी केली. त्या "ईडी ने जनता येडी" करुन ठेवली. पण जे पळाले, त्यांची धाव कुठपर्यंत गेली ! तर ती फक्त कमळाच्या देठापर्यंत. त्यामुळे "शरण आला, त्याला मरण नाही", या उक्तीप्रमाणे सगळ्यांनी भाजपात प्रवेश केला. असे बोलले जाते. त्यामुळे राज्यभर बंडखोरीचा बोलबाला झाला आणि महायुती पुन्हा सत्ता स्थापन करेल. असे चित्र निर्माण झाले. मात्र, या सर्व पडझडीचे जनक नगर जिल्ह्यातून विखे घराण्याला म्हणावे लागेल. कारण, एक बालहट्ट पुरविला असता. तर दोन्ही काँग्रेस आज शाबुत असत्या. त्यामुळे आता नगरकडे सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. यावेळी १२ पैकी ८ जागा भाजपला मिळाल्या असून हा ८/१२ कोणाचा ७/१२ बाहेर काढतो. की ज्या भाजपने इतरांचे पितळ उघडे केले. त्यांचाच ७/१२ आघाडी बाहेर काढते, की, ना. विखे यांनी १२-० चा अजेंडा तयार केला होता. तो कितपत यशस्वी होतो. हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

"महायुती" होते की नाही. याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. तो प्रश्न दोन दिवसांपुर्वी मिटला. उरला सुरला जागा वाटपाचा प्रश्न, त्यावरही हल निघाले. आता अंतीम टप्पा होता ते म्हणजे उमेदवारीचा. त्यावर शिक्कामुर्तब झाला आहे. नगर जिल्ह्यात भाजपा कडून उमेदवार आठ उमेदवार घोषीत करण्यात आले आहेत. त्यात, कर्जत जामखेड - राम शिंदे , राहुरी - शिवाजी कर्डिले , अकोले - वैभव पिचड , शिर्डी - राधाकृष्ण विखेपाटील , कोपरगाव - स्नेहलता कोल्हे , नेवासा - बालासाहेब मुरकुटे , श्रीगोंदा -बबनराव पाचपुते ,शेवगाव - मोनिका राजळे यांची वर्णी लागली आहे. तर नगर शहरातून अनिल राठोड, पारनेरमधून विजय औटी, श्रीरामपूर भाऊसाहेब कांबळे व संगमनेरचा उमेदवार गुलदस्त्यात आहे. भाजपचे ८ तर शिवसेनेचे ४ असे १२ उमेदवार आघाडीसमोर उभे ठाकले आहे.नगरचा पालकमंत्री राम शिंदे यांना सर्वात मोठे चैलेन्ज रोहित पवारचे असणार आहे. त्यांच्याकडे मोठा जनाधार असून, शिंदे यांच्यावर जनता नाराज असल्याचे बोलले जात आहे. तर रोहितमुळे पवार घराण्याची प्रतिष्ठा म्हणून थेट बारामतीचे लक्ष जामखेडवर असणार आहे. तर पुढे बबनराव पाचपुते यांच्यावर झालेले आरोप, खुद्द पवार साहेबांचे लक्ष आणि राहुल जगताप हे उमदे नेत्रुत्व असून त्यांच्याकडे लोकांचा जनाधार वाढता आहे. राहुरी-नगर तालुक्याचा विचार करता. खासदारकीला कर्डीले यांनी जावयास मदत केल्याचे आरोप झाले. तर त्यांना उमेदवारी मिळू नये. यासाठी नगरला विरोधकांनी पत्रकार परिषद घेऊन विरोध दर्शविला. अशा अनेक कारणास्तव त्यांचे नाव डावलले जाईल अशी शंका होती. त्याबाबत सोशल मीडियावर वावड्या उठविल्या जात होत्या. परंतु, प्रचंड विरोधात प्रवाहात टिकून राहणार नाहीत. ते कर्डीले कसले. त्यांना तिकीट दिले की त्यांनी कसे आणले, यावर चर्चा रंगू लागली आहे. कोपरगावात स्नेहलता कोल्हे यांना देखील विरोध होता. मात्र, त्यांनी स्वत:ची ताकद दाखवून दिली. ना. विखे पाटील यांना तिकीट द्यायचे की नाही, यापेक्षा तिकीट कोणाला द्यायचे हे त्यांच्या मनावर आहे. जय हरी म्हणून प्रचलीत आ. बाळासाहेब मुरकुटे यांच्या जागी माजी खा. गांधी यांना तिकीट द्यावे. अशी मागणी होती. मात्र, स्थानिक नेवाशातूनच मुरकुटे यांना विरोध झाला होता. त्यांना शंकरराव गडाख यांचे कडवे आव्हान असणार आहे. राजळे यांच्यासाठी काही कुरघोड्या झाल्या. मात्र, श्रेष्ठी त्यांच्याबाबत नेहमी सकारात्मक होते. सर्वात चर्चेची जागा म्हणजे संगमनेर व अकोले आहे. मात्र, संगमनेर भाजपकडे घेण्यात ना. विखे यांना अपयश आल्याचे बोलले जात आहे. मात्र, अकोल्याची शिवसेना जागा भाजपकडे आणण्यात यश आले आहे. येथे वैभव पिचड यांना भाजपतून सर्वात मोठा विरोध झाला. अशोक भांगरे, सौ. भांगरे व अमित भांगरे व डॉ. किरण लहामटे यांनी विरोध करून मोर्चे आंदोलने काढली. तरी देखील त्यांना तिकीट फायनल झाले. त्यांना डॉ. किरण लहामटे यांचे कडवे आव्हाण असणार आहे.
एकंदर विचार करता. ना. विखे पाटील आणि राम शिंदे वगळता सगळ्यांना विरोध होताना दिसला. मात्र, भाजपने कोणालाही काहीच जुमानले नाही. जेलमधून बाहेर आलेल्या प्रज्ञासिंह ठाकुर यांना तिकीट देऊन आम्ही निवडून आणू शकतो. तर, स्थानिक पातळीवर विरोध हा शुल्लक विषय असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. तर हा सगळा आत्मविश्वास मशीनच्या बळावर असल्याचा आरोप विरोधकांकडून होऊ लागला आहे.
- सागर शिंदे
===============
"सार्वभाैम संपादक"
- सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ७५ दिवसात १३३ लेखांचे ७ लाख ४० हजार वाचक)