"भाजप" प्रवेश: मी सहज "स्विकारला" नाही, पण, "पिचड साहेबांमुळे"...!!
अकोले (प्रतिनिधी) :-
आजवर मी "पुरोगामी" आणि "डावी चळवळ" सांगत आलो होतो. तर १९५८ पासून ज्या "जनसंघाचे" आणि आजच्या भाजपचे कम्युनिष्ट चळवळीशी अधीच जमले नाही. त्यात भाजपमध्ये मला प्रवेश करावा लागेल. हे स्वप्न देखील मला कधी पडले नव्हते. कालपर्यंत सीपीआय ते काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी यासाठी मनाची तडजोड मी केली होती. कारण, पक्ष बदलला तरी तत्व आणि साध्य कधीही बदलता कामा नये. यावर मी ठाम होतो. त्यामुळे राष्ट्रवादी पर्यंतचा प्रवास पचवायला फारसा जड गेला नाही. मात्र, काही दिवसांपुर्वी आमच्या नेत्रुत्वांचा फोन आला आणि त्यांनी आपली भुमिका मांडली. मनात विचारांचे प्रचंड काहुर माजले होते. फुले, शाहु, आंबेडकरांच्या प्रतिमा डोळ्यासमोर चलचित्रासारख्या फिरू लागल्या. पण, पिचड साहेबांनी घेतलेला निर्णय चुकीचा आहे. असे म्हणण्याचे धाडस मी करणार नाही.

कारण, खरोखर गेली पाच वर्षे एक तरुण नेत्रुत्व म्हणून जो विकास करण्याची वैभव पिचड त्यांची धडपड होती. ती, "प्रचंड यातायात" आणि "पाठपुरावा" करूनही पुर्ण होत नव्हती. सरकार दरबारी अनेक मागण्या मांडूनही अपयश सोडून हाती काहीच येत नव्हते. उदयनराजे त्यांच्या भाषणात सांगतात. माझ्या फाईलला केराची टोपली दाखविली जात होती. तर बाकी काय !! त्यामुळे अकोेेले तालुक्याचा विकास करायचा असेल. तर, आपण पक्ष बदलला पाहिजे. या निर्णयावर आम्ही येऊन पोहचलो. आणि श्रेष्ठी मधुकर पिचड, वैभव पिचड यांच्या पाठोपाठ आम्ही देखील भाजपात प्रवेश केला. हे असे असले तरी, हा प्रवेश मी अगदी सहज स्विकारला नाही. हेही तितकेच खरे आहे.एखादा नवखा मुलगा पहिलीच्या वर्गात जाऊन बसतो, आणि प्रचंड अस्वस्थता त्याच्या चेहऱ्यावर दिसते. अशीच काहीशी स्थिती माझी होती. मनात विचारांचे वादळ सुुरु होते. अनेक प्रश्न डोळ्यासमोर नाचत होते. पण, मी मनाला समजून सांगत होतो. की, मानसाचे जे सिद्धांतीक विचार आणि तत्व आहेत. ते विचलित होता कामा नये. राजकारण आणि समाजकारण यांचा उद्देश काय आहे ? राजकारणातील साध्य काय आहे ? यातून आपल्याला काय साध्य आणि सिद्ध करायचे. हे आपल्या हातात असते. शेवटी राजकारण व समाजकारण हे मानवी उन्नतीसाठीच करायचे आहे. यावर आपण ठाम असले पाहिजे. राजकारणातून लोकांना मदत झाली पाहिजे. त्यांची प्रगती झाली पाहिजे. हेच तर आपल्याला साध्य करायचे आहे. हे मी मनाशी पक्के ठरविले होते. याबाबत माझ्या मनात तसुभरही शंका नाही. राजकारण हा विषय माझ्यासाठी स्वार्थ नाही. तर, साधन असून ते समाजसेवेचे एक माध्यम आहे. येथे मला वामन दादा कर्डक यांचे एक गित आठवते आहे. मानसा इथे मी, तुझे गित गावे, जिथे तुझे हित व्हावे. ही माझी राजकीय संस्क्रुती कायम होती.
भाजपात गेल्यानंतर मी एक विचार केला. कम्युनिष्ट डाव्या चळवळींच्या विचारांचा मला केवळ पुजारी व्हायचे नाही. तर, जेथे व्यासपिठ व संधी मिळते. तेथे पाय रोवून उभे राहायचे व समाज प्रगतीसाठी ते विचार उपयोगात आणायचे. त्याच द्रुष्टीने मी पाऊले टाकत होतो आणि तोच माझा राजकीय प्रवास होता. मला "ज्ञात" होते. की, विचारांचा अहंकार बाळगून चालत नाही. कारण, ते एक साधन म्हणन आहे. साधनात बदल झाला तरी चालेल. मात्र, साध्यात गफलत होता कामा नये.! आणि ती मी होऊ देणार नाही. यावर मी ठाम होतो. उद्या कोणत्याही व्यासपिठावर गेलो. तरी, डाव्या विचारांची मुस मी शाबूत ठेवीन व समाज हितासाठी बांधील राहिल. प्राप्त राजकीय परिस्थितीत कार्यकर्ता व त्याचा राजकीय पक्ष, यांची ओळख इतकी पुसट व बदलती होत चालली आहे. की, या परिस्थितीत राजकीय विचार प्रणाली किंवा इझम यांची मोडतोड होऊ पाकत आहे. या ही परिस्थितीत सामाजिक कामात मला जे काही माझेतोपरी प्रयत्न करता येईल. तो मी करण्याचा प्रयत्न करेल.
धन्यवाद !!
अतीम :- भाग ४
जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर मो. क्र. ८८८८९७५५५५ वर मधुभाऊ नवले (अभिनव पब्लिक स्कुल एज्यु. सोसा. संस्थापक, अध्यक्ष तसेच बुवासाहेब नवले पतसंस्था संस्थापक, चेअरमन) साहेबांना पुढील वाढचालीस फोनवर शुभेच्छा देऊन प्रतिक्रिया कळवा.
- सागर शिंदे (शब्दांकन)
===============
"सार्वभाैम संपादक"
- सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ७५ दिवसात १३२ लेखांचे ७ लाख ४० हजार वाचक)