"भंडारदरा व मुळा "पाणलोट क्षेत्रात" पावसाचे "थैमान", ७६ गावांना "सतर्कतेचा" इशारा"

सह्याद्रीचे भुषण भंडारदरा

भंडारदरा (प्रतिनिधी) :- 
                     अकोले तालुक्यातील "भंडारदरा" व "निळवंडे" ही दोन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला आहे. गेले २० दिवस पावसाने पाठ फिरविली होती. मात्र, दोन दिवसापासून रतनवाडी व घाटघर या पाणलोट क्षेत्रात पावसाने थैमान घातले आहे. तब्बल ८३ मिलिमीटर पावसाची नोंद सरकार दरबारी करण्यात आली आहे. त्यामुळे भंडारदरा तुडूंब भरुनही २० हजार क्युसेस पाण्याची आवाक रोज वाढली आहे. त्यामुळे येणारे पाणी सरळ खाली सोडण्यात आले आहे. तर निळवंडे पाणलोट क्षेत्रात टिटवीच्या ओढ्यातून व क्रुष्णावंती नदीतून मोठी आवक होत आहे. त्यामुळे प्रवरा नदीतून ३४ हजार क्युसेस पाणी खाली सोडण्यात आले आहे. हा या वर्षातील सर्वात मोठा विसर्ग आहे. तर मुळा धरणातून देखील पाऊस वाढता असून विसर्ग वाढू शकतो. त्यामुळे, अकोल्याची २० गावे, संगमनेरची १७, राहाता ६, श्रीरामपूर १२, राहुरीची २५, नेवाशाची  ६ अशा ७६ गावांना "सतर्कतेचा इशारा" देण्यात आला आहे.
         

      "सतर्कतेची गावे"

      भंडारदरा, रंधा खुर्द व बुद्रुक, शेलविहीर, माळेगाव, दिगंबर, चितळवेढे, निब्रळ, निळव़डे, विठे, म्हळदेवी, सावंतवाडी, इंदोरी, रुंभोडी, मेहेंदुरी, उंचखडक बु व खुर्द, अकोले, टाकळी, सुगाव खुर्द व बुद्रुक अशा २० गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. तर संगमनेर तालुक्यात दोन्ही धांदरफळ, वाडापूर, रायते, संगमनेर बु व खुर्द, जोर्वे, कणुली, दाढ, कोकणेवाडी, आश्वी, वाघापूर, शेडगाव, खराडी, मंगळापूूर कसारा दुमाला, आश्वी बु, तसेच...राहाता तालुक्यात, दाढ, हाणुमंतगाव, पाथरे, दुर्गापूर, कोल्हार भगवती तर   श्रीरामपूर तालुक्यात कडीत खुर्द व बुद्रुक मांडवे, कुराणपूर, लाडगाव, भेर्डापूर, मालुंजे, खिर्डी, वागी खुर्द व बुद्रुक, वळदगाव, उंबरगाव, या गावांनी सतर्क रहावे. तर, नेवाशात पाचेगाव, चिंचबन, गोनेगाव, नेवासा खुर्द व बुद्रुक व बहिरवाडी येथील नागरिकांनी सतर्क रहावे. राहुरी तालुक्यात देखील धानोरे, सोनगाव, सात्रळ, माळे डुक्रेवाडी, कोल्हार खु, चिंचोली, दावनगाव आंबी, अंमळनेर, केसापूर, चांदेगाव, ब्राम्हणगाव, बोधेगाव, करंजगाव, मालंजे, दरडगाव, महालगाव, लाख, सांक्रापूर, गंगापूर,  पिंपळगाव फुगणी, माहेगाव अशा २५ गावांना अलर्ट चा इशारा आहे.

खुशहाल शेतकरी; पुण्याई धरणांची

           भंडारदरा धरण यावर्षी दि. ९ आॅगस्ट रोजीच तांत्रीकद्रुष्ट्या भरले होते. ९३ वर्षे पुर्ण झालेले हे धरण लाखो शेतकऱ्यांची जिवणदायीनी आहे. त्यामुळे उत्तर नगर जिल्ह्यात पाण्याच्या तुटवड्याचा प्रश्न कधी प्रकर्षाने उद्भवला नाही. १५ ते ३१ आॅगस्ट या दरम्यान हे धरण ११.३९ टिएमसी पुर्ण झाले. बहुतांशी वेळा सप्टेंबर महिन्यात फार पाऊस पडत नाही. मात्र, यावर्षी धरण ओव्हफुल होऊन २८ हजार क्युसेस ने पाणी खाली सोडावे लागले आहे. तर धरणाची सांड निघून पाणी प्रवरेकडे निघाले आहे. अशी माहिती उपअभियंते अभिजित देशमुख यांनी दिली.

अभिजित देशमुख 

(उप-अभियंते)


                      तर दुसरीकडे मुळा धरणात २४ हजार ९५५ म्हणजे तब्बल २५ टिएमसी पाण्याचा साठा आहे. मात्र, हरिश्चंद्रगड ते लहित खुर्द या २५ किलोमिटरच्या भागात चांगला पाऊस झाला आहे. लहित ते मुळा धरणाची भिंत हे जवळपास शंभर किलोमिटरचे अंतर आहे. त्यामुळे हे पाणी भिंतीपर्यंत जाईपर्यंत १२ तास लागतात. त्यानंतर आवक लक्षात घेऊन जावक किती करायची याचा विचार करण्यात येतो. सद्या मुळा धरणाचे ११ दरवाचे उघडले आहेत. त्यातून तुर्तास २ हजार क्युसेस ने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. तर येत्या काही तासात पाण्याचा विसर्ग वाढू शकतो. म्हणून राहुरीतील २५ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
====================
             "सार्वभाैम संपादक"
                 

              - सागर शिंदे 

              8888782010

               -------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ५४ दिवसात ९९ लेखांचे ५ लाख ३९ हजार वाचक)
----------------------