"एकास एक देंगे" ! लेकीन "उमेदवार" नाही "बताऐंगे"..!! अकोल्यात पिचड विरोधी बैठक

विरोधकांची "मादियाळी"

अकोले (प्रतिनिधी) :-              आता "मत विभाजन" नको ! वैभव पिचडांच्या विरोधात "एकास एक उमेदवार" द्यायचा. असा 'निर्धार' पिचड विरोधकांनी पत्रकार परिषदेत केला. असे झाले तरी डॉ. किरण लहामटे वगळता. एकाही विरोधकाने राज्यात "युतीचा निर्णय" होईपर्यंत ठाम भुमिका घेतली नाही. मात्र, काही झाले तरी "एकास एक उमेदवार" द्यायचा. असा सुर कायम ठेवण्यात आला. पण, "कोण उमेदवार द्यायचा" यावर  शेवटपर्यंत "मोहर" लागली नाही. त्यामुळे हे अगदी भाजप सारखेच झाले की; "मंदिर" वही "बनाऐगे", लेकीन "तारीख" नही "बताऐगे". त्यामुळे या तळ्यात-मळ्यात भुमिकेवर पत्रकार परिषद संपन्न झाल्याचे दिसले. अर्थात सौ. भांगरे, अशोक भांगरे हे भाजपत आहेत. ते बंड पुकारणार का ? मारुती मेंगाळ, सतिश भांगरे, मधुकर तळपाडे हे शिवसेनेत आहेत, ते युतीधर्म व शिवबंधनाचे पावित्र पाळणार का ? जर युती झाली नाही. तर डॉ. किरण लहामटे यांची तालुक्यात चर्चा आहे. त्यांची काय भुमिका असेल. या पलिकडे उताविळ होऊन गुढग्याला बाशिंग बांधून बसलेल्यांनी माकप, रासप, सीपीआय, रिपाई, वंचित आघाडी यांना दुर्लक्षित करून व्युव्हरचना आखण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे असे अर्धवट नियोजन ही अपयशाची पायरी असल्याचे संबोधले जाते. त्यामुळे वैभव पिचडांना शह द्यायचा असेल तर छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष दिले तरच शक्य आहे. असे झाले नाही. तर, डॉ. अजित नवले यांनी या सहा जणांच्या भुमिकेपुर्वीच माकप आमदारकीचा प्रबळ दावेदार असल्याचे जाहिर केेले आहे. तर दुसरीकडे रिपाईने देखील बंडाचे निशान फडकविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे "ये तो शुुरुवात है" !, "पिक्चर अभी बाकी है" ! असा सुर मतदारांतून उमटू लागला आहे.

हे मला काही नवे नाही !!


           मधुकर पिचड व वैभव पिचड यांना कट्टर विरोधक म्हणून अनेकांची नावे पुढे येत राहिली. मात्र, अनेक विरोधकांनी साहेबांना निवडून येण्यासाठी पुरक वातावरण कायम ठेवले. त्यांची नावे नव्याने का सांगावित. मात्र, आज उशिरा का होईना ! पण सामाजिक शहानपण त्यांना आले आणि सगळ्यांनी मिळून एकीचा नारा दिला. आज पिचड विरोधी वाातावरण निर्माण झाले आहे. मात्र, "खेळ आणि निवडणुका". यांच्यात कधी "डावाला कलाटणी" मिळेल. हे काही सांगता येत नाही. याचे कारण; म्हणजे आज जे राजकीय वातावरण आहे. ते टिकून राहिल असे वाटत नाही. कारण; अद्याप युतीचे चिन्ह स्पष्ट झालेले नाही. तालुक्यात शिवसेना पक्ष हाच पिचडांचा कट्टर विरोधक आहे. नेहमी दोन नंबरची मते मिळवून यांनी ते सिद्ध देखील केले आहे. आता एकंदरीत विचार करता. मधुकर तळपाडे, सतिष भांगरे, मारुती मेंगाळ हे उमेदवार भगव्याखाली एकवटले आहे. वास्तव पाहता. येथे जो शिवसैनिक आहे. तो कोण्या व्यक्तीच्या पाठीशी ऊभा नाही. तर तो आदरणीय बाळासाहेब ठाकरे व घराण्याशी थेट सल्लग्न आहे. त्यामुळे जर युती झाली नाही. तर, जन्मजात शिवसैनिक मातोश्रीहुन जो कोणी उमेदवार दिला जाईल. त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहिल. असे झालेच तर, मधुकर तळपाडे यानी जशी आदिवासी बांधवांच्या उन्नतीसाठी सरकारी नोकरी पणाला लावली. तशी आमदारकीसाठी ताकद लावली तर ते सर्वात सक्षम व योग्य उमेदवार ठरतील. ते ही  एकास एकचा नारा असला तर. मात्र, दुसरीकडे मारुती मेंगाळ यांना शिवसेनेच्या मुख्य गटातूनच प्रचंड विरोध आहे. त्यामुळे त्यांचा ठाव लागेल असे अनेकांना वाटत नाही. तर युवकांमध्ये सतिष भांगरे यांचे नाव चर्चीले जाते. मात्र, त्यांच्या पाठी जनाधार नाही. पण, कदाचित एखादा "गॉडफादर" भेटला तर किमान नाव तरी चर्चेत राहिल. आणि जर युती झाली. तर, या शिवसेना उमेदवार काय भुमिका घेतील हे महत्वाचे आहेच. मात्र, तरी. येथील कट्टर शिवसैनिक मातोश्रीचा आदेश पाळतील. आणि त्याचा फायदा वैभव पिचड यांना होईल. परंतु, युती झाली नाही. तर खरी पळापळ एकीचे बळ दाखविणाऱ्यांची होईल. हे येणारा काळच दाखवून देईल. असे जनतेला वाटते आहे.

वेट & वॉच

                 या सर्व प्रकारात अशोक भांगरे यांची भुमिका मोठी आहे. कारण, अन्य उमेदवारांकडे पक्षाचे पाठबळ म्हणून मिजास आहे. मात्र, भांगरे यांच्याकडे आदिवासी पट्ट्यात "स्वत:ची व्होटबँक" आहे. मात्र, त्यांनी सद्यातरी एकीचा नारा दिला असला तरी, भाजप जोवर वैभव पिचड यांना उमेदवारी "डिक्लेर" करत नाही. तोवर त्यांच्या अपेक्षा पल्लवित आहेत. पत्रकार परिषदेत पाच उमेदवार म्हणून चर्चा करण्यात आली. मात्र, सहावे उमेदवार सौ. सुनिता भांगरे यांच्याकडे कोणाचे लक्ष वेधले नाही. अर्थात त्याच कदाचित प्रबळ उमेदवारी करु शकतात. अशी गावोगावी चर्चा आहे. त्यांनी भाजपच्या मुलाखतीत आपल्याला संधी द्यावी असे मत मांडले आहे. मात्र, भाजपची भुमिका काय आहे. हे गुप्त असले तरी ते जगजाहिर आहे.  तरी भांगरे कुटुंबाने प्रयत्न सुरु ठेवले आहे. उद्या जर वैभव पिचड यांना उमेदवारी जाहिर झाली. तर, भांगरे त्यांचा प्रचार करतील का ? सौ. भांगरे भाजप सोबत राहतील की; अपक्ष निवडणुक लढवतील. जर भांगरे यांनी पुन्हा बंडखोरी केली तर आता कोणत्या पक्षात जातील. हे पाहणे जनतेसाठी उत्सुकतेचे ठरणार आहे. मात्र, जर त्यांचे मन वळविण्यात ना. विखे पाटील यांना यश आले. तर, सिताराम पाटील गायकर, कैलास वाकचौरे किंवा जालिंदर वाकचौरे यांच्या रांगेत त्यांना सन्मानाने बसविले जाऊ शकते. त्यासाठी हा कट्टर विरोध नकळत त्यांची ताकद वाढविणार आहे. असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे काही किंगमेकरपैकी भांगरे यांची भुमिका त्यात सामाविष्ठ होेते.

योग्य वेळी योग्य निर्णय घेतलाय आजवर

         आणखी एक गोष्ट प्रकर्षाने जाणविली. की; यावेळी बदलाच्या भुमिकेत अनेकांनी उडी घेतली आहे. त्यात महत्वाचे म्हणजे माकपचे डॉ. अजित नवले यांना अकोल्याच्या आमदारकीवर दावा ठोकला आहे. कारण, युती झाली तर, माकप हाच खरा विरोधक असल्याचे आकडेवारी सांगते. कारण, २००९ ला तुळशीराम कातोरे यांना ७ हजार २०० तर  २०१४ ला नामदेव भांगरे यांना ९ हजार मते मिळाली होती. शिवसेना भाजप युती झाल्याने त्यांचा प्रश्न मिटतो. तर काँग्रेसला सतिष भांगरे यांच्या रुपाने अवघी ४ हजार मते होती. तर राष्ट्रवादीचे काय झाले. हे माडण्यापेक्षा कार्यकर्त्यांची फरपट सगळ्यांसमोर आहे. त्यामुळे अर्थातच माकप हाच पिचडांना शह देऊ शकतो. हे डॉ.  नवले सिद्ध करू शकले नाही. तर ते नवलच. कारण; माकपला हिच नामी संधी आहे.

थांबा !! युतीचे काय होतय पाहु !!

        यापलिकडे रिपाईचे राज्यसचिव विजय वाकचौरे यांनी पिचडांना आवाहन केले आहे. आम्ही युती धर्म पाळू. परंतु, आम्हाला सत्तेत सहभाग दिला पाहिजे. तरच यावेळी सोबत राहू, अन्यथा वेगळा विचार करावा लागेल. असे बैठकीत ठणकाऊन सांगितले आहे. त्यांच्यामागे दलित मतदान मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांनी येणाऱ्या काळात अकोल्यात मेळाव्याचे आयोजन करून शक्तीप्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीला लोकसभेला अकोल्यातून तीन हजार मतदान पडले आहे. ते बहुतांशी वाकचौरे यांच्या फेवरमध्ये असल्याने त्यांनी जर बंड पुकारला तर त्याचा फटका पिचडांना बसेल. एकंदरीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, रिपाई, माकप, सीपीआय, रासप, वंचित अशा अनेक घटक पक्षांनी निवडणुकीत डोके वर काढले आहे. त्यामुळे "एकास एकचा नारा" कितपत तग धरतो. याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

एक स्पर्धक, बाकी विरोधक


  - सागर शशिकांत शिंदे

      (संपादकीय)

=================
             "सार्वभाैम संपादक"
                 

              - सागर शिंदे 

              8888782010

               -------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ५५ दिवसात १०० लेखांचे ५ लाख ५० हजार वाचक)
----------------------