डॉ. किरण लहामटेंना "राष्ट्रवादीची उमेदवारी" फायनल, "पिचड व लहामटे" एकाच दिवशी "तीन तारखेला" अर्ज भरणार !!

अकोले (प्रतिनिधी) :-
                 गेली अनेक दिवसांपासून शिवसेना-भाजप युती, आणि राष्ट्रवादीचा उमेदवार कोण ? यात चर्चा, तर्क वितर्क लावले जात होते. मात्र, वाचकहो आम्हाला सांगण्यास अभिमान वाटतो की, "रोखठोक सार्वभौम" ने अकोले तालुक्यातील राजकीय घडामोडीचे जे काही अचूक विश्लेषण केले होते. ते अगदी तंतोतंत खरे ठरले आहे. कोणत्याही व्यक्तीची आणि दडपशाहीची तमा न बाळगता. आम्ही आपणास अभ्यसपुर्ण माहिती देत होते. त्यात यत्किंचितही बदल झालेला नाही. हे सिद्ध झाले आहे. रोखठोक सार्वभौमने डॉ. किरण लहामटे यांच्या उमेदवारीवर "मोहर" लावली होती. याचे वार्तांकन थेट बारामतीपर्यंत पोहचत होते. त्यामुळे अकोले तालुक्याचा जनाधार आणि जनमत कोणाला आहे. हे राष्ट्रवादी वरिष्ठांना समजले. कोणत्याही अमिषाला बळी न पडता. जे अकोलेकरांना वाटते ते आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला. त्याची थोडी का होईना दखल घेऊन डॉ. लहामटे यांचे नाव पुढे आले आहे. असा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे मत आहे. त्यामुळे अनेकांनी "रोखठोक सार्वभौमचे" आभार मानले आहे.
          आता महायुती झाली आहे. भाजपकडून माजी आमदार वैभव पिचड यांना उमेदवारी जाहिर झाली असून शिवसेनेच्या उमेदवारांचा मुद्दा संपला आहे. मात्र, शिवसैनिक, मधुकर तळपाडे, मारुती मेंगाळ व सतिश भांगरे यांच्या भुमीका काय असणार आहे. ? ज्यांना राष्ट्रवादीचे तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ट केली आणि अखेर पिचडांचा पराभव पाहण्यासाठी एक पाऊल मागे घेत मनाचा मोठेपणा दाखविला असे अशोक भांगरे, सौ. सुनिता भांगरे व पुत्र अमित भांगरे यांचा सहभाग कसा आणि किती असणार आहे. किंवा पुढचे पाऊल काय असणार आहे. महायुतीत जर रिपाईला वैभव पिचड यांच्याकडून सन्मान मिळाला नाही. तर, विजय वाकचौरे, शांताराम संगारे यांची भुमिका काय असणार आहे, मार्क्सवादी पक्षाचे अजित नवले यांनी पुर्वीच निवडणुकीत उडी घेतली आहे. ते पुढे काय निर्णय घेतील. मनसेचे तालुकाध्यक्ष दत्ता नवले यांनी उमेदवार उभे करण्याचे जाहिर केले आहे. तो उमेदवार कोण असेल, बहुजन वंचित आघाडीचा उमेदवार नटून बसला आहे. ते खरोखर फाईट देतील का ? या सर्व रेलचेलमध्ये एकास एक उमेदवार ही शपथ सार्थ ठरेल का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे
मिळण्यासाठी वाचत रहा. "रोखठोक सार्वभौम".
        दरम्यान उद्याच्या तीन तारखेला वैभव पिचड व डॉ. किरण लहामटे हे दोन्ही उमेदवार अर्ज भरण्यासाठी आमने सामने येणार आहे. तर तो दिवस गुरूवार असून त्याच दिवशी रिपाईचा संकल्प मेळावा ठेवण्यात आला आहे. त्यामुळे दोन प्रबळ उमेदवार, रिपाईचा मेळावा आणि गुरूवार. यात अकोले शहराचा श्वास कोंडणार असून. पोलिसांची दमछाक होणार अाहे. त्यामुळे एका उमेदवाराने अर्ज २ तारखेला भरण्याची विनंती केल्यास. संभाव्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेणार नाही. अन्यथा मोठे पोलीसबळ अकोल्यात तैनात करावे लागणार आहे. या सर्व विषयांचे विश्लेषण आम्ही आपल्यासमोर उद्यापासून मांडणार आहोत. वाचत रहा, रोखठोक सार्वभौम.

- सागर शिंदे

===============

             "सार्वभाैम संपादक"
                 

    - सागर शशिकांत शिंदे   

Rajratna.sagar@gmail.com
                  -------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ७४ दिवसात १३१ लेखांचे ७ लाख ३० हजार वाचक)