|
काय रं बुवा अकोल्यात आलं की साडेसातीच लागतीय..!!
|
मा. देवेंद्र फडणवीस
(मुख्यमंत्री)
महोदय..!
तुमच्या नेत्रुत्वाखाली सरकारचा कारभार अगदी "पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त" चालतो असा दावा आपण करता. मात्र, सरळ-सरळ एक प्रश्न विचारतो. "शेतकऱ्यांच्या" मुलांना "व्यवसायाचे अमिष" दाखवून तुम्ही "महारयत अॅग्रो" ही कंपनी स्थापन केली. त्यातून "कडकनाथ कोंबडी" पालन करून अल्पकाळात भरपूर पैसा कमविण्याचे लालसा शेतकऱ्यांच्या मुलांना दाखविली. त्यासाठी गोर-गरिब तरुणांकडून "कोट्यावधी" रुपये गोळा केले. या खोटारड्या अमिषाने "दिशाभुल" करून या कंपनीने "फसवणूक" केली. या कंपनीवर आपल्याच मंत्रीमंडळात शेतकरी चळवळीशी "बेईमानी" करून सत्तेच्या दरबारात "लाचारीची" भूमिका बाजावणारे "क्रुषी" राज्य मंत्री "सदाभाऊ खोत" यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करणार का ? याचे उत्तर द्या.
|
होय !! यांनीच शेतकऱ्यांना फसविले
|
माझा या "घोटाळ्याशी" काही एक "संबंध नाही". असे सांगणाऱ्या खोत यांच्या "रयत क्रांती" संघटनेचे कार्यकर्ते फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना धमकावत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात आणखी काय पुरावा हवा आहे.? तर दबावतंत्र म्हणून पोलीस तक्रार देऊन देखील कोणताही गुन्हा दाखल करत नाही. हे प्रकरण सरकार दडपण्याचा प्रयत्न का करत आहे.? असा आरोप दशरथ सावंत यांनी पत्रकात केला आहे.
|
पत्रास कारण की;...!
|
काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम हे सुद्धा ओरडू-ओरडू सांगत होते. माझा मुलाच्या कंपनीत माझा कोणताही संबंध नाही. तरी, "सीबीआय व इडीने" चौकशीअती ताब्यात घेऊन तत्थ असल्याचे सांगून ताब्यातच ठेवले आहे. चिदंबरम यांच्या बाबतीत मोदी सरकारने जो न्याय लावला. तोच न्याय "महारयत" घोटाळ्यात सदाभाऊ खोत यांना लावून. "पारदर्शी" कारभाराचे "दर्शन" महाराष्ट्राला का करून दिले नाही. याचे उत्तर तुम्हाला द्यावेच लागेल फडणवीस साहेब. अन्यथा, जनता उत्तर देण्यास भाग पाडेल. हे ध्यानात घ्यावे.! असे पत्रकात म्हटले आहे.
|
वेळीच भानावर यावे; कळावे - सावंत
|
माध्यामांमुळे "घोटाळ्याची व्याप्ती" वाढत आहे. या मंत्र्याने "सत्तेचा दुरुपयोग" करून घोटाळ्यातील "पुरावे नष्ट" करु नये. म्हणून साहेब तुम्ही खोत यांचा तत्काळ "राजिनामा" घेतला पाहिजे. किंवा बडतर्फ करून "इडीची चौकशी" लावली पाहिजे. असे झाले तर, खऱ्या अर्थाने वाटेल की, हे सरकार भ्रष्टाचार सहन करत नाही. असे झाले नाही. तर, दुर्दैवी "शेतकऱ्यांना" तुमच्या "दारात". अमरण उपोषण करून स्वत:ला "संपवून" घेण्याचा मार्ग "नाईलाजाने" स्विकारावा लागेल. याची नोंद घ्यावी. अशी "धमकीवजा" विनंती सावंत यानी पत्रकात केली आहे.
|
महोदय..! हे आरोप खोट आहे!!
|
आजवर काँग्रेसने "भ्रष्टाचार व घराणेशाही" यांचा वापर करून "सत्तेसाठी" जातीच्या "व्होटबँक" तयार केल्या. जातीच्या भिंती तोडण्याऐवजी त्या पक्क्या करण्यात त्यांनी अप्रत्यक्ष मदत केली. या गोष्टींचा "इट" आल्यामुळे जनतेने "नरेंद्र मोदी" यांना "पर्याय" म्हणून स्विकारले. पण, २०१४ च्या निवडणुकीत जाहिर "सभा व भाजपच्या जाहिरनाम्यातून" शेतकऱ्यांना "स्वामिनाथन आयोग" लागू करण्याचे "आश्वासन" दिले होते. मात्र, सत्तेत आल्यानंतर "उलटवार" करुन "स्वामिनाथन आयोग लागू करण्यास "कोर्टासमोर नकार" दिला व शेतकऱ्यांचा "विश्वासघात" केला. मात्र, आम्ही काहीही केले तरी, आम्हाला "जनाधार" मिळतो. असा "समज" सरकारचा झाला आहे. मात्र, सरकारने हे लक्षात घ्यावे. की, साखर कारखाने, सामाजिक, शासकीस व स्थानिक स्वराज्य संस्था लुटून कोणत्याही "कष्टाशिवाय" कोट्यावधींची संपत्ती लुटणाऱ्या काँग्रेसला आपण धडा शिकवत आहात. तसेच पिढ्यान् पिढ्या "निर्बुद्ध" लोकांनी "मंत्रीपदे" भोगून "घराणेशाही" टिकवून "राजकारण" केेले. त्यांचा नायनाट होत आहे. याही पलिकडे "चिदंबरम व खोत" यांच्यासारखे कंपन्या स्थापन करून "शेतकऱ्यांची लुटालुट" करणाऱ्यांना "तुरुंगाचा रस्ता" दाखविणार असाल. तर, शेतकऱ्यांकडे तुर्तास दुर्लक्ष केले तरी जनता आपल्याला पाठींब देण्यास तयार आहे. हिच जनभावना सामान्य मानसांच्या मनात आहे. हे सरकारने विसरु नये. मात्र, कालपर्यंत आम्ही ज्या "भ्रष्टाचार व घराणेशाहीच्या विरोधात" होतो. तोच "कचरा" आज भाजप गोळा करुन आपल्या पक्षात भरत असल्याचा "दिमाखदार सोहळा" महाराष्ट्रात सुरु केला आहे. हा प्रकार म्हणजे "भ्रष्टाचारमुक्ती व घराणेशाही" तसेच "पारदर्शी" कारभाराचा "महाराष्ट्रीयन पॅटर्न" दाखविण्याचे काम चालु आहे काय ? असा प्रश्न दशरत सावंत यांनी फडणवीस यांना पत्राद्वारे केला आहे.
|
भिऊ नका ! ईडी बीडी आपल्यासाठी नाय..!
|
ते पुढे लिहीतात की; तुमच्या भाजपमध्ये पावन करुन घेतलेल्या या कचऱ्यातील एक तरी "महाभाग" असा दाखवा की, मला "सत्ता" नको, "तिकीट" नको, केवळ भाजपचे "राजकीय तत्व" व कार्यक्रम पटला. म्हणून मी आपल्या पक्षाचा स्विकार करीत आहे. असा "एक जरी व्यक्ती" आढळला. तर, मी या पत्रातील "सर्व आरोप मागे घेऊन" मी आपली "माफी" मागेल. भाजपचा काँग्रेस करण्यात व खोत याच्यासारख्या संशयीत भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालण्याचा पराक्रम पाहुन. एकच सांगतो की, साहेब यापुढे आता जनतेला ग्रुहीत धरू नका. कारण; आणिबाणीत सत्याग्रह करून मी स्वत: "१८ महिने" तुरूंगात होतो. जनतेने स्वत: "इंदिरा गांधी" यांचा पराभव करून सत्ता व आणिबाणी देखील खोडून काढली होती. त्यावेळी मुरारजी यांच्या सत्तेने १० रु किलो साखरेचे भाव २.५० अडिच रुपयांवर आणून "स्वस्ताईची फुशारकी" मारली होती. तर, ग्रामीण, शेतकरी शेतीची वाट लावल्यानंतर पुन्हा अडिच वर्षात सत्ता उलथून टाकली. हा "जनतेने" घडविलेला "इतिहास" डोळ्यासमोर ठेवा.
अंतत: एकच सांगतो. "घराणेशाही व भ्रष्टाचाराला" कंटाळलेल्या जनतेने मोठी "अपेक्षा" ठेऊन मोदी व तुमच्याकडे "सत्ता" दिली आहे. त्या "अपेक्षेचे भान ठेवा" आणि "वेळीच भानावर या".।।।
आपले नम्र
दशरथ सावंत
माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य
स्वाभिमानी शेतकरी संघटना
====================
"सार्वभाैम संपादक"
- सागर शिंदे
8888782010
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ५५ दिवसात १११ लेखांचे ५ लाख ५५ हजार वाचक)
----------------------