|
मला कोणी शिकवायची गरज नाही !!
|
अकोले (प्रतिनिधी) :-
अजूनही "आंबेडकरवादी" लोकांना डॉ. "बाबासाहेब आंबेडकर" यांच्याप्रती "श्वासाहुन प्रिय प्रेम" आहे. त्यांचेच प्रतिबिंब म्हणजे आज "प्रकाश आंबेडकरांना" बाबासाहेबांचे "नातू" म्हणूनच "आंबेडकरी जनतेने" अगदी डोक्यावर घेतले होते. त्यामुळेच तर २०१९ च्या लोकसभेला "४१ लाख मते" साहेबांच्या पदरात टाकली. पण, त्याचा फायदा भाजपला झाला आणि एकही उमेदवार "वंचितचा" निवडून आला नाही. मात्र, "एमआयएम व भाजपला" निवडून आणण्यात आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला पाडण्यात वंचित हा "रामबाण" उपाय ठरला. खरंतर जेव्हा काँग्रेस व राष्ट्रवादी "भुईसपाट" करण्यास वंचित कारणीभूत ठरली. तरी देखील आंबेडकरी समाजाला वाईट वाटले नाही. याही पलिकडे भाजपला पुरक वातावरण निर्माण होऊन "जातीयवादी" पक्षाचे बळ केंद्रात वाढल्याचे शल्य उरात बाळगूनही आंबेडकरी जनतेने बाळासाहेबांची साथ सोडली नाही. आता सबंध "वंचित घटक" प्रकाश आंबेडकरांच्या "सावलीखाली" एकवटला होता. राज्यात काय ! देशाला साहेबांची ताकद समजली होती. गरज होती ती फक्त "योग्य निर्णय आणि कार्यक्षम नेत्रुत्वाची". पण, दुर्दैव असे की; मोठ्या धाडसाने, "काळजावर दगड" ठेऊन म्हणावे लागते की; तोच आभाव "वंचित बहुजन आघाडीत" दिसून आला आणि होत्याचे नव्हते झाले. काल सगळा समाज साहेबांच्या मागे होता. आज परिस्थिती प्रचंड बदलली आहे. वंचितची ताकत शमली असून अनेक बड्या विश्लेषकांना असे वाटते, की, प्रकाश आंबेडकरांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही. कदाचित कोणाला याचे "आश्चर्य" वाटेल. तर कोणाला "नवल", कोणाला "पटेल" तर कोणाला "राग" येईल. पण साहेबांच्या काही निर्णयांमुळे "वंचित आघाडीत-बिघाडी" झाल्याचे दिसत आहे. काल, "लोकसभेला" जे आंबेडकर 'एमआयएमसाठी राष्ट्रवादीशी' दोन हात करीत होते. त्याच एमआयएमने आता वंचितपासून चार हात लांब रहायचे ठरविले आहे.
|
हम किसीके गुलाम नही !!
|
काँग्रेसला २८८ पैकी ४० जागा देऊ करणे, युतीसाठी पोषक चर्चा टाळणे, एमआयएमशी मैत्री तोडणे, लक्ष्मण माने व अन्य नेत्यांशी तोऱ्यात वागून त्यांची मते जाणून न घेणे, स्वबळावर २८८ जागा लढविणे, ब्राम्हणप्रणित सत्तेला नकळत पाठबळ देणे. हे सगळे "नौटंकीचे राजकारण" आता "आंबेडकरी" समाज्याला कोठेतरी रुचू लागले आहे. तर अभ्यासू आणि जाणकारांच्या पचणी पडेणासे झाले आहे. एकीकडे "भाजपला नावे ठेवायची" आणि दुसरीकडे "विरोधकांची मते खाऊन ब्राम्हणी सरकारला पुरक वातावरण निर्माण करून द्यायचे. हे न समजण्या इतपत डॉ. बाबासाहेबांनी त्यांची लेकरं खुळी ठेवली नाही. त्यामुळे, प्रकाश आंबेडकरांनी लोकसभेची पुनराव्रुत्ती करण्याचा जो घाट घातला आहे. तो अंधभक्तांच्या लक्षात येवो ना येवो. सुशिक्षित वर्गाच्या लक्षात येत आहे. आणि ज्यांच्या आला नसेल तर ते चळवळीचे अपयश समजावे लागेल. त्याकाळी डॉ. बाबासाहेबांना काँग्रेसची धेय्य धोरणे आणि विचारप्रणाली आवडत नव्हती. तरी, त्यांनी "तह" करून "सत्तेत सहभाग" घेण्यास "तत्व" बाजुला ठेवली. कारण, "सत्तेपुढे शहानपण चालत नाही". न्यायासाठी सत्ता हे मोठे शस्त्र आहे. मात्र, त्यांचे वंशज कोठेच "वैचारिक तह" करायला तयार नाहीत. उलट लोकशाहीचा कणा म्हणून जो विरोधीपक्ष असतो. तो, सपाटून पडेल कसा अशी धोरणे अवलंबविली जातात. तरी याचे आम्हाला दु:ख नाही. पण, "संविधानाला विरोध करणाऱ्या विचारधारेचा पक्ष बळकट होऊन वंशजांकडूनच त्याला खतपाणी मिळत आहे. म्हणून, आता मत वाया न घालता. योग्य उमेदवाराला मत गेले पाहिजे. असा निर्णय आंबेडकरी समाजाने घेतल्याचा सूर जनतेतून उमटू लागला आहे. त्यामुळे "वंचितमुळे कोणी वंचित" रहायला नको. अशी टिका "वैचारिक आंबेडकरी" जनतेतून होत आहे.
|
हम करे सो निहाल !!
|
खरे पाहता गेली ४० ते ४५ वर्षे प्रकाश आंबेडकर यांना बाबासाहेबांचा नातू म्हणून आंबेडकरी चळवळीच्या विचारधारेने स्विकारले. म्हणून निलम गोऱ्हे, राजा ढाले, रामदास आठवले, अविनाश महातेकर, लक्ष्मण माने या आणि अनेक बड्या नेत्यांनी आंबेडकरांचे नेत्रुत्व स्विकारले. पण, त्यांना एकसंघाची मोट बांधता आली नाही. एव्हाणा त्यांचा स्वभाव अभ्यासू असला तरी त्यात संघटन कौशल्य आहे. असे म्हणणे धाडसाचे ठरेल. अर्थात आपल्याकडे लोक डॉ. बाबासाहेबांचा नातू म्हणून किती अपेक्षेने व आदराने पाहतात. पण, वेळोवेळी त्यांचा "भ्रमनिराश" होतो. हे "कशाचे प्रतिक" आहे.? ज्यांना जवळ केले त्यांना काही क्षणात लोटून द्यायचे. तुम्हीच सांगा..! कसे तयार होतील निष्ठावंत कार्यकर्ते. ज्यांनी आंबेडकरांचा त्रागा करून बंड केला. ते आज राजकारणात यशस्वी आहेत. गोऱ्हे, महातेकर, आठवले यांचे स्वतंत्र अस्तित्व तयार झाले असून, चांगल्या पदावर कार्यरत आहेत. कारण, राजकारणात "तत्वांशी तडजोड" केली पाहिजे. हे डॉ. बाबासाहेब सांगून गेले आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर अभ्यासु झाले. मात्र, गणिमी राजकारणी नाही. असेही आता बोलले जाऊ लागले आहे.
|
जात की तेढ मे ! मिल..भिडे !
|
आता आपण फार खोलात जाणार नाही. पण, २०१९ ची लोकसभा ते सप्टेंबर २०१९ ची विधानसभा पुर्व वातावरण. यातील प्रकाश आंबेडकरांची व्रुत्ती, प्रव्रुत्ती, जनता, भावना, वास्तव आणि शेवटी सारांश काय ? यावर भाष्य करणार आहे. भिमा कोरेगावची "दंगल" झाली. तेव्हा रामदास आठवले हे भाजपकडून "केंद्रात मंत्री" होते. एवढ्या मोठ्या "नियोजित जातीय दंगलीत" केंद्रसरकार आठवलेंचे तोंड बंद करणार नाही. ते मोदी सरकार कसले. !! त्यामुळे "हकनाक" मार खावून "शौर्याच्या ठिकाणी धैर्य खचावे". अशी परिस्थिती भिमसैनिकांची निर्माण झाली होती. त्या ठिकाणी दलित भक्तांचा "राम....दास" झाल्याचे सबंध आंबेडकरी जनतेने पाहिले. याचाच फायदा घेत प्रकाश आंबेडकर यांची पुन्हा "दमदार एन्ट्री" झाली, आणि ते समाज्याच्या पाठीशी "दिपस्तंभासारखे" ठाम उभे राहिल्याचे दिसले. एकतर भाजप ब्राम्हणवादी, त्यात धर्मवेडा पक्ष. अशात "संभाजी भिडे" आणि "मिलिंद एकबोटे" यांची नावे पुढे काय यावीत.!! या सर्व घटना अनावधानाने जुळून आल्या आणि प्रकाश आंबेडकरांनी "नामी संधी" साधत सगळ्या "आंबेडकरी समुदायाचे प्रतिनिधीत्व" केले. सोशल मीडिया, प्रसार माध्यमे यांनी आंबेडकांना अगदी डोक्यावर उचलुन घेतले. त्यानंतर मात्र, असे वातावरण तयार झाले की, "संकटकाळी" कोनच नाही. पण, फक्त डॉ. "बाबासाहेबांचा नातूच" कामी आला. असे मेसेज फिरु लागले. त्यानंतर या अफाट लोकप्रियतेच्या बळावर उगम झाला तो वंचित बहुजन आघाडीचा. कोण रामदास आठवले ? कोण जोगेंद्र कवाडे ? कोण रा.सू गवई,? जनतेने सगळ्यांना कोलून दिले. सगळ्या "बहुजनांचा एकच नेता". तो म्हणजे "बाळासाहेब". बघता-बघता मोदींच्या लाटेप्रमाणे बहुजन वंचित घटकांमध्ये "बाळासाहेबांची लाट" निर्माण झाली. हा फुगा आता फुल हवेत गेला होता. त्यांची ताकद येणाऱ्या २०१० च्या "लोकसभा निवडणुकीत" आजमवली जाणार होती. त्यातच जनतेचा सगळ्यात मोठा पहिला "विश्वासघात" होणार होता.
|
आम्ही वैतागलो समजून घेऊन अन् सांगून
|
काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्याशी आघाडी टाळत. त्यांनी "स्वबळाचा नारा" दिला. अर्थात युती झाली असती. तर १५ खासदार आघाडीचे आणि किमान ४ ते ५ खासदार "वंचित बहुजन आघाडीचे" निवडून आले असते. मात्र, तसे न होता. "वंचित" एमआयएमवर "प्रेम" करत बसली आणि राष्ट्रवादीशी वाद घालुन स्वत:ची ताकत गमवत बसली. अखेर झाले काय ? निकाल हाती आला तर दोन्ही ठिकाणी प्रकाश आंबेडकर पडले. तर एकही जागा वंचितची निवडून आली नाही. उलट मुस्लिम समाज्याने अकोला सोलापुरासह राज्यात बहुतांशी ठिकाणी वंचित न चालविता. मनाचे राज्य केले. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांना देखील दोन्ही ठिकाणी मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे झाले असे की; सगळ्या राज्याला आणि देशाला वंचित घटकाची ताकद लक्षात आली. कालपर्यंत जे प्रस्तापित पक्ष आपल्याला अदखलपात्र ठरवत होते. त्यांना पहिल्यांदा दखल घेणे भाग पडले. ज्या मनसेने भाजपची सुपारी फोडली. त्यांचा देखील मतांवर फारसा फरक जाणवला नाही. मात्र, सर्वाधीक काँग्रेस भुईसपाट झाली. तर राष्ट्रवादीला दणका बसला. तो वंचितमुळे. याच पक्षांनी आजवर आंबेडकरी जनतेची "हेटाळणी" केली होती. ज्या काँग्रेसने डॉ. बाबासाहेबांना प्रचंड त्रास दिला होता. तो वचपा आज निघाला. असे म्हणून जनता खूश होती. या ताकतीने वंचित घटकांना बळ मिळाले होते. मात्र, दुसरीकडे सखोल विचार करता, वैचारिक बांधणी असलेल्या जनतेला हे यश बोचत होते. कारण, ज्या भाजपला धडा शिकवायचा त्यांनाच आपल्यामुळे "प्रचंड ताकद" मिळाली. खरोखर "वंचित" भाजपची "बी टिम" नाही तर काय ? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले.
|
यावर विचार करतोय, पण उमजेना
|
इतकेच काय !! या निवडणुकीत प्रचार यंत्रणेला "भाजपची रसद" असल्याचे आरोप झाले. म्हणून तर ज्याला वंचित नाव दिले. ते वंचित "हेलिकॉप्टरने" सभांना हजेरी लावू लागले. हा किती मोठा विरोधाभास आहे. पण, तरी देखील निवडणुकांमध्ये "बहुजन मतदार" वंचितच्या पाठीशी ऊभा राहिला. त्यानंतर सत्ता गेली. पण, "सामाजिक शहानपण" येईल असे "सुशिक्षित जनतेला" वाटत होते. कारण, काँग्रेस- राष्ट्रवादीला वंचितची ताकत समजल्यामुळे त्यांनी विधानसभेला पहिला हात वंचितला पुढे केला होता. तेव्हापासून प्रकाश आंबेडकरांनी "मुरका" मारत एकच "तुंतूनं" लावून धरलं. ते म्हणजे काँग्रेसने उत्तर द्यावं. "आम्हाला भाजपची "बी टिम" असे का संबोधले" !! बैठकीला बोलविले की, हाच सुर, "उठता-बसता" हाच सुर. काँग्रेस काय उत्तर देणार होती. राजकारणात आरोप-प्रत्यारोप चालुच असतात. मागचे सोडून पुढचा विचार करायचा असतो. त्यानंतर विधानसभा आल्या. प्रकाश आंबेडकरांना विश्वासात घेण्याचा विषय आला तर त्यांनी प्रतिउत्तर दिले. की, काँग्रेसला २८८ पैकी आम्ही ४० जागा देऊ. या वाक्याने साहेबांच्या तोऱ्याची सगळीकडून खिल्ली उडाली. जे प्रकाश आंबेडकर ईव्हीएमवर अक्षेप घेत होते. तेच आंबेडकर राज ठाकरे यांच्या ईव्हीएम विरोधी आंदोलनाला प्रतिकार करताना दिसले. जेव्हा-जेव्हा भाजपच्या विरोधात विरोधक एकवटले. तेव्हा-तेव्हा आंबेडकरांनी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड-उघड दिसले आहे. असे असून देखील त्यांना "बी टिम" म्हटल्याचा राग का येतो.? असे विचारवंतांना प्रश्न पडतो आहे. उलट हे सर्व सावरताना ते म्हणतात, भाजपचेे आम्ही एकमेव कट्टर विरोधक आहोत. भिक नको सत्तेची, सत्ता हवी हक्काची. पण, ते हक्काचे बळ आपल्याकडे नाही. ते थोडे कमी पडते आहे. त्यासाठी तत्व बाजुला ठेवावी लागतील. हे कोणी सांगावं. हेच कळत नाही.
|
मी छोटा विचार करीत नाही !! म्हणून..!
|
लोकसभेत मिळालेले यश ते विरोधकांना घेऊन विधानसभेत वापरतील असे बहुजन मतदारांना वाटत होते. म्हणून आजवर लेखण्या त्यांच्या विरोधात उठल्या नाहीत. पण, वंचितच्या नावाखाली "पुन्हा भाजपला बळ" मिळत असेल. तर ते जाणकार आंबेडकरी समुदयास मान्य नाही. म्हणून आंबेडकरांपासून नोकरदार व वैचारिक ठेवण असणारा वर्ग तुटत गेला. काँग्रेस नको, राष्ट्रवादी नको, राज ठाकरे नको, एमआयएम नको मग लढायचं तरी कोणासोबत आणि कोणासाठी ? काँग्रेसची मते खाण्यासाठी की, भाजपलं मदत होण्यासाठी ? या प्रश्नांची उत्तरे आता समोर येऊ लागली आहेत. आता वंचित २८८ जागा लढविणार आहे. निवडून येण्यासाठी आपल्याकडे "मतबळ" नाही. हे माहित असताना देखील हा घाट साहेबांनी घातला आहे. त्यात २५ उमेदवार मुस्लिम समाजातील असतील असे डिक्लेर केले आहे. आता मुस्लिम व दलित ही बहुतांशी काँग्रेसची "ओटबँक" आहे. त्यामुळे हे उमेदवार "जात" पाहुन घात करण्यासाठीच दिले जातील. असे आरोप होत आहे. प्रकाश आंबेडकरांच्या या कार्यपद्धतीने त्यांच्याकडे जी "किंग मेकरची" नामी संधी होती. ती संपुष्टात आली आहे. ज्या आंबेडकरी समाजाने त्यांच्याकडे मोठ्या विश्वासाने नेत्रुत्व दिले होेते. तो समाज आता त्यांच्या पाठीशी असल्याचे दिसत नाही. आणि येणाऱ्या काळात देखील पुन्हा संधी देईल असे जनतेला वाटत नाही. एकवेळी उद्याच्या काळात सुजात आंबेडकरला लोक स्विकारतील. पण, साहेबांच्या स्वभावाला व कार्यपद्धतीला नाही. असे बोलले जाते.
|
थोडं वाका, आमच्याकडून शिका !
|
असे असले तरी, अजून वेळ गेलेली नाही. दलित मतांना काबूूत करण्यासाठी भाजपने रामदास आठवले यांना खासदारकी बहाल करून केंद्रात मंत्रीपद दिले आहे. राज्यातील ताकद वाढण्यासाठी रिपाईकडून अविनाश महातेकरांना मंत्री केले आहे. त्यामुळे हा फंडा भाजपच्या कामी आला असून गवई, वंचित, भारिप हे गट फुटून रिपाईत दाखल झाले आहेत. त्यामुळे सद्यातरी भाजपची ताकत एखाद्या पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे आहे. तीला शह द्यायचा असेल तर विरोधकांनी "ग" बाजूला ठेऊन लढले तरच परिवर्तन शक्य आहे. नाहीतर पुरात भल्याभल्यांचा कचरा होऊन जातो. याचा विसर पडू नये इतकच.
Latest Marathi News
(एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा निष्ठावंत व लोकशाही समर्थक)
-----------------------------
"पुढील लेख"
दंगलीत "बाप गमविलेल्या" पुत्राचे पिचड साहेबांना "स्मरणपत्र"...ओळखलत का सर मला !! नक्की वाचा "रोखठोक सार्वभौम"
================
"सार्वभाैम संपादक"
- सागर शशिकांत शिंदे
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ६७ दिवसात ११८ लेखांचे ६ लाख २९ हजार वाचक)