"पांढरपेशी" डॉक्टरांची "पांढऱ्या पेशींवर" कमाई..! बाप्पा "रक्तपिपासुंना" सद्बुद्धी दे..! सरकारी दवाखाने "व्हेंन्टीलेटरवर"..!
घाबरु नका, लै नाय लुटलं..!! |
"नगरपालिका आणि ग्रामपंचायत" यांच्या "भोंगळ" कारभाराचे बळी "डेंग्युच्या" रुपाने जात आहे. संगमनेर व अकोले तालुका मिळून तब्बल २२ ते २५ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अर्थात या आजाराने झालय असे की; "ऊंदराचा जीव जातो, आणि मांजराचा खेळ होतो". कारण, डॉक्टरांचे दवाखाने "ओव्हरफुल" होऊ लागले आहेत. तर, त्यांच्यामुळे "रक्त, लघवी चेकअप शॉप आणि मेडिकल दुकानांचे "गल्ले तुडूंब भरले" आहेत. पाच-सहा दिवसाचा खेळ, पार पंधरा दिवसांवर जातो. त्यानंतर, थोडे थीडके नाही. तर, अर्धा लाख रुपयांची बिले झोपडपट्टीत राहणाऱ्या गोर-गरिबांच्या माथी मारले जाऊ लागले आहे. त्यामुळे काही "पांढरपेशी" डॉक्टरांचे "पांढऱ्या पेशींवर" जोरीत धंदे सुरु असल्याच्या तक्रारी "आरोग्य विभागाकडे" जाऊ लागल्या आहेत. "डॉक्टरांना लोक देव मानतात". त्यामुळे या देवाने "बिलाच्या रकमा" थोड्या 'आटोक्यात' आणल्या तर "गणपती बाप्पा" पावल्यासारखे होईल. आणि बाप्पा "नगरपालिका आणि ग्रामपंचायतींना" सद्बुद्धी दे, स्वच्छतेसाठी फवारे मारुन "डेंग्युचे विसर्जन" होऊदे. हीच तुझ्या चरणी प्रार्थना. आणि हो ! जाता-जाता जे सरकारी दवाखाने "व्हेंटीलेटरवर" आहेत. ते 'कायमचे बंद' होऊदे किंवा त्यांना "अच्छेदीन" ची "लस" टोचून दे...!!
मला डॉक्टरांनी देव्हाऱ्यात ठेऊन पुजावं मी त्यांचा अन्नदाता |
बाळ प्रचंड सिरियस आहे. घ्या ICO मध्ये !! |
सर्वात महत्वाची बाब अशी की; अकोले, राजूर, कोतुळ, आणि संगमनेर देखील या ठिकाणी सरकारी दवाखान्यात डेंग्युची "योग्य ट्रीटमेन्ट" गोळ्या औषधे व तपासणी यंत्रणा नाही. जी आहे. तेथे सुद्धा अवाजवी पैसे उकळले जात आहे. इतकेच काय ! तर या दवाखान्यातून काही खाजगी दवाखान्यात पेशन्ट पाठविल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यातून टक्केवारी सुरु असल्याच्या जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यामुळे अकोल्यात पुर्वी डॉ. बबनराव गायकवाड होते. तोवर दवाखान्यात गोर-गरिब हक्काने जात होते. आता मात्र, दवाखाना चक्क म्रुत अवस्थेत असून येथे अनागोंदी कारभार सुरु असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या आहेत. याकडे नगरपालिका, तहसिल लक्ष का देत नाही. की; यांचीही "सोंड" "रक्तपिपासू" झाली आहे. हेच कळायला तयार नाही. असा प्रश्न जनतेने उपस्थित केला आहे.
आहो डॉक्टर !!, गप्प बसायचं..! नो क्वशन !! |
सर्वसाधारण पाहिले तर एक व्यक्ती निव्वळ आजारी आहे. असे म्हणून दवाखान्यात गेला तर. त्याला डॉक्टर तपासतो, लगेच रक्त, लघवी, पांढऱ्या पेशी अशा सहा प्रकारच्या टेस्ट करायला पाठवून दिले जाते. यामागे "सर्वात मोठी डिल" ठरलेली असते. ती म्हणजे प्रति पेशन्टमागे तीन आकडी रक्कम. हे "महाशय" थोडे थिडके नाही तब्बल १० मिनिटात १२ शे रुपयांचा आकडा मांडून कागद पुढे करतो. आता आम्ही अकोल्यात एक ठणठणीत पेशंन्ट एका बसस्थानक परिसरात असणाऱ्या दवाखान्यात पाठविला होता. चक्क काही नसताना १४ शे रुपये अर्ध्या तासात भरावे लागले. व्यक्ती सशक्त असताना यांच्या मशिनमध्ये पांढऱ्या पेशी कमी कशा होतात. ? पेशन्टची विचारणा होताच पेशी कशा वाढतात ? हे सर्व "अनाकलनिय" आहे. जेथे दवाखाना, तेथे मेडिकल हा "नवरा बायकोचा" खेळ आहे. एकाने मारल्यासारखे करायचे आणि दुसऱ्याने रडल्यासारखे. डॉक्टरांनी कागद खरडायचा आणि मेडिकलवाल्यांनी बॅग भरुन गोळ्या द्यायच्या. त्याची बीले दिली नाही दिली. कोण विचारत नाही. त्यावर रक्कम काय आहे. हे कोणी पहात नाही. "जीव प्यारा पैसा नाही". या धोरणामुळे "तोंड दाबून बुक्क्याचा मारा" नागरिक सहन करीत आहे.
काळजी नसावी, तुमचे पैसे संपत नाही, तोवर आम्ही सोबत आहोत. |
डॉ. कम नर्स, दवाखाने आम्हीच चालवितो !!
अशावेळी तुमचा आयुर्वीमा, किंवा महात्मापुले कार्ड चालत नाही. चालतो तो फक्त डॉक्टरांचा अंम्मल. त्यामुळे सरकारने एकतर हे "व्हेंटीलेटरवर" पडलेले नाममात्र सरकारी दवाखाने बंद केले पाहिजे. नाहीतर त्यात सुविधा दिल्या पाहिजे. या ही पलिकडे नगरपालिका व ग्रामपंचायतींनी "नियमित फवारणी" केली आणि "स्वच्छता" ठेवली. तर या थराला ह्या गोष्टी जाणार नाहीत. अर्थात नागरिकांनी देखील "स्वत:च्या जबाबदाऱ्या" ओळखल्या पाहिजे. त्यांच्या "बेजबाबदार" पणामुळेच त्यांची घरे खाली झालीत आणि गल्लीबोळातील डॉक्टर देखील घरे भरु लागला आहे. जेव्हा नागरिक "सजग" होईल तेव्हाच असले आजार लयास जातील यात शंका नाही.-- सागर शशिकांत शिंदे
सुशांत पावसे (संगमनेर)
====================
"सार्वभाैम संपादक"
- सागर शिंदे
8888782010
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ५२ दिवसात ९८ लेखांचे ५ लाख ३५ हजार वाचक)
----------------------