"सत्तेत सहभाग" द्या; "युज अँण्ड थो" चे धोरण बंद करा.!! रिपाईची पिचडांना बैठकीत तंबी..!

सत्तेत सहभाग द्या !! नाहीतर पडा !!

अकोले (प्रतिनिधी) :-
             "देशात व राज्यात" रिपाईची भाजप व शिवसेना यांच्यात "युती" आहे. मात्र, स्थानिक पातळीवर भाजप रिपाईला कधीही ग्राह्य धरत नाहीत. युती आहे. असे म्हणून नेहमी अदखलपात्र करतात. तर तालुक्याच्या ज्या पाच "शिखरसंस्था" आहेत. त्यामध्ये चळवळीच्या एकाही व्यक्तीला सत्तेत सहभाग देत नाहीत. आजवर रिपाईचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री, रामदास आठवले यांचा आदेश पाळून जिल्ह्यात युतीधर्म निभविला आहे व यापुढेही त्याचे पालन केले जाईल. मात्र, चळवळीसाठी आयुष्य खर्ची घातलेल्या कार्यकर्त्यांचा कधीही सत्तेत सहभाग देऊन सन्मान केला नाही. त्यामुळे, तालुक्यात कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण आहे. त्या अनुषंगाने आज रविवार दि.८ रोजी दुपारी २ वाजता ज्येष्ठ नेते दिलीप गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली अकोले शासकीय विश्रामग्रुहावर बैठक घेण्यात आली. "लालूस" किंवा "आश्वासने" नको. तर, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तेत सहभाग दिला. तरच आ. वैभव पिचड यांना पाठींबा द्यायचा. अन्यथा योग्यवेळी योग्य निर्णय घेतला जाईल. असा सुर कार्यकर्त्यांमधून पुढे आला आहे. यावेळी मा. आ. वैभव पिचड यांना रिपाईची भुमिका निवेदनाद्वारे देण्यात आली. या बैठकीला तालुक्यातील सर्व विभागाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रिपाई पदाधिकाऱ्यांचा गोतावळा

          मा. आ. पिचड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की; अकोल्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक व्हावे, अकोल्याच्या मोठ्या पुलाला दादासाहेब रुपवते यांचे नाव द्यावे, झेडपी, पंचायत समिती, कारखाना, महाविद्यालय, बाजार समिती, दुधसंघ, खरेदी विक्रिसंघ अशा अन्य ठिकाणी सत्तेत सहभाग व मागासवर्गीय तरुणांनांचा बॅकलॉक भरुन शिखर संस्थांमध्ये नोकरीची संधी द्यावी. यावेळी जूनी कार्यकारणी बरखास्त करून नव्याने  निवडी करण्यात आल्या. गाैतम पवार (तालुका अध्यक्ष),सचिन खरात (शहर अध्यक्ष) ,कमलेश कसबे (सरचिटणीस) शांताराम जगताप (कार्याध्यक्ष) किशोर शिंदे (तालुका युवक अध्यक्ष) प्रवीण देठे (युवक शहर अध्यक्ष) संतोष गायकवाड (अध्यक्ष मातंग आघाडी) बाळासाहेब सरोदे (उपाध्यक्ष),उत्तम आढाव उपाध्यक्ष) ,सावळेराव गायकवाड (उपाध्यक्ष) ,मच्छिद्र भालेराव( उपाध्यक्ष) , संदिप शिंदे (उपाध्यक्ष) ,अर्जुन संगारे (उपाध्यक्ष) ,पांडुरंग पवार(मुख्य संघटक),नितीन सोनवणे (संघटक), रवींद्र देठे (मुळा विभाग अध्यक्ष) ,विशाल वाघमारे (युवक उपाध्यक्ष) ,रमेश साबळे (युवक उपाध्यक्ष) शंकर संगारे (युवक कार्याध्यक्ष),मिलिंद जगताप (युवक सरचिटणीस) रवींद्र सोणवणे (युवक उपाध्यक्ष) यांच्या नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या.
             
 या बैठकीला विजय वाकचौरे (राज्य सचिव) शांताराम संगारे (माजी तालुकाध्यक्ष) राजेंद्र गवांदे (उपजिल्हाध्यक्ष) दिलीप गायकवाड, सावळेराम गायकवाड, शंकर संगारे, संदीप शिंदे, बन्सी त्रिभुवन, राजेंद्र आव्हाड, बाळासाहेब सरोदे ,राजेश देठे ,चंद्रकांत वैराट, शांताराम पवार, शांताराम जगताप, वसंत उघडे, कैलास नेपाळे, दत्तू वाळुंज,  उत्तम आढाव, जनार्धन सोनवणे, वसंत वाकचौरे, विकास देठे, प्रकाश कसबे, पांडुरंग पवार, आनंदा कसबे, उत्तम कांबळे, सुरेश कांबळे, दिलीप आव्हाड, मच्छिंद्र भालेराव, लक्ष्मण पिंपळे, अर्जुन संगारे,संजय गायकवाड, पुनाजी पवार, रमेश साबळे, विजय गायकवाड, भीमराज देठे, , जीवनराम पोपेरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
गौतम पवार (तालुकाध्यक्ष रिपाई)