"आ. बाळासाहेब थोरात "बिनविरोध" येतात की काय ! "शक्तप्रदर्शनात" उमेदवारी अर्ज भरला

"उमेदवारी अर्ज"

संगमनेर (प्रतिनिधी) :- 
                     आज "काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष" बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघ (२१७) येथून आपला "उमेदवारी अर्ज" दाखल केला आहे. यावेळी हजारो कार्यकर्ते "शक्तीप्रदर्शनासाठी" रस्त्यावर उतरले होते. एकीकडे ५० इच्छुकांना गुढग्याला बाशिंग बांधून विधानसभेची लगीनघाई सुरू केली आहे. तर, वाड्यावरुन येणाऱ्या निरोपासाठी मोबाईल अगदी छातीशी कवटाळून धरला आहे. मात्र, स्पर्धकाने उमेदवारी अर्ज भरूनही येथे "विरोधक" निच्छित व्हायला तयार नाही. त्यामुळे, बाळासाहेब "बिनविरोध" निवडून येतात की काय ? असे टिकात्मक प्रश्न जनतेतून पुढे येऊ लागले आहे. यावेळी थोरातांना ठराविक अत्रुप्त आत्म्यांचा विरोध नक्की आहे. मात्र, "नाका परिस जड, एक नाही धड, भारा भर चिंध्या" असेच काहीसे दिसू लागले आहे. अर्थात यांना विरोधक म्हणावे का ? छे..! हे तर "संधीसाधू" असल्याची टिका आता होऊ लागली आहे. कारण, जसे अकोल्यात वातावरण निर्माण झाले आहेत. उमेदवार कोणीही द्या !! फक्त पिचडांचा पराभव महत्वाचा आहे. असा निर्धार करून दंड थोपटणारे विरोधक संगमनेरात दिसून येईनासे झाले आहे. काल ज्यांनी भाजपात प्रवेश केला. आज ते पुन्हा काँग्रेसमध्ये दाखल होत आहे. आशी "वळीवाच्या पावसासारख्या" नेत्यांना "विरोधक" म्हणायचे तरी कसे. पण, "युतीचा निर्णय" आणि "वाड्यावरुन निच्छित" होणारी उमेदवारी यानंतर खरे "विरोधक" आणि "फुटीर" नेते यांची प्रचिती होणार आहे. फक्त हे सगळे निर्धारीत करता-करता संगमनेर विधानसभा बिनविरोध व्हायला नको म्हणजे झालं. अशी मिश्किन टिका आता होऊ लागली आहे.

"विजयी" भव: साहेबा

          सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष आता संगमनेर विधानसभेच्या निवडणुकीवर लागले आहे. कारण, भाजपने विरोधकांच्या नरड्यात हात घालुन मातब्बरांना कमळात बसविण्याचा पायंडा पाडला आहे. त्यात ना. विखे, डॉ. खा. विखे, पद्मसिंह पाटील, उदयनराजे भोसले, मधुकर पिचड ही अविश्वसनिय व्यक्तीमत्व रातो-रात भाजपवासी झाले. तर, विरोधी पक्षनेताच सत्ताधारी झाल्याचे इतिहासाने पहिल्यांदाच अभ्यासले. त्यामुळे थोरात साहेबांना गळ घालून सुद्धा ते फुटले नाही. मग त्यांचा "पाडाव" सोडून पर्याय राहिला नाही. त्यामुळे, भाजपने खुद्द ना. विखे साहेबांनाच संगमनेरची मोहिम "फतेह" करण्याची जबाबदारी दिली. असे असले तरी थोरातांनी आपल्या "बालेकिल्ल्याचे बुरूंज" इतके "बक्कळ" आणि "बुलंद" करून ठेवले आहेत. की, त्यांना शह देण्यासाठी कोण सेनापती द्यावा ? असा प्रश्न "दिल्लीच्या तख्तापासून" तर "लोणीच्या वाड्यापर्यंत" चिंतेचा विषय ठरला आहे. त्यामुळे, आरएसएस सारख्या संघटनेने संगमनेरपुढे गुढगे टेकविल्याचे बोलले जात आहे. गोपनिय सुत्रांच्या माहितीनुसार भाजपच्या विजयी यादीत संगमनेरचे नाव घेऊ नये. असा संदेश देखील प्रसारीत करण्यात आल्याचे बोलले जात आहे. कारण, भाजपची जी "बुथ यंत्रणा" आहे. त्यापेक्षा प्रबळ यंत्रणा थोरात गटाची असल्याची प्रचिती आली असून त्याला विरोधकांनी सलाम ठोकल्याचे अंतर्गत चर्चेतून बाहेर आल्याचे बोलले जाते.
           थोडक्यात सांगायचे झाले तर, प्रवरा नदीच्या रोटेशन प्रमाणे थोरात यंत्रणेचे रोटेशन सुरू आहे. प्रथमत: तरुणांचा दौरा, नंतर महिला व खुद्द साहेब असे दौरे गावोगावी नियोजित करण्यात आले आहे. त्याहुन महत्वाचे म्हणजे. पुर्वी "गावपुढारी" सर्व यंत्रणा राबवत असे. आता मात्र, वाड्या वस्तीतील स्थानिक व्यक्तीला स्वत:च्या जबाबदाऱ्या ठरवून दिल्या आहेत. गावा-गावातील विकास सोशल मीडियावर दिसू लागला आहे.
                एक विशेष बाब म्हणजे, आ. बाळासाहेब थोरातांना गुजरातमध्ये नियोजनाची संधी मिळाली होती. तेव्हा त्यांनी "सुपर सिक्स्टी" (६०) हा फॉर्मीला त्यांनी वापरला होता. त्याला भरगोस यश मिळाल्याचे आपण पाहिले. तोच फंडा ते संगमनेरसह ठराविक ठिकाणी वापरत असल्याचे दिसून येत आहे. "पैसा फेको, तमाशा देखो" या म्हणीपेक्षा "योग्य नियोजन, हेच अर्धे यश" या उक्तीवर भर देऊ पहात आहे. त्यामुळे त्यांना स्वत:च्या मतदारसंघात बिलकुल धोका नाही. असे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे. एक महत्वाची गोष्ट म्हणजे, त्यांचे चारित्र्य, शांत, संयम या सोज्वळ स्वाभावाने त्यांना जनधार मिळू शकतो. असे राज्यातील जनतेला वाटते. कारण, "सेक्युलर" विचारसारणी आणि सरळ राजकारण यावर खुद्द गांधी परिवार देखील त्यांच्यावर "उदार" असल्याचे आपण पाहिले आहे.
         थोरात समर्थकांसाठी एक खुशामत अशी आहे की, नुकत्याच लोकसभेला वंचित बहुजन आघाडीला संगमनेरातून बऱ्यापैकी जनाधार होता. ही सर्व मते काँग्रेसची होती. मात्र, गोपिचंद, पडळकर, लक्ष्मण माने यांच्यासह मोठी पडझड झाली आहे. तसेच प्रकाश आंबेडकर यांच्या स्वतंत्र लढण्याने पुन्हा भाजपची "बी टिम" असा आरोप होऊ शकतो, महायुतीला पुरक वातावरण निर्माण होऊ शकते. हे सर्व ज्ञात असून सुद्धा त्यांनी अगदी एमआयएमला देखील सोडून "एकला चलो रे" ची भुमिका घेतल्याने. दलित व बहुजन समाज नाराज झाला आहे. त्यामुळे भाजपला अंतर्गत सपोर्ट करण्यापेक्षा काँग्रेस बरी. म्हणजे "दगडापेक्षा विट मऊ" असे म्हणून दलित मते काँग्रेसकडे वळतील असे वाटते आहे. फक्त रिपाई घटक सांभाळणे त्यांना आव्हाणात्मक ठरणार आहे. तर, गवई गटाचा संगमनेरात नुकताच "गौगवा" आहे. ताकद मात्र शुन्य आहे. पण, निळ्या निशानासाठी अशा गटातटाचा चेहरा तोंडी लावायला जवळ करावे लागणार आहे. ते कसे करायचे ते थोरातांना नव्याने सांगण्याची गरज नाही. कारण, गटा-तटात वाटून गेलेले डॉ. बाबासाहेब यावर न बोललेले बरे. त्यामुळे एकंदरीत विचार करता. मुख्यमंत्र्यांच्या सभेचे बारगळलेले नियोजन ते अद्याप अनिच्छित उमेदवार. यात बाळासाहेब थोरात यांची ताकद वाढत चालल्याचे बोलले जात आहे. तरी, युती, तिकीट वाटप आणि उमेदवार निच्छिती यावर बरेच काही अवलंबून असल्याचे राजकीय  मात्तबरांना वाटते आहे.

- सागर शिंदे

===============

             "सार्वभाैम संपादक"
                 

    - सागर शशिकांत शिंदे   

Rajratna.sagar@gmail.com
                  -------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ७४ दिवसात १३१ लेखांचे ७ लाख ३० हजार वाचक)