"संगमनेरात नियोजनाचा बट्याबोळ !! तर अकोल्यात नियोजन एक नंबर"

संगमनेर सकाळाचे सभास्थळ

संगमनेर (प्रतिनिधी) :- 
                            "काँग्रेसची" सत्ता उलथापालथ करण्यासाठी भाजपला   "वर्षानुवर्षे कट कारस्ताने" आणि "अतिशय मायक्रो नियोजन" करावे लागले.  अर्थात इतिहास सांगतो, चाणक्यनिती वापरून जसा "चंद्रगुप्त" अखंड भारताचा "राजा" बनविला. तशी "आरएसएस रणनिती" वापरून "अखंड भारताचे" पंतप्रधान नरेंद्र मोदींना केल्याचे काहीसे स्पप्न यांनी पुर्ण केले. असे वैचारिक चळवळीतून बोलले जात आहे. हे सर्व उभे करताना किती "सुक्ष्म नियोजन" होते. याची कल्पना सामान्य मानसांच्या कल्पनेपलिकडे आहे. स्पष्टच सांगायचे झाले. तर "भाजप" म्हणजे "आरएसएसच्या नियोजनाची अंमलबजावणी" होय. असे कित्तेकदा "राजकिय विश्लेषकांनी" मांडले आहे. पण, संगमेरात भाजपच्या नियोजनाचा "बट्ट्याबोळ" झाल्याचे पहायला मिळाले आहे. मुख्यमंत्री महोदयांची महाजनादेशयात्रा १२ वा. संगमनेर मध्ये जाणता राजा मैदानावर येत आहे. परंतु ९ वाजुन गेले तरी देखील कार्यक्रमस्थळी कार्यकर्त्यांना बसण्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात "चिखल" पहायला मिळाला. कार्यकर्ते सुस्त होते. मात्र, शासकीय यंत्रणा "युद्ध" पातळीवर काम करताना दिसून आली. परंतु, एकंदरीत कार्यक्रमाचे नियोजन ढासळते की काय ?  अशी साशंकता उपस्थित केली जात आहे. जर आ. बाळासाहेब थोरात यांनी शह द्यायचा असेल तर नियोजन विरहीत आणि सुस्त कार्यकर्त्यांच्या भरवशावर किल्ला ढवाल तर चितपट होऊन लाजवेल असा पराभव होईल असे जाणकारांना वाटते. मुलाखती द्यायला २४ जण अन युद्धाची वेळजवळ आली तरी मैदानावर सैनिक. अर्थात अजून "सेनापतीच" निवडला नाही. त्यामुळे "वजिराशिवाय सोंगट्या" लढत असल्याचे दिसत आहे.  काही झाले तरी नियोजनाचे "तीन तेरा, नऊ बारा, वाजल्याचे दिसत आहे.

युद्धपातळी ???????

         संगमनेर विधानसभा टारगेट करून भाजपने मोठी यंत्रणा राबविल्याची वाल्गना केली जात होती. मात्र, राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू यांचे शहर समजल्या जाणाऱ्या संगमनेर मध्येच बिजेपीच्या नियोजनात कमतरता जाणवत असल्याची टिका केली जाऊ लागली  आहे. विधानसभेची तयारीसाठी २४ जणांनी मुलाखत दिली आहे. परंतु मुख्यमंत्र्यांच्या जाणता राजा मैदानावर यांनी पाठच फिरवल्याचे दिसते आहे. मैदानावर अद्याप गुढग्याइतके खोल चिखल असल्याचे दिसते आहे. नऊ वाजेपर्यंत मैदानावर शासकीय यंत्रणा वगळता फारसे उत्साही कोणी दिसून आले नाही. याचे कारण म्हणजे ना. विखे यांनी उमेदवार गुलदस्त्यात ठेऊन घोषित न करण्याची भुमिका घेतली आहे. त्यामुळे तो करेल, हा करेल, असे झाल्याने कामे शिल्लक राहुन गेलीत की काय ! असे वाटू लागले आहे. सगळे जे काही करतील ते विखे साहेब. ! हीच भुमिका संगमनेरकरांनी घेतली आहे. काही झाले तरी थोरातांना पाडायची इच्छा आणि चंग विखेंचा आहे. त्यामुळे ते करतील ती पुर्वदिशा. संगमनेरकर निव्वळ बघ्याची भुमिका घेताना दिसत आहे. अवघे काही कट्टर थोरात विरोधक, अत्रुप्त आत्मे आणि नाराज जनता वगळली तर प्रस्तापित शह देणारा कोणी थोरात साहेबांनी ठेवलेला दिसत नाही. फक्त "गॉडफारद" विखेसाहेब आहेत. म्हणून सामना रंगतदार होणार आहे. अर्थात मैदानावरच अशी चिखलाची परिस्थिती असेल तर "बुथवर" पाणी-पाणी झाल्याशिवाय राहणार नाही. हे उद्या पहायला मिळेलच. पण, आज मुख्यमंत्र्यांनी उमेदवार जाहिर केला. तर किमान त्यांना ग्राऊंड लेवलवर काम करायला सोपे जाईल. असे जनतेला वाटू लागले आहे.

मुख्ययमंत्री दौरा

          तर दुसरीकडे अकोल्यात वैभव पिचड यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. तीन वेळा सभा रद्द होऊन आज निर्विघ्न मुहूर्त सापडला आहे. त्यांचे नियोजन अगदी काटेकोर आहे. त्यांच्याकडे मैदानावर आणि बुथवर देखील न डगमडणारे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांची सभा यशस्वी होऊन समाधान मिळेल. मात्र, या गर्दीचे रुपांतर मतात करण्यासाठी त्यांना पणाला लावावी लागणार आहे. असे विश्लेषकांना वाटते.
 """""""""""""
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संगमनेर अकोले "लायु सभा" अपडेट फक्त "रोखठोक सार्वभौम" वर.
  ===============

--  सुशांत पावसे

( संगमनेर प्रतिनिधी)





====================
             "सार्वभाैम संपादक"
                 

              - सागर शिंदे 

              8888782010

               -------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ५९ दिवसात १०४ लेखांचे ५ लाख ५० हजार वाचक)
----------------------